मुंबई, 3 जानेवारी 2022 (GPN): बँक ऑफ बडोदातर्फे अल्ट्रा-मॅरेथॉनपटू आणि फॅब फाउंडेशनचे संस्थापक-संचालक श्री. कुमार अजवानी यांचा सत्कार करण्यात आला. साधारण 77 दिवसांमध्ये श्री. कुमार अजवानी काश्मीर ते कन्याकुमारी (K2K) ही 4,444 किमीच्या अंतराची आत्मनिर्भर भारत रन धावणार आहेत.
दोन प्रमुख उद्दिष्टांसाठी श्री. अजवानी हे 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक ही धाव करत आहेत. क्यूएमटीआयतर्फे (क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट) दिव्यांग सैनिकांचे पुनर्वसन करण्यास मदत करणे आणि टीम फॅब फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी शाळा अपग्रेड करणे ही दोन उद्दिष्टे आहेत. या विधायक उद्दिष्टाला बँक ऑफ बडोदाचा पाठिंबा आहे आणि या उपक्रमाशी सहयोग केल्याचा बँक ऑफ बडोदाला अभिमान आहे.
या प्रसंगी बँक ऑफ बडोदाच्या पुणे झोनचे महाव्यवस्थापक श्री. मनिष कौरा म्हणाले, “श्री. कुमार अजवानी आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांना आम्ही दाद देतो आणि या उपक्रमाशी सहयोग करणे हा आमचा बहुमान आहे. हा उपक्रम आपल्या देशाच्या रक्षणकर्त्यांसाठी असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या “शौर्य का सम्मान – बँक ऑफ बडोदा की शान” या बँकेच्या बोधवाक्याशी सुसंगत आहे.

L to R: Shri Vikash Kumar, Regional Head, Bank of Baroda, Pune City Region; Col Vasant Ballewar (Retd), Dean & Deputy CEO; Brig. (Dr) Sanjeev Devasthali (Retd), Defence Banking Advisor, Bank of Baroda; Col Rahul Bali (Retd), CEO, QMTI; Shri Kumar Ajwani, Director FAB Foundation; Shri Parwinder Singh, Fellow Runner; Brig. D G Patwardhan, Station Commander, Kirkee Military Station (Commandant, BEG Centre), Shri Manish Kaura, General Manager, Bank of Baroda, Pune Zone.
खडकीचे स्टेशन कमांडर ब्रिगेडिअर डी. जी. पटवर्धन, पुण्यातील क्यूएमटीआयचे सीईओ कर्नल राहुल बाली (निवृत्त), आणि बँक ऑफ बडोदाच्या पुणे शहर विभागाचे विभाग प्रमुख श्री. विकास कुमार यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
बँक ऑफ बडोदाला धन्यवाद देताना श्री. कुमार अजवानी म्हणाले, “आत्मनिर्भर भारत रन ही धाव उपक्रम टीम फॅब फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला आहे. दिव्यांग सैनिकांबद्दल जागरुकता निर्माण करणे व निधी गोळा करणे आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे ही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत. बँक ऑफ बडोदाने दिलेल्या प्रायोजकत्वासाठी मी आभारी आहे आणि सैनिकांनी बँक ऑफ बडोदा सॅलरी पॅकेजची निवड करावी, असे मी आवाहन करतो.”
बँक ऑफ बडोदाने डिफेन्स बँकिंग व्हर्टिकल सुरू केले आहे आणि विविध केंद्रांवर डिफेन्स बँकिंग सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात ब्रिगेडियर (डॉ.) संचीव देवस्थळी डिफेन्स बँकिंग सल्लागार आहेत.
Be the first to comment on "बँक ऑफ बडोदातर्फे काश्मीर ते कन्याकुमारी आत्मनिर्भर भारत रन धावणाऱ्या अल्ट्रा-मॅरेथॉनपटू श्री. कुमार अजवानी यांचा सत्कार"