टीसीएसच्या अनिरुद्ध दत्त यांनी ‘टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ’ चे विजेतेपद जिंकले
भारतातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध बिझनेस क्विझ असलेल्या टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझचे ऑनलाईन आयोजन
मुंबई, ११ डिसेंबर २०२० (GPN): टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मुंबईचे अनिरुद्ध दत्त यांनी टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२० मध्ये क्लस्टर ८ चे अंतिम विजेतेपद जिंकले आहे. भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्रसिद्ध बिझनेस क्विझ असलेल्या टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझचे यंदा प्रथमच संपूर्णपणे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.
क्लस्टर ८ अंतिम फेरीत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचे स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरी अतिशय अटीतटीची ठरली. भाग्यशाली विजेत्याला ३५,००० रु. रोख बक्षीस देण्यात आले, तसेच आता त्यांना राष्ट्रीय महाअंतिम फेरीसाठीच्या उपांत्य फेरीमध्ये देखील भाग घेता येणार आहे. डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडियाच्या सिद्धार्थ बॅनर्जी यांनी उपविजेतेपद पटकावले असून त्यांना १८,००० रु. रोख बक्षीस देण्यात आले.
नव्या सर्वसामान्य परिस्थितीमधील आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करत टाटा क्रुसिबलने यंदाच्या वर्षी पहिल्यांदा ही क्विझ व्हर्च्युअल फॉरमॅटमध्ये आयोजित केली. नव्या ऑनलाईन फॉरमॅटनुसार देशभरातील स्पर्धकांना १२ क्लस्टर्समध्ये विभागण्यात आले होते. ऑनलाईन प्रिलिम्सच्या दोन फेऱ्या पार पडल्यानंतर १२ क्लस्टर्समधून वाईल्ड कार्ड फायनल्ससाठी १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली असून त्यापैकी पहिले ६ स्पर्धक १२ ऑनलाईन क्लस्टर अंतिम फेऱ्यांमध्ये भाग घेतील. १२ क्लस्टर्सपैकी प्रत्येक क्लस्टरच्या विजेत्याला उपांत्य फेरीत सहभागी होता येईल आणि सरतेशेवटी उपांत्य फेरीतील सहा विजेते राष्ट्रीय महाअंतिम फेरीत पोहोचतील. टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझची राष्ट्रीय महाअंतिम फेरी डिसेंबर २०२० मध्ये होईल. राष्ट्रीय विजेत्याला २.५ लाख रुपयांचे महापारितोषिक तसेच प्रतिष्ठित टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल. सर्व अंतिम फेऱ्यांचे प्रक्षेपण टाटा क्रुसिबलच्या फेसबुक, ट्विटर आणि युट्युब चॅनेल्सवर करण्यात येणार आहे.
विख्यात क्विझमास्टर ‘पिकब्रेन’ गिरी बालसुब्रमण्यम यांनी आपल्या अनोख्या शैलीमध्ये या क्विझचे सूत्रसंचालन केले.
टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझची यंदाच्या वर्षीची बक्षिसे टाटा क्लिकमार्फत देण्यात येत आहेत. क्विझची तपशीलवार माहिती याठिकाणी उपलब्ध आहे – www.tatacrucible.com ENDS
Be the first to comment on "TCS’s Aniruddha Dutt wins Tata Crucible Corporate Quiz"