मुंबई, 8 मार्च 2021 (GPN): रिलायन्स कॅपिटलची 100 टक्के सहाय्यक कंपनी असणार्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सने नेल्सन रिसर्च एजन्सीच्या माध्यमातून एका सर्वेचे आयोजन केले होते. आरोग्य विमा गुंतवणुकीत महिलांचा सहभाग आणि त्यांची मानसिकता यांचा अभ्यास करण्यासाठी हा सर्वे घेण्यात आला होता. आर्थिक दूरदृष्टी आणि स्वातंत्र्याला प्रोत्साहन देऊन हजारो महिलांना आत्मनिर्भर करणे हे आरजीआयचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या सर्वेच्या अहवालानुसार 98 टक्के महिलांना असे वाटते की, आरोग्य विमा योजना अधिकाधिक महिला केंद्रीत बनवण्याची गरज आहे. त्यामध्ये मासिक पाळी, हार्मोनल समस्या, पीसीओडी उपचार, पोस्टपर्टम सिंड्रोंम संबंधीत मानसिक आजार, ऑस्टीओपोरोसीस उपचार आदींचा आरोग्य विमा योजनेत समावेश होणे आवश्यक आहे. घरी तसेच कामाच्या ठिकाणच्या तणावामुळे महिलांना अनेक आरोग्य विषयक समस्यांना सामारे जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य विमा खूप महत्वाचा आहे महिलांचे शरीर हे पुरुषांच्या तुलनेत खूप वेगळे असल्यामुळे त्यांना संधीवात, स्तनांचा कर्करोग, स्वयं-रोगप्रतिकारक रोग, मासिक पाळी, हार्मोनल आजार यासारख्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. सर्वेतून निदर्शनास आले आहे की, विमा पॉलिसी खरेदी करीत असताना महिला विमा कव्हरेजची रक्कम, कॅशलेस उपचारांची सुविधा देणारी हॉस्पिटल्स आणि विमा कंपनीची दावा सेटलमेंट क्षमता यांचा प्रामुख्याने विचार करतात.
कोविड – 19 साथीच्या काळात गेल्या वर्षभरात या आजाराशी मुकाबला करीत असतानाच महिलांना आरोग्य विम्याचे महत्वही लक्षात आल्याचे आढळून आले आहे. सर्वेच्या अहवालानुसार सुमारे 57 टक्के महिलांनी गेल्या वर्षभरातच आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केली आहे. त्या पॉलिसींपैकी तीन चतुर्थांश योजना किमान 15 लाख रुपयांचे कव्हरेज देणार्या आहेत. अहवालात पुढे म्हटले आहे की, आरोग्य विमा पॉलिसी अजूनही न घेतलेल्या 10 पैकी 7 महिला पुढील 6 महिन्यांत त्यासाठी गुंतवणूक करणार आहेत.
आर्थिक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एकूण 61 टक्के महिला स्वत: निर्णय घेऊन आरोग्य विमा पॉलिसीचा निर्णय घेतात. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेचा सर्वाधिक विचार करुन महिला याबाबत आपला अंतिम निर्णय घेतात. आरोग्य सेवांसाठी करावा लागत असणारा प्रचंड खर्च आणि आजारांची वाढती संख्या यांचा विचार करुन महिलांसाठी आरोग्य विमा योजना हा एक प्राधान्यक्रमाचा घटक बनत आहे.
जरी आरोग्य विम्याचा निर्णय घेण्याबाबत महिलांचा पुढाकार वाढत असला तरीही 10 पैकी सुमारे 7 महिला अशी पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यासाठी इतर कोणावर तरी अवलंबून असतात. अनेक महिलांच्या मते आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय त्यांचा स्वत:च अंतिम करता यावा, यासाठी त्यांना त्याबाबत अधिक माहिती.
Be the first to comment on "98 टक्के महिलांना वाटते आरोग्य विमा योजना अधिकाधिक महिला केंद्रीत बनवण्याची गरज"