
Mission Frontline with Farhan Akhtar poster
- सशस्त्र दळांवर आधारित प्रसिद्ध मालिकांमधील ओरिजिनल मालिकांचे सादरीकरण- त्यांच्या ‘होम ऑफ पॅट्रिऑटस्’ ह्या अभियानाअंतर्गत मिशन फ्रंटलाईन आणि ब्रेकिंग पॉईंट
- फरहान अख़्तर जम्मू- कश्मीरच्या राष्ट्रीय रायफल सैनिकांसोबत खडतर प्रशिक्षण धेईल तर रोहीत शेट्टी श्रीनगरच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रूपचे सैनिक (पोलिस अधिकारी) ह्यांच्यासह साहस कृत्ये करताना दिसेल
- ’होम ऑफ पॅट्रिऑटस्मध्ये’ सर्वोत्तम देशभक्तीचे कंटेंट बघायला मिळेल. त्यामध्ये मिशन फ्रंटलाईन, लदाख़ वॉरीयर्स, ब्रेकिंग पॉईंट, स्पेशल ऑपरेशन्स इंडीया व इतर अनेक XX शीर्षकांचा समावेश असेल

Mission Frontline starring Farhan Akhtar and Rohit Shetty
मुंबई 17 जानेवरी 2022 (GPN): गेल्या अनेक वर्षांपासून डिस्कव्हरी+ ने सशस्त्र दळांबद्दलच्या कंटेंटचे मुख्य केंद्र म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. आधी कधीही न बघितलेल्या व एक्स्क्लुझिव्ह अशा कंटेंटचे घर असलेले डिस्कव्हरी+ ह्या प्रजासत्ताक दिनी ‘होम ऑफ पॅट्रिऑटस्’ अभियान राबवून शौर्य व साहसाच्या कहाण्या प्रस्तुत करणा-या व चाहत्यांच्या आवडत्या मिशन फ्रंटलाईन आणि ब्रेकिंग पॉईंट ह्या फ्रँचायजीमध्ये नवीन मालिकांचा शुभारंभ करत आहे. 20 जानेवारी रोजी सादर होणा-या मिशन फ्रंटलाईनमध्ये कलाकार, लेखक, निर्माता व सादरकर्ता फरहान अख़्तर व त्यासह प्रसिद्ध साहह- दिग्दर्शक व निर्माता रोहीत शेट्टी हे असतील. 21 जानेवारी रोजी प्रसिद्ध ब्रेकिंग पॉईंट मालिकेमध्ये 4 नवीन डॉक्युमेंटरीजचा शुभारंभ केला जाईल.
राणा दग्गुबती आणि सारा अली खान ह्यांच्या मिशन फ्रंटलानमधील समावेशाला मिळालेल्या उल्लेखनीय प्रतिसादानंतर ह्या साहसाने भरलेल्या भागांमध्ये फरहान अख़्तर आणि रोहीत शेट्टी असतील व ते एक दिवस अनुक्रमे राष्ट्रीय रायफल सैनिक आणि जम्मू- कश्मीर पुलिस (श्रीनगरमधील स्पेशल ऑपरेशन्स ग्रूप) ह्यांच्यासह घालवताना दिसतील. साहस, एन्ड्युरन्स, अतिशय कठोर प्रशिक्षण, अतिशय कष्टाने मिळवलेली पात्रता आणि पॉवरफुल व्हिज्युअल्ससह प्रत्येक भाग हा ह्या सेलिब्रिटीजच्या डोळ्यांद्वारे व अनुभवाद्वारे भारताच्या योद्ध्यांच्या जीवनाची एक झलक आपल्यासमोर आणेल.
ह्या महिन्यामध्ये नियोजित असलेली एक प्रसिद्ध फ्रंचायजी ब्रेकिंग पॉईंट आहे व ह्यामध्ये 4- भागांचा एक शो दर्शवला जाईल ज्यामध्ये पॅराट्रूपर्स, रणगाडे, पायदळ आणि हवाई दळ ह्या विविध सैनिकांच्या गटांच्या प्रशिक्षणाची झलक बघायला मिळेल. ह्या थरारक कृत्यांना बघताना आपल्याला विलक्षण अभिमान वाटेल व नाशिक, जोधपूर, अहमदनगर, आग्रा, जैसलमेर आणि सरमथुरा अशा शहरांमधील भारताच्या मुख्य संस्थांमध्ये देण्यात येणा-या प्रशिक्षणाला आजवर पहिल्यांदाच बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. सैनिकांचे रुपांतर भारतीय सेनेच्या उज्ज्वल योद्ध्यांमध्ये कसे होते, हे ह्या मालिकेमध्ये प्रत्येक क्षणी दर्शकांना बघता येईल.
आपल्या ह्या प्रशिक्षण अनुभवाबद्दल बोलताना फरहान अख़्तर ह्याने म्हंटले, “माझ्या भावना एका शब्दामध्ये व्यक्त करणे मला अशक्य असेल. आम्ही जेव्हा लक्ष्यचे शूटींग करत होतो, तेव्हा आम्ही आपल्या जवानांचं व्यक्तिगत जीवन अगदी जवळून बघू शकलो होतो. परंतु त्यांच्या जागी जाऊन राहणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या समोर असलेल्या कठीण परिस्थितीला सामोरे जाणे, हा जीवन बदलणारा अनुभव होता. अशा प्रतिकूल प्रदेशामध्ये व विपरित स्थितीमध्ये प्रशिक्षण प्राप्त करणे, हे माझ्यासाठी अतिशय कठीण होते, परंतु त्यांचे सहाय्य आणि प्रोत्साहन ह्यामुळे ते शक्य बनले. डिस्कव्हरी+ च्या ‘मिशन फ्रंटलाईनचा’ भाग बनणे व ही संधी मिळणे माझा सन्मान आहे.”
सशस्त्र दळांसोबत एक दिवस घालवण्याबद्दल रोहीत शेट्टी ह्यांनी म्हंटले, “कोणतेही वाक्य वापरले तरी मी माझा अनुभव शब्दांमध्ये सांगू शकत नाही. लोक नेहमीच मला साहसासोबत जोडतात, परंतु ‘खरे साहस’ हे पोलिस अधिकारी स्वत: साकार रूपामध्ये आहेत. त्यांच्या अतिशय तणावाच्या जागेला लक्षात घेता दररोज सकाळी ड्युटीवर जाणे व परत येईपर्यंत सुरक्षित असू अशी आशा कुटुंबासाठी बाळगणे, हे अतिशय हिमतीचे काम आहे. त्यांच्या अदम्य उत्साहाने मीथक्क झालो. पोलिसाच्या जीवनाच्या ह्या पैलूंचे दर्शन मला इथे आणून घडवल्याबद्दल डिस्कव्हरी+ ला धन्यवाद. ह्यामुळे प्रेक्षकही थक्क होतील आणि त्यांनाही त्यांच्या उत्साहाला व देश व नगरिकांबद्दलच्या त्यांच्या भावनेला सॅल्यूट करावासा वाटेल.”
होम ऑफ पॅट्रिऑटस्बद्दल आपले विचार मांडताना डिस्कव्हरी इन्क, साउथ एशियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर मेघा टाटा ह्यांनी म्हंटले,“अभिनव कंटेंटसह डिस्कव्हरीने एक ब्रँड म्हणून नेहमीच नवीन दर्जा आणला आहे आणि मिलिटरीविषयी विशेष कार्यक्रम आणल्यामुळे आम्ही इतरांपासून वेगळे ठरलो आहोत. आमच्या होम ऑफ पॅट्रिऑटस् कंटेंटसह आपल्या सैनिकांना व जवानांना सॅल्यूट करण्याचा व आपला आदर व्यक्त करण्याचा हा उत्तम क्षण आहे. ह्या अभियानामध्ये ह्या योद्ध्यांच्या जगामध्ये डोकावण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. फरहान अख़्तर आणि रोहीत शेट्टी अशा देशातील लक्षणीय व्यक्तींना ह्यामध्ये एका दिवसासाठी सैनिक आणि पोलिस अधिका-यांच्या स्वरूपामध्ये सहभागी करणे विशेष ठरले व त्यामुळे श्रोत्यांसाठी त्यांना बघणे थरारक ठरेल.”
मिशन फ्रंटलाईन आणि ब्रेकिंग पॉईंटसह, सैनिकांवरील विशेष कंटेंटमध्ये भारतीय सशस्त्र दळांच्या खडतर प्रशिक्षणावरील प्रशिक्षण कार्यक्रमांची झलकही बघायला मिळेल जे आधीच्या विशेष उल्लेखनीय शोजमध्ये दाखवले गेले होते- लदाख़ वॉरीयर्स, स्पेशल ऑपरेशन्स, इंडिया, बॅटप ओप्स, हाय अल्टीट्युड वारफेअर स्कूल, वूमन फायटर पायलटस, एअर फोर्स एकेडमी आणि इंदियन सबमरीन्स, ब्रेकिंग पॉईंट: कमांडो स्कूल बेलगाम (2017), इंडियाज पॅराट्रूपर्स – अर्निंग द बॅज (2016) आणि रीव्हील्ड: नॅशनल डिफेन्स एकेडमी (2014). रीव्हील्ड सियाचेन (2016), 1965: इंडियाज बॅटल्स अँड हिरोज (2015) आणि इंडियन वूमेन्स एक्सपीडीशन’ (2013) व त्यासह इतर लाईन अप आहे जे आपण मिस करू इच्छिणार नाहीत.
फरहान अख़्तर आणि रोहीत शेट्टी ह्यांचा सहभाग असलेले मिशन फ्रंटलाईन 20 जानेवारी रोजी व ब्रेकिंग पॉईंटच्या 4 विशेष डॉक्युमेंटरीज 21 जानेवारी रोजी फक्त डिस्कव्हरी+ वर बघायला विसरू नका.
Here is the link with hi-res images along with the trailer for your reference – https://drive.google.com/
Be the first to comment on "फरहान अख़्तर आणि रोहीत शेट्टी ह्यांचा समावेश असलेल्या आपल्या आगामी मालिकेमध्ये डिस्कव्हरी + आपल्या प्रेक्षकांना भारतातील सर्वाधिक खडतर प्रशिक्षणाची झलक दाखवणार"