एसबीआय जनरल सीएसआर उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील वाडा आणि चिमूर तालुक्यातील हजारो विद्यार्थिनींच्या स्वच्छताविषयक गरजांची खातरजमा
~ वाडा आणि चिमूरमधील शाळांमध्ये 15 स्वच्छतागृहांची उभारणी ~
मुंबई, 22 फेब्रुवारी, 2021 (GPN): एसबीआय जनरल इन्शुरन्स ही भारतातील अग्रगण्य सर्वसामान्य विमा कंपन्यांपैकी एक असून त्यांच्यावतीने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा आणि चिमूर तालुक्यातील विद्यार्थिनींकरिता 15 स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थिनींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम दिसून येण्यास मदत होईल.
एसबीआय जनरलच्या सीएसआर प्रकल्पातंर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण जिल्ह्यांमधील शाळांमध्ये विद्यार्थिनींकरिता 15 सुरक्षित स्वच्छतालयांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या स्वच्छतागृहांपैकी 5 मागील वर्षी उभारण्यात आली असून या सुविधेमुळे आगामी पाच वर्षांत 10,000 विद्यार्थिनींना फायदा होईल. या सुविधाचा दुहेरी परिणाम पाहायला मिळेल: यामुळे त्यांच्या स्वच्छताविषयक सवयीत मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतील तसेच शालेय शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने विद्यार्थिनींची पटसंख्या वाढेल. त्याशिवाय, या मुलींसाठी खास स्वच्छता आणि आरोग्य विषयक कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत. एसबीआय जनरल आणि लर्निंग स्पेस फाउंडेशनचे एकत्रित उद्दिष्ट एक पाऊल पुढे घेऊन जाताना ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय विद्यार्थिनीला स्वच्छतेच्या सुरक्षित सुविधा मिळत आहेत, याची खातरजमा करण्यात येईल. एसबीआय जनरल इन्शुरन्स’ने पालघरमधील एनजीओ लर्निंग स्पेस फाउंडेशन (एलएसएफ) सोबत भागीदारी केली आहे.
एसबीआय जनरल इन्शुरन्स’च्या प्रमुख- ब्रँड अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स शेफाली खालसा म्हणाल्या की, “एसबीआयजी’मध्ये आम्ही सुगम सीएसआर धोरणांचा अंगीकार करतो. ज्यांचे लक्ष विविध क्षेत्र आणि प्रकारांवर आहे. समाजातील दुर्बल घटकांतील बालकांचे शिक्षण या क्षेत्रावर आमचा विशेष भर आहे. या दिशेने योगदान देण्याच्या उद्देशाने मुलींचे शिक्षण, स्वच्छता आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आम्ही या प्रकल्पाची सुरुवात केली. शेतीशी संबंधित आणि आदिवासी जमातीतील नवयुवतींचे शाळेच्या हजेरीपटावर गळतीचे प्रमाण अधिक दिसते. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये स्वच्छतालयांची वानवा मुलींच्या गळतीमागचे प्रमुख कारण आहे”.
त्या पुढे म्हणाल्या की, “आमचे योगदान आणि या सीएसआर उपक्रमाविषयी आम्ही आशादायी आहोत. यामुळे शाळेच्या हजेरीपटावरून कमी होणाऱ्या विद्यार्थिनींना पाठबळ मिळेल. त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होईल.”
या भागीदारीच्या माध्यमातून स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या सवयींचे प्रशिक्षण देऊन त्या अंगिकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
Be the first to comment on "SBI General’s CSR initiative ensures hygiene requirements for thousands of girl students in Wada and Chimur talukas in Maharashtra"