
जळगाव दि. 23 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ५व्या स्मृतीदिनानिमीत्त जैन पाईप्सचा उपयोग करून 150 फूट लांब व 120 फूट रुंद असे सुमारे 18 हजार चौरस फुट असे मोठ्याभाऊंचे भव्य मोझ्याक आर्ट मधील पोर्ट्रटे जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे साकारत आहे. या कलाकृतीचे जागतिकस्तरावरील विक्रमाची नोंद होण्याची शक्यता.
भवरलालजी जैन यांचे हे पोट्रेट अत्यंत कल्पकतेने जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या सात दिवसात साकारले. ही कलाकृती कायमस्वरूपी स्थापित करण्यात आलेली आहे. जागतिक विक्रम प्राप्त होणाऱ्या या कलाकृतीला भाऊंच्या सृष्टीतील नयनरम्य अशा भाऊंच्या वाटिकेतून पाहता येणार आहे. भाऊंच्या ५व्या स्मृतिदिनानिमित्त म्हणजे गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी या कलाकृतीचे लोकार्पण करण्यात येईल.
Be the first to comment on "जैन पाईप्सचा वापर करून मोझ्याक आर्टमध्ये साकारते आहे भवरलाल जैन यांचे भव्य पोट्रेट वर्ल्ड रेकॉर्डची शक्यता"