सोप्या व पेपरलेस प्रक्रियेने सोल प्रोप्रायटर्सना क्रेडिट रिपोर्ट्स उपलब्ध करून देण्यासाठी B2B आणि फिनटेक वेबसाइट्स केल्या सक्षम
मुंबई, 16 नोव्हेंबर, 2021 : एक्स्पिरिअन या जगातील आघाडीच्या ग्लोबल इन्फॉर्मेशन सर्व्हिस कंपनीतर्फे भारतात बिझनेस क्रेडिट रिपोर्ट लाँच करण्यात आला. याचा सोल प्रोप्रायटर्सना तसेच या प्रोप्रायटर्सना सेवा प्रदान करणाऱ्या फिनटेक्सना लाभ होणार आहे. या नव्याने लाँच केलेल्या सोल्यूशनमुळे प्रोप्रायटर्सना काही सेकंदांमध्ये B2B फिनटेक कंपन्यांच्या वेबसाइट्सवर आपला क्रेडिट रिपोर्ट तपासणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातून फिनटेक्ससुद्धा पर्सनलाइझ्ड फायनान्शिअल सोल्यूशन्स उपलब्ध करून देऊ शकणार आहेत. बिझनेस क्रेडिट रिपोर्ट प्राप्त करण्याच्या या विनाअडथळा प्रक्रियेसाठी कागदपत्रांची आवश्यकता नसते. परिणामी, कस्टमर्सच्या प्रवासातील खाचखळगे कमी होतात आणि त्यांना उत्तम अनुभव मिळतो.
प्रोप्रायटर्सना कर्जे उपलब्ध करून देत फिनटेक्सनी आर्थिक सर्वसमावेशकतेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पण, कर्ज देण्याविषयी उत्तम निर्णय घेण्याबद्दल फिनटेक्सना दोन मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. गेल्या काही वर्षात ग्राहक मिळविण्याचा वाढीव खर्च आणि सोल प्रोप्रायटर्सच्या पतपात्रतेची माहिती वेळेवर व सुरळीतपणे मिळविणे. या सोल्यूशनसह सोल प्रोप्रायटर्स कधीही त्यांचा बिझनेस क्रेडिट रिपोर्टचा अॅक्सेस करू शकतात. त्यामुळे त्यांचे फिनटेक भागीदार त्यांना जलद व अधिक कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात. या रिपोर्टमध्ये प्रोप्रायटरच्या ऋणांसंबंधीची आणि पेमेंट्सबद्दलची सर्व माहिती समाविष्ट असते. या रिपोर्टमध्ये क्रेडिट स्कोअर, ट्रेडलाइन्स, परतफेडीचा इतिहास, अकाउंट क्लासिफिकेशन, कर्जाचा सारांश (विविध कर्जदारांकडून घेतेलेल्या कर्जाचा हिस्सा), या आधी केलेली कर्जाची चौकशी इत्यादी माहितीचा समावेश असतो.

Mr. Neeraj Dhawan, Managing Director, Experian-India (एक्स्पिरिअन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नीरज धवन)
या नावीन्यपूर्ण ऑफरिंगबद्दल मनोगत व्यक्त करताना एक्स्पिरिअन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नीरज धवन म्हणाले, “एमएसएमई क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी अलिकडील काळात अनेक धोरणे आणि नियमने उत्प्रेरक ठरली आहेत. भारतात सुमारे 6.3 कोटी एमएसएमई आहेत आणि 2019 ते 2020 या वर्षांमध्ये एमएसएमई क्षेत्र 18.5% च्या सीएजीआरने वाढले. आर्थिक वर्ष 2021मध्ये एमएसएमईंना केलेल्या कर्जवाटपाचा आकडा रु. 9.5 ट्रिलिअन इतका आहे. म्हणजे आर्थिक वर्ष 2020च्या तुलनेत ही तब्बल रुपये 6.8 ट्रिलिअन म्हणजे 40% नी वाढ आहे. पण, सध्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेत अडचणी आहेत. प्रोप्रायटर्सना माहिती मिळणे आणि फिनटेकना पर्सनलाइझ्ड सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्यासाठी या माहितीचा उपयोग करून घेणे सहज शक्य नाही.
एक्स्पिरिअनमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रगती व अभिनवतेला चालना देण्यासाठी आम्ही डेटाच्या ताकदीचा उपयोग करतो. प्रोप्रायटर्स आणि फिनटेक यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या आव्हानांचा विचार करता, बिझनेस क्रेडिट रिपोर्ट या आमच्या नव्या सोल्यूशनचे उद्दिष्ट आहे की, प्रोपराटयर्सना कर्ज सुलभपणे उपलब्ध करून देणारी परिसंस्था तयार करणे आणि त्यांना अधिक चांगली व अधिक पर्सनलाइझ्ड ऑफरिंग देणे शक्य झाले पाहिजे. प्रोप्रायटर्सकडे आपल्या कर्जाविषयीच्या माहितीचे नियंत्रण असले पाहिजे आणि मार्केटमधून मिळणाऱ्या इतर ऑफरिंगच्या तुलनेने एक्स्पिरिअन बिझनेस क्रेडिट रिपोर्ट एक मोठा अडथळा दूर करतो.”
बिझनेस क्रेडिट रिपोर्टसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान विकासाची आवश्यकता नसल्याने आणि एक्स्पिरिअनच्या एपीआयच्या माध्यमातून तो सहज अॅक्सेसिबल असल्याने फिनटेक्स काही दिवसांमध्ये बिझनेस क्रेडिट रिपोर्ट उपलब्ध करून देऊ शकतात. या व्यतिरिक्त एपीआय कॉन्फिगरेशनमुळे भागीदार ऑरगनायझेशन्सना त्यांचा स्वतःचा ग्राहक प्रवास डिझाइन करता येतो. त्यामुळे ग्राहकाचा सर्वंकष अनुभव कस्टमाइझ आणि अधिक चांगला करता येतो.
Be the first to comment on "आपल्या फर्मच्या आर्थिक आरोग्याचे मूल्यमापन करण्यासाठी सोल प्रोप्रायटर्सना मदत करण्यासाठी एक्स्पिरिअन इंडियाने लाँच केला बिझनेस क्रेडिट रिपोर्ट"