१२४ किलो बांग्लादेशिय महिलेवर पहिली ‘ट्रू रोबोटिक बॅरिऍट्रिक सर्जरी’ अति वजनामुळे महिलेस ब्लडप्रेशर, शुगर, एपिलेप्सी, थायरॉईड, गॉलस्टोन सारखे गंभीर आजार होते

Apollo Hospitals

नवी मुंबई, २० सप्टेंबर  २०२१ (GPN):-  अपोलोत भारतातील पहिली ट्रू रोबोटिक बॅरिऍट्रिक सर्जरी बांग्लादेशातील ५० वर्षीय महिलेवर केली गेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष ज्ञान व नैपुण्ये उपलब्ध असण्याबरोबरीनेच अपोलो हॉस्पिटल्सने ८ सप्टेंबर २०२१ रोजी आणखी एक रोबोटिक टप्पा यशस्वीपणे पार केला, जेव्हा अपोलो हॉस्पिटल्सचे संचालक व लीड बॅरिऍट्रिक सर्जन डॉ. राज पलानी अप्पन यांनी भारतातील पहिली संपूर्णतः रोबोटिक गॅस्ट्रो इंटेस्टिनल सर्जरी केली. बांग्लादेशातील ५० वर्षीय महिला श्रीमती तानिया, अतिजाडेपणाने आजारी होत्या, त्यांचे वजन १२४ किलोग्रॅम आणि बीएमआय ५१ किलोग्रॅम/एम२ होते. त्यांना अनेक आजार होते, आधी एक ब्रेन ट्युमर सर्जरी (एस्ट्रोसायटोमा) झालेली होती, एपिलेप्सी (उपचार सुरु आहेत), उजव्या पायात कमजोरी, मेंदूच्या आजारानंतर शरीर सुन्न पडण्याचा त्रास, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया, थायरॉयडेक्टॉमी सर्जरीनंतर थायरॉईड औषधे सुरु आहेत, शिवाय गॉलस्टोन आणि फायब्रॉईड गर्भाशयासाठी त्यांच्या पोटावर दोन सर्जरी झाल्या आहेत. त्यांना नुकताच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि डिस्लिपिडेमिया देखील झाला आहे. वजन खूप जास्त असल्याने त्या जास्तीत जास्त वेळ व्हीलचेयरवर घरातच असायच्या आणि वरील सर्व आजार असल्याने अतिशय भयानक स्थितीचा सामना करत होत्या. मेडिकल इमर्जन्सीमुळे त्यांच्यावर बॅरिऍट्रिक प्रक्रिया करावी लागली. 

Apollo Hospitals

अपोलो हॉस्पिटल्सचे संचालक व लीड बॅरिऍट्रिक सर्जन, डॉ. राज पलानी अप्पन यांनी सांगितले, “दोन टप्प्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने सर्जरी करण्यात अनेक समस्या आणि जोखीम असल्याने या रुग्णासाठी ऑपरेशननंतरची गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि सुरक्षेच्या बरोबरीनेच रिकव्हरी वाढवण्यासाठी एकमेव उपाय रोबोटिक सर्जरी हा होता. त्यामुळे आम्ही संपूर्णतः रोबोटिक दृष्टिकोनासाठी नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या श्युअरफॉर्म स्टेपलरसह आवश्यक सर्व सामग्री खरेदी करण्यासाठी इंट्यूटिव्ह सर्जिकलच्या माध्यमातून व्यवस्था केली. या स्टेपलरमध्ये मल्टीडायरेक्शनल मुव्हमेंट आणि ९० अंश आर्टिक्युलेशन होते, ज्यामुळे सर्जरीमध्ये पोट आणि आतड्यांना स्टेपल करण्यातील समस्या बऱ्याच प्रमाणात कमी केल्या गेल्या. संपूर्ण सर्जरी रोबोटिक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सात रोबोटिक स्टेपलर्स वापरले गेले. रोबोटिक टाके अचूक असल्याने अशा प्रतिकूल स्थितीमध्ये अनॅस्टमॉटिकचा कठीण टप्पा सहजशक्य झाला आणि सर्जरी पूर्ण करू शकलो. ही प्रक्रिया जगातील पहिली रोबोटिक बॅरिऍट्रिक सर्जरी आहे जी फक्त तीन पोर्ट्समध्ये केली गेली.”

सर्जरी जवळपास १५० मिनिटे सुरु होती रुग्ण भूल व सर्जरीतून व्यवस्थित बाहेर येऊ शकली. ट्रू रोबोटिक सर्जरी हायब्रीड रोबोटिक सर्जरीच्या तुलनेत पेशींना कमी आघात पोहोचवते आणि त्यामुळे रुग्णाला व्हेंटिलेटर किंवा आयसीयू केयरमध्ये न्यावे लागत नाही आणि तब्येतीत देखील सुधारणा होऊ लागते. सर्जरीच्या १२ तासांत रुग्णाला तोंडाने द्रव पदार्थ देणे सुरु केले, ४८ तासांत महिला आधाराशिवाय हालचाली करू लागल्या आणि सर्जरीनंतर चौथ्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमधून घरी देखील पाठवण्यात आले. सर्जरीच्या नंतर आता रुग्णाची तब्येत ठीक आहे आणि त्यांचे वजन ४ किलोग्रॅम कमी झाले आहे त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण आणि रक्तदाब आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. या प्रक्रियेमुळे त्या एक वर्षभरात जवळपास ४० किलोग्रॅम वजन कमी करू शकतील, व्यवस्थित चालू शकतील आणि जवळपास एका दशकभरात त्यांची शारीरिक स्थिती पूर्णपणे सामान्य होऊ शकेल.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "१२४ किलो बांग्लादेशिय महिलेवर पहिली ‘ट्रू रोबोटिक बॅरिऍट्रिक सर्जरी’ अति वजनामुळे महिलेस ब्लडप्रेशर, शुगर, एपिलेप्सी, थायरॉईड, गॉलस्टोन सारखे गंभीर आजार होते"

Leave a comment

Your email address will not be published.


*