
Sarwar Ahuja as Ravinder Bagga in Sony SAB’s Tera Yaar Hoon Main
MUMBAI (GPN): सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’ने बंसल व बग्गा यांच्यामधील सर्वसमावेशक कौटुंबिक नात्यांवर आधारित लक्षवेधक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनपेक्षित घटनांमुळे दलजीत (सयंतनी घोष) व राजीव (सुदीप साहिर) यांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडून आला आहे, जेथे सरवार आहुजा मालिकेमध्ये प्रवेश करत आहे. दलजीतचा माजी-पती रविंदर बग्गाची भूमिका साकारत तो निश्चितच दलजीत व राजीवच्या नात्याला नवीन वळण देणार आहे.
मालिकेमध्ये काम करण्याच्या अनुभवाबाबत सांगताना रविंदर बग्गाची भूमिका साकारणारा सरवार आहुजा म्हणाला, ”मी शशी सुमीत प्रॉडक्शन्ससोबत तिस-यांदा काम करत आहे. म्हणूनच मला घरी परतल्यासारखे वाटत आहे. मला ‘तेरा यार हूं मैं’ सारख्या मालिकेमध्ये काम करण्याची ही संधी मिळाल्यामुळे खूपच धन्य वाटत आहे. या मालिकेचा अत्यंत निष्ठावान प्रेक्षकवर्ग असून त्यांना मालिका खूपच आवडते आणि ते नियमितपणे मालिका पाहतात. पहिल्याच दिवशी सर्वांनी माझे उत्तमरित्या स्वागत केले आणि मी त्यांच्यामध्ये मिसळून त्यांनी आतापर्यंत निर्माण केलेल्या जादूमध्ये अधिक भर करण्यास उत्सुक आहे. मी मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण व रोमांचक भूमिका साकारण्यास खूपच उत्सुक आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षक आगामी एपिसोड पाहण्याचा आनंद घेतील.”
आपल्या भूमिकेबाबत सविस्तरपणे सांगताना सरवार म्हणाला, ”माझी भूमिका रविंदर दलजीतवर खूप प्रेम करतो. तो दलजीत सारख्या पंजाबी भूमिकेप्रमाणे अत्यंत उत्साही आहे. प्रेक्षक मालिकेमधील त्याच्या प्रवेशासह अनेक भावना पाहायला मिळण्याची अपेक्षा करू शकतात. तो दलजीतच्या जीवनातील गतकाळाला समोर आणेल. दलजीत व राजीव यांच्यामधील समीकरण व केमिस्ट्रीची परीक्षा घेतली जाईल, कारण दलजीत आजही तिच्या माजी-पतीवर प्रेम करते आणि तिच्या गतकाळाची आठवण काढते. म्हणून मी खात्री देऊ शकतो की, आगामी एपिसोड्स प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देतील आणि पुढे काय घडणार याबाबत त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण होईल. मी एका ब्रेकनंतर लहान पडद्यावर परतत आहे. म्हणून मी आशा करतो की, माझ्या चाहत्यांना माझी ही नवीन भूमिका आवडेल आणि ते रविंदरवर प्रेम व पाठिंब्याचा वर्षाव करतील.”
पाहत राहा ‘तेरा यार हूं मैं‘ दर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त सोनी सबवर
Be the first to comment on "सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’मध्ये रविंदर बग्गाच्या भूमिकेत सरवार आहुजाच्या प्रवेशासह येणार मोठे ट्विस्ट्स"