मुंबई, 25 डिसेंबर, 2021 (GPN):- भारत सरकारच्या सुधारणा अजेंडाच्या अनुषंगाने आणि अर्थव्यवस्थेच्या सेवा न मिळालेल्या क्षेत्रांमध्ये भांडवलाचा प्रवाह सुधारण्यासाठी, पंजाब नॅशनल बँकेने सह-कर्ज देण्यासाठी “पैसालो डिजिटल लिमिटेड आणि वेदिका क्रेडिट कॅपिटल लिमिटेड” यांच्याशी करार केला आहे. या करारानंतर, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था एनबीएफसी (NBFC) आणि कमी किमतीच्या निधीची वाढती पोहोच यामुळे प्रमुख लाभार्थी एमएसएमई (MSME) आणि कृषी क्षेत्राला स्वस्त दरात निधी मिळू शकेल.
आरबीआयच्या को-लेंडिंग मॉडेल (CLM) अंतर्गत, बँका आणि एन बी एफ सी ग्राहकांना अनुक्रमे 80% आणि 20% या प्रमाणात कर्ज प्रदान करतील. तर या व्यवस्थेअंतर्गत, एनबीएफसी ग्राहकाशी थेट व्यवहार करेल आणि संपूर्ण निर्धारित कालावधीसाठी कर्जाची सेवा देईल.
यासंदर्भातील करारावर पीएनबीचे महाव्यवस्थापक (एमएसएमई), श्री.अशोक कुमार गुप्ता यांनी सीजीएम(CGM) श्री.सुरेंद्र कुमार दीक्षित आणि पीएनबीचे महाव्यवस्थापक (कृषी) श्री.अरुण शर्मा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. या करारांतर्गत सुरू करण्यात आलेली भागीदारी प्राधान्य क्षेत्रातील कर्ज वितरणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
Be the first to comment on "पंजाब नॅशनल बँकेने को-लेंडिंग व्यवसायासाठी पैसालो डिजिटल लिमिटेड आणि वेदिका क्रेडिट कॅपिटल लिमिटेड यांच्याशी करार केला"