एयु स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने माजी आरबीआय डेप्युटी गव्हर्नर श्री एच. आर. खान यांची नॉन-एक्झिक्युटीव्ह इंडिपेंडन्ड डायरेक्टर म्हणून निवड

Shri H. R. Khan, Non-Executive Independent Director, AU Small Finance Bank
  • श्री. खान यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी डेप्युटी गव्हर्नर आणि एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून कामकाज पाहिलेत्यांच्या गाठीला बँकिंग अँड फायनान्सपेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्सइकनॉमिक्स अँड फायनान्शियल मार्केट्स क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आहे.    
  •  बँकेला आपल्या सदस्य मंडळात व्यावसायिकांचा समावेश करून बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात वैविध्यपूर्ण अनुभव विस्तार आणि बळकटीकरण करण्याचा प्रयत्न असून ही नियुक्ती म्हणजे त्याचाच भाग आहे.  

मुंबई, 29 डिसेंबर, 2021 (GPN): भारताची सर्वात मोठी स्मॉल बँकएयु स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने श्री हरून राशीद खान यांची नॉन-एक्झिक्युटीव्ह इंडिपेंडन्ट डायरेक्टर (अतिरिक्त संचालक) म्हणून सदस्य मंडळावर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ही नियुक्ती तीन वर्षांकरिता असून ती समभागधारकांच्या मंजुरीच्या अधीन आहे व 28 डिसेंबर 2021 पासून लागू होईल.

या नियुक्तीविषयी बोलताना एयु स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि सीईओ संजय अग्रवाल म्हणाले की, “बँकेच्या संचालक मंडळावर श्री. खान यांचे स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांना वित्तीय सेवा परिसंस्थेत असलेल्या दांडग्या अनुभवाचा फायदा नक्कीच बँकेला होणार आहे. कारण आम्ही आगामी काळातील बँकेच्या वृद्धीचा नकाशा आखला आहे. त्यांच्या आगमनाने योजनांना ताजा दृष्टिकोन मिळेल. त्यांच्या समवेत काम करण्याची बोर्डाला प्रतीक्षा आहे. ही नियुक्ती म्हणजे बोर्ड व त्यांच्या स्वातंत्र्याचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न आहे.

या नियुक्तीविषयी बोलताना एयु स्मॉल फायनान्स बँकेचे चेअरमन ऑफ द बोर्ड राज विकाश वर्मा म्हणाले की, “त्यांच्या बळकट नियामक पार्श्वभूमीसह आणि मध्यवर्ती बँकर म्हणून चार दशकांच्या समृद्ध अनुभवाच्या जोरावर श्री. खान यांची सदस्य मंडळावर करण्यात आलेली नियुक्ती स्वागतार्ह आहे. एक बँक म्हणून ताळेबंद विस्तारणेसदस्य मंडळात समावेश याचा बँकेची प्रशासकीय परिसंस्था वृद्धिंगत करण्यात मोठी मदत होणार आहे”.

श्री. एच. आर. खान यांना मध्यवर्ती बँकर म्हणून बँकिंग अँड फायनान्स, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स, इकनॉमिक्स अँड फायनान्शियल मार्केट्स क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आहे. त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात डेप्युटी गव्हर्नर आणि एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून नेतृत्वाचे पदभार सांभाळले आहेत. आरबीआय’मध्ये विविध क्षेत्रांत काम हाताळले असून फायनान्शियल मार्केट्स, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट, एक्सटर्नल इन्वेस्टमेंट, बँकिंग रेग्युलेशन अँड सुपरव्हिजन, आयटी ट्रान्सफॉरमेशन, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स, ट्रेनिंग अँड एचआर इनिशीएटीव्हज व फायनान्शियल इनक्लूजन निगडीत विविध प्रकल्पांत मुख्य भूमिका बजावली आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयु स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने माजी आरबीआय डेप्युटी गव्हर्नर श्री एच. आर. खान यांची नॉन-एक्झिक्युटीव्ह इंडिपेंडन्ड डायरेक्टर म्हणून निवड"

Leave a comment

Your email address will not be published.


*