बॉब फायनान्शिअल आणि भारतीय नौदलाने लाँच केले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड

  • भारतीय नौदलासह खास तयार करण्यात आलेले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड हे रुपे नेटवर्कवर संपर्करहीत ऑफरिंग म्हणून सादर करण्यात आले आहे
  • भारतीय नौदल कर्मचाऱ्यांना हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड 3 प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेप्रत्येक प्रकारामध्ये खास वैशिष्ट्ये आणि लाभ देण्यात येतील

मुंबई, 24 डिसेंबर 2021 (GPN): बँक ऑफ बडोदाच्या संपूर्ण मालकीची असलेली बॉब फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड (बीएफएसएल) आणि भारतीय नौदल यांनी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांसाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर केले आहे. को-ब्रँडेड क्रेडिट कार्डमध्ये संपर्करहीत फीचर्स आहेत आणि रुपे प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

64 वर्षे वयापर्यंतच्या भारतीय नौदल कर्मचाऱ्यांना को-ब्रँडेड क्रेडिट कार्डच्या 3 प्रकारांमधून निवड करता येणार आहे. याचा बेस व्हेरिअंट लाइफ टाइम फ्री (एलटीएफ) क्रेडिट कार्ड म्हणून ऑफर करण्यात येणार आहे. इतर दोन व्हेरिअंट अत्यंत आकर्षक जॉइनिंग व वार्षिक शुल्क भरून घेता येणार आहेत. त्याचप्रमाणे यासोबत आकर्षक स्वागत भेटी आणि सहज साध्य करण्याजोगे खर्चावर आधारीत शुल्क रिव्हर्सल/वेव्हरसह उपलब्ध होईल. स्वागत ऑफर म्हणून लाँच झाल्याच्या तीन महिन्यांपर्यंतच्या सर्व अर्जांना जॉइनिंग फी माफ केली जाईल. टॉप व्हेरिअंटअंतर्गत स्थानिक विमानतळांवर अमर्यादित लाउंज अॅक्सेस मिळेल आणि आंतरराष्ट्रीय खर्चावर मार्कअप कमी असेल.

सर्वच्या सर्व 3 व्हेरिअंटमध्ये आकर्षक बेस आणि वाढीव रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. वैयक्तिक अपघात विमा, 1% इंधन सरचार्ज वेव्हर, एलटीएप, अॅड ऑन, ईएमआय ऑफर आणि बॉब फायनान्शिअल व एनपीसीआयनी केलेल्या टाय-अप्सच्या माध्यमातून नियतकालिक मर्चंट ऑफर असे फीचर्स तीनही व्हेरिअंट्सना लागू असतील.

या वेळी भारतीय नौदलाचे कोमोडोर नीरज मल्होत्रा म्हणाले, “भारतीय नौदलाचे अधिकारी व खलाशी यांच्यासाठी बँक ऑफ बडोदाने ऑफ केलेली प्रोडक्ट्स आणि सोल्यूशन्सचे भारतीय नौदलाला कौतुक आहे. आम्ही विनंती केलेले सर्व फीचर्स आणि लाभ समाविष्ट करण्यासाठी आम्ही बीएफएसएलचे आभार मानतो, जेणेकरून  को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देत असलेल्या रोजच्या गरजेच्या सुविधाचा भारतीय नौदलाचे कर्मचारी लाभ घेऊ शकतील.”

या लाँचबद्दल बीएफएसएलचे एमडी  सीईओ श्रीशैलेंद्र सिंग म्हणाले, “भारतीय नौदलासोबत भागीदारी करणे हा आमचा बहुमान आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे. खास प्रकारे तयार करण्यात आलेली क्रेडिट कार्ड्स भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना अखंडित पेमेंट सुविधा व कम्फर्ट प्रदान करेल. भारतीय लष्कराला वेगवेगळी बँकिंग सोल्यूशन्स ऑप करून भारतीय लष्कराची सेवा करण्याचा बँक ऑफ बडोदाचा निर्धार या भागीदारीतून दिसून येतो.”

एनपीसीआयच्या सीओओ प्रवीणा राय म्हणाल्या, “भारतीय नौदल कर्मचाऱ्यांसाठी रुपे प्लॅटफॉर्मवर को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स  जारी करण्यासाठी बॉब फायनान्शिअलशी सहयोग केल्याचा आम्हाला आनंद आहे.  या भागीदारीच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या आप्तेष्टांना सुरक्षित, संपर्करहीत आणि समाधानकारक पेमेंट अनुभव देण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बॉब फायनान्शिअल आणि भारतीय नौदलाने लाँच केले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड"

Leave a comment

Your email address will not be published.


*