
Viviana Mall, Thane
मॉलला भेट दिल्यास कॅश-वावचर्स आणि ॲपल आयफोन 13 जिंकण्याची संधी
मुंबई: आमच्या ग्राहकांना झगमगाटात खरेदी करण्याचा अनुभव मिळावा यासाठी मॉलच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेत भरपूर प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. 20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2021 दरम्यान ‘शॉप अँड विन’ ही धमाकेदार ऑफर सुरू करत असल्याचे विवियाना मॉलतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
विवियाना मॉलच्या ‘शॉप अँड विन’ स्पर्धेमध्ये या दिवाळीसाठी अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहे. जे ग्राहक रु. 2000/- किंवा त्यावरील खरेदी करतील ते नोंदणीकरीता पात्र ठरतील.
दररोज, दोन भाग्यवान विजेत्यांची नावे जाहीर केली जातील आणि त्यांना प्रत्येकी रु. 2500/- रुपयांचे गिफ्ट वावचर मिळेल. 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान एका भाग्यवान ग्राहकाला 5000 रुपयांचे बंपर वावचर जिंकता येणार आहे.
20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर, 2021 दरम्यान प्रत्येक शनिवारी आणि रविवारी एका भाग्यवान ग्राहकाला ब्रँड न्यू ॲपल आयफोन 13 जिंकण्याची संधी मिळेल.
दिवाळीच्या आठवड्यात आमच्याकडे खरेदी करणार्या आमच्या विशेष व्ही क्लब मेम्बर्सना 2x पॉईंटस् मिळतील आणि 20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2021 दरम्यान, दर शुक्रवारी आणि रविवारी जे ग्राहक सर्वाधिक रकमेची खरेदी करतील त्यांना 2500 रुपयांचे गिफ्ट वावचर मिळेल.
आधीच्या प्रत्येक दिवाळीप्रमाणेच या ही वर्षी विवियाना मॉलने त्यांच्या तेजस्वी आणि चमकदार सजावटीच्या माध्यमातून एक रोमांचकारी अनुभव आणि सणाची वातावरण निर्मिती करण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावले आहे. दिवाळीतील रंगीबेरंगी वस्तूंनी सजलेला मॉल आणखीनच मोहक दिसत आहे. मॉलच्या आवरापासून ते पार्किंगपर्यंत सर्वच ठिकाणी लावण्यात आलेल्या आकर्षक आकाशकंदीलांमुळे आणि रंगीबेरंगी एलईडीजमुळे सणाची रंगत आणखीनच वाढली आहे.
Be the first to comment on "विवियाना मॉलमध्ये दिवाळीच्या निमित्ताने इन्स्टंट शॉप अँड विन ऑफर्स आणि एलॅबोरेट डेकॉरचा झगमगाट"