
Vicky Kaushal
- बॉलीवूडच्या हार्टथ्रोब अभिनेत्याला बेयर ग्रिल्ससोबत त्याच्या भीती, कुटुंब, करिअर आणि बरेच काही विषयांबद्दल खुलेपणाने संवाद साधतांना बघा!
- इनटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स आणि विकी कौशल हे डिस्कव्हरी+ एक्सक्लुझिव्ह 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 6 वाजता फक्त डिस्कवरी+ वर त्याचे पॉवर-पॅक स्पेशल रिलीज करणार आहेत.
बेयर ग्रील्स आणि विक्की कौशल सोबत इंटू द वाइल्डसाठी ट्रेलर लिंक: XX
बेयर ग्रील्स आणि विक्की कौशल सोबत इंटू द वाइल्डसाठी पोस्टर लिंक: XX
मुंबई, 10 नोव्हेंबर 2021 (GPN) :डिस्कव्हरी इंडियाने नुकतेच आपले खास इंटू द वाइल्ड विद बेयर रिलीज केले आहे. ग्रिल्स आणि अजय देवगण सर्वात लोकप्रिय आणि आवडत्या फ्रँचायझी मधील वर्षातील सुपर हिट इन्फोटेनमेंट शो म्हणून भरपूर प्रसिद्दी मिळविली आहे. माजी सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांसारख्या उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वांचा समावेश असलेला साहसी शो, डिस्कव्हरी+ सीझन 2 मधील आणखी एक आकर्षक स्पेशल घेऊन परतला आहे, ज्यामध्ये बॉलीवूडचा हार्टथ्रॉब आणि सर्वात पात्र बॅचलर, विकी कौशल झळकणार आहे, जिथे जोश सर्वकालीन उच्च पातळीवर पाहावयास मिळेल. बलाढ्य हिंदी महासागरात शूट केलेले, डिस्कव्हरी आज त्याच्या सुपर हिट इन्फोटेनमेंटचा शो ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. बॉलीवूडचा डायनॅमिक देखणा उगवता तारा विकी कौशल आणि जागतिक साहसी बेयर ग्रिल्ससोबत या महासागरात मार्गक्रमण करून, कठीण परिस्थितीत कसे जगायचे व सभ्यतेकडे शाबूत कसे परत यावे दाखवणार आहेत ..
या एक्सक्लूसिव डिस्कवरी+ओरिजिनल मध्ये वास्तविक जीवनातील लष्करी माणूस साहसप्रिय बेयर ग्रिल्स आणि कलाकार लष्करी व्यक्ति विकी कौशल या दोघांची मगरी, शार्क आणि सापांचे वर्चस्व असलेल्या खारफुटीच्या क्लस्टरमध्ये अनिश्चित भरती आणि हवामाना असतांना जगण्याची मोहीम सुरू होते. आव्हानांचा प्रवाह त्यांच्या सुप्त ताकदीमध्ये गुंजत असताना, ही जोडी मात्र निडरपणे मार्गस्थ होते आणि सहज गप्पा मारताना दिसते, जिथे तो स्वत: बद्दल पूर्वी कधीही न सांगलेल्या गोष्टी उलगडतो. विकीला अशा आव्हानांचा सामना करावा लागतो ज्याचा त्याने कधीही स्वप्नातही विचार केला नसेल आणि तो त्याच्या खोल समुद्रातील पाण्याच्या फोबियाचा सामना करण्याचा आणि या अॅड्रेनालाईनने भरलेल्या मोहिमेवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
“जगप्रसिद्ध साहसी बेयर ग्रिल्ससोबत या उत्तरजीविता (सर्वाइवल ) मोहिमेवर जाणे हा एक अद्भुत अनुभव होता. जर तो नसता तर मी या विशाल समुद्रात पोहण्याच्या माझ्या भीतीवर मात करू शकलो नसतो. हा प्रवास माझ्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे कारण मी माझ्या अनेक भीतींपैकी एकावर मात करू शकलो आणि त्यावर विजय मिळवू शकलो. समुद्राच्या मधोमध असण्याचा आणि तुमच्या खाली मजला नसण्याचा विचार सोपा नाही, पण बेयरच्या सततच्या प्रेरणा आणि दृढनिश्चयाने मला यातून विजयीपणे बाहेर पडण्यास मदत केली आहे.” विकी कौशलने या अत्यंत टोकाच्या साहसाबद्दलचा त्याचा अनुभव शेअर केला.
“विकी बर्याच पातळ्यांवर एक अविश्वसनीय पाहुणा होता… आम्ही फक्त पृथ्वीवरील सर्वात प्रतिकूल खारफुटीच्या दलदलीत होतो असे नाही, तर त्याला शार्कने भरलेल्या माशांसह खुल्या समुद्रात पोहणे त्यांच्यासाठी एक मोठा अडथळा होता! त्याची जीवनकथा आणि सुपर स्टारडमचा त्याचा मार्ग खूप नम्र करणारा आहे आणि त्याचा उबदार, सहवास नेहमीच प्रेरणादायी असतो. या प्रवासात तुम्हाला विकीची एक अतिशय प्राकृतीक , वैयक्तिक बाजू पाहायला मिळेल आणि त्याने खरोखरच त्याच्या भीतीवर ज्याप्रकारे विजय मिळवला याचा मला अभिमान आहे.”, बेयर ग्रिल्सने विकी कौशलसोबतच्या त्याच्या साहसाबद्दल कौतुकाने सांगितले.
“सतत प्रेम आणि कौतुकाने आम्हाला अधिक चांगल्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले आहे. अजय देवगणच्या एपिसोडला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्ही भारावलेलो आहोत आणि सणासुदीच्या काळात तुम्हा सर्वांचे मनोरंजन करत राहण्यासाठी आम्ही विक्की कौशलचा आणखी एक खास एपिसोड घेऊन आलो आहोत. बेयर ग्रिल्स सोबतचा आमचा प्रवास खूप वर्षापासूनचा आहे आणि दीर्घकाळ टिकून राहिलेला आणि समृद्ध करणारा संबंध आहे. यावेळी आम्हाला खात्री आहे की बॉलीवूडचा उगवता तारा विकी कौशल याच्यासोबत त्याचे उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व आणि या दोघांमधील सौहार्दपूर्ण भावना या शोला आवर्जून पाहण्यास भाग पाडेल!” मेघा टाटा, व्यवस्थापकीय संचालक- दक्षिण आशिया, डिस्कव्हरी इंक म्हणाल्या.
इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रील्स (Into The Wild with Bear Grylls) हे मॅन वर्सस वाइल्ड द्वारे प्रेरित एक अभिनव स्वरूपात साकारलेली जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वाइल्डनेस सर्व्हायव्हल टेलिव्हिजन मालिकेपैकी एक आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि भूतकाळातील सदाबहार अक्षय कुमार यांचा समावेश आहे. अजय देवगण हा बेयर ग्रिल्ससोबत त्याच्या साहसी प्रवासावर जाणारा सर्वात अलीकडील पाहुणा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त, बेयर ग्रिल्सने या अगोदर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, केट विन्सलेट, रॉजर फेडरर, ज्युलिया रॉबर्ट्स आणि इतर अनेक नामांकित सेलिब्रिटींनी त्यांची आतिथ्य स्वीकारले आहे. इंटू द वाइल्ड वीद बेयर ग्रील्स ची निर्मिती डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडियासाठी नॅचरल स्टुडिओ आणि बनजय एशिया यांनी केली आहे.
डिस्कवरी+ वर इंटू द वाइल्डचा प्रीमियर इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलुगु, बांगला, मल्याळम आणि कन्नडसह ७ भाषांमध्ये उपलब्ध असेल.
Be the first to comment on "बेअर ग्रिल्सने विकी कौशलला या वर्षाच्या सर्वोच्च सुपर हिट इन्फोटेनमेंट शो ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ मध्ये त्याच्या भीतीवर मात करण्यास कशी मदत केली"