
Champions_ Skylightz Gaming
- स्कायलाइट्स गेमिंग प्रतिष्ठेची आयक्यू बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया सीरिज २०२१ ट्रॉफी ५०,००,००० रूपयांच्या पारितोषिकाच्या रकमेसोबत घरी नेणार
- टीएसएम आणि टीम एक्सओ दुसऱ्या आणि तिसऱ्या जागांवर स्थिर, प्रत्येकी २५,००,००० रूपये आणि १०,००,००० रूपयांच्या रोख रकमेचे विजेते
मुंबई,18 जानेवारी 2022 (GPN):- महिनाभर चाललेल्या आयक्यू बॅटलग्राऊंड्स मोबिल इंडिया सीरिज २०२१ काल रात्री अत्यंत अटीतटीच्या स्कायलाइट्स गेमिंगच्या उगवत्या विजेत्यांसोबत अटीतटीच्या सामन्याद्वारे संपली. भारतात आयोजित केल्या गेलेल्या सर्वांत मोठ्या आणि पहिल्यावहिल्या बॅटलग्राऊंड्स मोबाइल टूर्नामेंट्सचे ते पहिले चॅम्पियन आहेत. विजेती टीम स्कायलाइट्स गेमिंगने प्रतिष्ठेची आयक्यू बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया सीरिज २०२१ ट्रॉफी तसेच तब्बल ५० लाख रूपयांचे पारितोषिक जिंकले असून त्यापाठोपाठ टीएसएम आणि टीम एक्सओ यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे २५ लाख रूपये आणि १० लाख रूपये जिंकले आहेत.आयक्यू बॅटलग्राऊंड्स मोबिल इंडिया सीरिज २०२१ चे आयोजन सध्याची कोविड परिस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपद्वारे विविध वैयक्तिक खेळाडूंनी अत्यंत अटीतटीचे सामने खेळले आणि विशेष वैयक्तिक पुरस्कार मिळवण्यासाठी कौशल्ये प्रदर्शित केली. गॉडइनयूला स्पर्धेतील सर्वाधिक मौल्यवान खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आणि त्याला १ लाख रूपयांचे पारितोषिक दिले गेले. एसजीएक्ससामराजिऊ याला लोन रेंजर पुरस्कारासाठी ५०,००० रूपये पारितोषिक दिले गेले.त्याला रॅम्पेज फ्रीक पुरस्कारही दिला गेला आणि त्यासाठी ५०,००० रूपये प्राप्त झाले. गॉडइजगॉडला रेडीमेर पुरस्कार देण्यात आला. त्याला ५०,००० रूपये पारितोषिक दिले गेले.
बॅटलग्राऊंड्स मोबाइल विभागाचे प्रमुख वूयोल लिम म्हणाले की, “आम्ही स्कायलाइट्स गेमिंगचे ही स्पर्धा जिंकण्यासाठी दाखवलेली धमक आणि प्रचंड कौशल्ये यांच्यासाठी खूप अभिनंदन करतो. त्यांच्या बुद्धिमान स्क्वाड धोरण, हुशार झोन हालचाल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर किल्स उचलण्याची क्षमता यांच्यामुळे त्यांना आपल्या स्पर्धकांवर यशस्वीरित्या मात करणे शक्य झाले आहे. आम्ही इतर टीम्सचेही त्यांच्या सहभागासाठी आणि लढवय्येपणासाठी अभिनंदन करतो. आयक्यू बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया सीरिज २०२१ ही भारतातील प्रत्येक गेमिंग उत्साहीसाठी सहजसाध्य करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा भाग आहे. आम्ही ही जागतिक दर्जाची टूर्नामेंट बनवू शकलो याबाबत खूप आनंदी व अभिमानी आहोत आणि अशा अनेक स्पर्धांची निर्मिती करण्यासाठी उत्साही आहोत. आम्ही आयक्यूचे आमच्या मनापासून आभार मानतो की, त्यांनी आमच्या स्वप्नात सहभाग घेतला आणि हा उपक्रम भारतात ईस्पोर्टस् वाढवण्यासाठी हा पुढाकार घेतला”.
Be the first to comment on "स्कायलाइट्स गेमिंग आयक्यू बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया सीरिज २०२१ ची विजेती – भारतातील पहिलीवहिली बॅटलग्राऊंड्स मोबाइल टूर्नामेंट"