
(L-R): Mr. Rakesh Sharma, Dy. GM, Head of Marketing & Branding, Mr. Debadatta Chand, ED, Mr. Ajay K Khurana, ED and Mr. Sanjiv Chadha, MD & CEO along with Cricketer Ms. Shafali Verma, Bank of Baroda’s new Brand Endorser, Mr. Vikramaditya Singh Khichi, ED, Mr. Joydeep Dutta Roy, ED and Mr. Purshotam, CGM, Retail Liabilities, Marketing & Govt. Business at the signing ceremony at Bank of Baroda, Mumbai.
मुंबई, 5 जानेवारी 2022 (GPN): भारतीय क्रिकेटपटू शेफाली वर्मा हिची ब्रँड एंडॉर्सर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बँक ऑफ बडोदातर्फे करण्यात आली. भारतीय महिला क्रिकेटमध्ये तिने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बँकेने या निष्णात क्रिकेटपटूसह करार केला आहे.
या सहयोगावर प्रतिक्रिया देताना बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ श्री. संजीव चड्ढा म्हणाले, “निपुण अॅथलीट्स आणि खेळाडूसमवेत सहयोग करण्याचा बँक ऑफ बडोदाचा इतिहास आहे आणि त्यांच्या प्रवासाचा ते एक महत्त्वाचा भाग राहिले आहेत. आपल्या वेगवेगळ्या बँकिंग आणि नॉन-बँकिंग उपक्रमांच्या माध्यमातून बँकेतर्फे तरुणांना कायम सहाय्य करण्यात येते आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी शेफालीसारख्या यूथ-आयकॉन्सची निवड करून ग्राहक अनुभवांमध्ये मूल्यांची भर घालण्याची बँकेची नैतिक मूल्ये प्रतिबिंबीत होतात. धैर्य, दृढनिश्चय आणि विश्वासार्हता हे पैलू शैफालीच्या व्यक्तिमत्वातून दिसून येतात, जी बँकेची ब्रँड मूल्ये आहेत.”
या प्रसंगी क्रिकेटपटू शेफाली वर्मा म्हणाली, “शंभर वर्षांहून अधिक वारसा असलेल्या संस्थेशी जोडले जाणे हा माझा बहुमान आहे. या सहयोगासाठी आणि माझ्या क्षमतेवर ठेवलेल्या विश्वासासाठी मी बँक ऑफ बडोदाची अत्यंत आभारी आहे. बँकेच्या भविष्यवेधी आणि बँकिंगच्या व तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांबद्दल असलेल्या दूरदृष्टीशी मी वैयक्तिकरित्या जोडली जाते.”
“शेफालीशी सहयोग केल्याबद्दल आम्ही बँक ऑफ बडोदाचे आभारी आहोत. भारतातील आदर्श खेळाडूंना बँक ऑफ बडोदाने कायम सहाय्य केले आहे आणि सहाय्य करत आहे.”, असे शेफाली वर्माचे व्यवस्थापक, बेसलाइन व्हेंचरचे व्यवस्थापकीय संचालक तुहिन मिश्रा म्हणाले. ते पुढे म्हणाले, “शेफालीच्या कारकिर्दीची सुरुवात उत्तम झाली आणि अशा प्रकारचा सपोर्ट मिळाल्याने भारताच्या शिरपेचात अधिकाधिक मानाचे तुरे खोवण्यासाठी जास्त मेहेनत करण्यास ती प्रवृत्त होईल.”
शेफालीने अनेक विक्रम केले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना भारतीय महिला संघातून खेळणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू म्हणून तिने विक्रम केला. शेफाली नैसर्गिकरित्या आजच्या तरुणाईशी जोडली जाते, विशेषतः तरुणींशी जोडली जाते आणि तिच्या व्यक्तिमत्वातून मैदानावर व मैदानाबाहेरही खिलाडूवृत्ती दिसून येते. आयीसीसीच्या यादीमध्ये अग्रस्थान प्राप्त झालेली तरुण क्रिकेटपटू असलेली शेफाली महिला क्रिकेटमधील एक प्रतिभाशाली खेळाडू आहे. ही स्फोटक महिला फलंदाज भारतासाठी क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्समध्ये खेळते.
गेल्या वर्षी बँकेने बॉब वर्ल्ड वेव्ह ही त्यांची नवी प्रोडक्ट सादर केली. ही प्रोडक्ट्स वेअरेबल (शरीरावर घालण्याजोगी) प्रकारातील असून त्यात बॉब वर्ल्डच्या छत्रांतर्गत असलेली पूर्ण आरोग्य परिसंस्था समाविष्ट आहे. या प्रोडक्टमुळे कधीही कुठूनही सुरळीत डिजिटल पेमेंट करण्याचा पर्याय प्राप्त होतो. त्यामुळे खरेदी करण्याची व व्यवहार करण्याची सुविधा प्राप्त होते. तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि एका टिचकीवर त्यांना सुरळीत बँकिंग अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी बँकेची डिजिटल फर्स्ट पॉलिसी आहे.
Be the first to comment on "बँक ऑफ बडोदातर्फे ब्रँड एंडॉर्सर म्हणून क्रिकेटपटू शेफाली वर्माची नियुक्ती"