एयू स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक वर्ष २०२१मध्ये करोत्तर नफ्यामध्ये नोंदविली ७३% वाढ

आव्हानात्मक परिस्थितीत स्थिर  कामगिरी

मुंबई,30 एप्रिल 2021 (GPN): एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या तिमाहीसाठीचे आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे ऑडिटेड आर्थिक निकाल मंजूर केले.

ठळक मुद्दे (आर्थिक वर्ष २०२१)

Ø     सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतही स्थिर कामगिरी

Ø     आव्हानात्मक परिस्थिती असूनही बँकेला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ~२३.४% चा (आवास स्टेकच्या विक्रीमधून मिळालेली नफा समाविष्ट करून) आणि १२.०%चा (आवास स्टेक वगळून) इक्विटीवरील परतावा डिलिव्हर केला

·         आवासच्या विक्रीतून मिळालेला नफा समाविष्ट करून रु.१,१७१ कोटी करोत्तर नफा, गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी ७३% वाढ, आवास वगळून करोत्तर नफा रु.६०० कोटी

·         आर्थिक वर्ष २०२१च्या पहिल्या सहामाहितील वितरण काहीसे थंडावलेले असूनही व्यवस्थापनांतर्गत मत्ता गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी २२% वाढली.

·         गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी डिपॉझिट्समध्ये ३८% वाढ झाली

·         CASA रेश्यो १४% वरून २३% पर्यंत वाढला

·         गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी व्यवसायासाठी वापरलेल्या रकमेवरील व्याजदर (कॉस्ट ऑफ फंड्स) ८६ बीपीएस ने कमी होऊन तो ६.८% इतका होता

·         अॅडव्हान्सेसच्या २.९% एकूण तरतूद

·         टिअर १ रेश्यो १८.४% वरून २१.५% झाला

Ø    पोर्टफोलिओच्या कामगिरीमुळे आमच्या कस्टमर सेगमेंटमध्ये, अॅसेट क्लास आणि क्रेडिट अंडररायटिंगमध्ये विश्वास वाढविला

Ø    तंत्रज्ञानाधारीत बँक होण्यासाठी महत्त्वपूर्ण केली:

·         तिसऱ्या तिमाहीमध्ये नवीन मोबाइल बँकिंग सुपर अॅप लाँच केले. यात पेमेंट व लाइफस्टाइल सेवांचा संपूर्ण संच समाविष्ट होता; २०२१ सालातील पहिल्या तिमाहीमध्ये १०+ नवीन उत्पादने आणि सेवा साधनांची भर घातली.

·         क्रेडिट कार्ड्स, व्हिडियो बँकिंग आणि यूपीआय क्यूआर लाँच केले

·         २०२१च्या चौथ्या तिमीहीमध्ये डिजिटल स्वीकारार्हतेमध्ये लक्षणीय वाढ झाली, नव्या मोबाइल बँकिंग अॅपमुळे यासाठी चालना मिळाली – ४ लाखांहून अधिक ग्राहकांनी रजिस्टर केले, तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेने ही २७% वाढ होती

Ø    भारतभर अस्तित्व निर्माण करण्यासाठी फ्रेन्चायझीमध्ये गुंतवणूक करण्यात आली

·         आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ३७ नवीन शाखांची भर घातली

·         १५ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७४४ टच पॉइंट्स (मार्च २०मध्ये ६४७ होते, त्यात वाढ केली)

·         कोव्हिड संबंधित विमा, कर्मचारी घट नाही, पगारवाढ आणि बोनसेसचे वितरण यासारखे उपक्रम राबवून कर्मचाऱ्यांचे हित साधले

आर्थिक ठळक मुद्दे

·         सर्व महत्त्वाच्या व्हर्टिकल्समधील वाढ आर्थिक वर्ष २०२१च्या चौथ्या तिमीहीत कोव्हिडपूर्व स्थितीमध्ये आली

·         २०२१च्या चौथ्या तिमाहीमधील वितरण गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी ६३% वाढले

·         शाखेतील बँकिंग, अधिक सखोल प्रतिबद्धतेला चालना देण्यावर भर देण्यात आला 

·         ३१ मार्च २१ रोजी कासा (CASA) रेश्यो २३% होता जो ३१ डिसेंबर २०२० रोजी २२% होता आणि ३१ मार्च २०२० रोजी १४% होता

·         वैयक्तिक बँकिंगचे डिपॉझिट्समधील योगदान गेल्या वर्षी ४१% होते ते या वर्षी ५८% झाले

·         आर्थिक वर्ष २०२१साठी एकूण कॉस्ट ऑफ फंड्स ६.८% होती – आर्थिक वर्ष २०२०च्या तुलनेने ८६ बीपीएसने घट झाली

·         आर्थिक वर्ष २०२१ मध्ये वाढीव खर्च ५.९% होता – जो आर्थिक वर्ष २०२० पेक्षा १४० बीपीएसने कमी होता 

·                     GNPL गेल्या तिमाहीमध्ये ३.७% होता, तो वाढून ४.३% झाला आहे.

·         या वाढीला १.५% ग्राहकांमुळे चालना मिळाली जे <९०डीपीडी आहेत आणि पेमेंट करत आहेत, पण एके काळी ते एनपीए होते आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने एनपीए टॅगिंगवरील स्थिगिती रिक्त केल्यामुळे त्यांना एपीएन म्हणून टॅग करण्यात आले होते; आम्हाला, नियमात बसविण्यासाठी ONAN पूलची मेजॉरिटी अपेक्षित आहे

·         ३१ डिसेंबर २०२० रोजी ९०+ डीपीडी एनपीए खाती ३.३% होती ती कमी होऊन ३१ मार्च २०२१ रोजी २.७% झाली

·         रु.१,०३७ कोटीची एकूण तरतूद, जी ढोबळ अॅडव्हान्सेसच्या २.९% आहे

·         जीएनपीएलवर ५०% चे प्रोव्हिजन कव्हरेज; ~ ६०% पीसीआर >९०डीपीडी जीएनपीएलच्या बदल्यात

·         एकूण तरतुदीमध्ये ₹ ७० कोटींची आकस्मिकता तरतूद

·         आवासच्या विक्रीमधून मिळालेला नफा समाविष्ट करून रु. १,१७१ कोटींचा करोत्तर नफा, गेल्या वर्षीच्या तुलनेने ७३% वाढ, आवासपूर्व नफा ₹६०० कोटी

·         क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंटच्या (रु.६२५ कोटी) संकलित केलेली इक्विटी आणि आवास स्टेकच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम (₹६५१ कोटी) यामुळे बॅलेन्स शीट अधिक बळकट झाली; टिअर १ रेश्यो १८.४% वरून वाढून २१.५% झाला.

·         आर्थिक वर्ष २०२१ मध्ये २.५% चा (आवास स्टेकच्या विक्रीमधून मिळालेली नफा समाविष्ट करून) आणि १.३%चा (आवास स्टेक वगळून) मत्तांवरील परतावा डिलिव्हर केला; 

·         आर्थिक वर्ष २०२१ मध्ये २३.४% चा (आवास स्टेकच्या विक्रीमधून मिळालेली नफा समाविष्ट करून) आणि १२.०%चा (आवास स्टेक वगळून) इक्विटीवरील परतावा डिलिव्हर केला; 

या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना एयू स्मॉल फायनान्स बकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्रीसंजय अगरवाल म्हणाले

“आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या सहामाहीत आव्हानात्मक परिस्थिती असूनही आमची कामगिरी अत्यंत स्थिर राहिली. आम्ही आमच्या मत्तांचा दर्जा राखू शकलो, बॅलेन्स शीट बळकट केली, आमच्या डिपॉझिट्सची वैविध्यता वाढली, आमच्या शाखेमध्ये येऊन करण्यात आलेल्या बँकिंग व्यवहारांमध्ये आणि डिजिटल प्रॉपर्टींमध्ये वाढ करू शकलो. सर्वोत्तम ग्राहकाभिमुख तंत्रज्ञानाधारीत बँक होण्यासाठी आम्ही अनेक डिजिटल उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भविष्यातील संधींचा लाभ घेण्यासाठी आमच्या अलीकडे झालेल्या भांडवलवृद्धीमुळे आमची स्थिती अधिक बळकट झाली आहे. 

सध्याच्या कसोटीच्या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून देशाची सेवा करता आल्यामुळे आम्हाला समाधान वाटत आहे. या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बदलत आहे, सध्या सुरू असलेल्या लसीकरण अभियानामुळे आणि सरकारने उचललेल्या पावलांमुळे नजीकच्या भविष्यात परिस्थिती स्थिर होईल, अशी आम्हाला आशा आहे.

*माननीय सर्वोच्च न्यायालयाने एनपीए वर्गीकरणावरील स्थिगिती रिक्त करण्याच्या आदेशाचे पालन करत ३१ डिसेंबर २०२० रोजी GNPA (३१ डिसेंबर २०२० रोजी प्रो-फॉर्मा ९० + डीपीडी आणि एनपीए म्हणून एकदा टॅग केल्यावर प्रो-फॉर्मा) ₹१,११६ कोटी किंवा ग्रॉस अॅडव्हान्सेसच्या ३.७% (आर्थिक वर्ष २०२१च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ३.३% प्रो-फॉर्मा ९०+ डीपीडी नोंदविण्यात आला होता)

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक वर्ष २०२१मध्ये करोत्तर नफ्यामध्ये नोंदविली ७३% वाढ"

Leave a comment

Your email address will not be published.


*