अपोलो आणि मेडट्रॉनिक कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे स्थापणार् अत्याधुनिक स्ट्रोक सेंटर्स

भारतात १.८ दशलक्ष लोकांना स्ट्रोकचा त्रास, स्ट्रोक हे आजघडीला मृत्यूंमागचे चौथे प्रमुख कारण
मुंबई, २९ ऑक्टोबर २०२० – अपोलो हॉस्पिटल समूहाने इंडिया मेडट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड या मेडट्रॉनिक पीएलसीच्या (एनवायएससी – एमडीटी) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीबरोबर भागिदारी केल्याचे जाहीर केले आहे. या भागीदारी अंतर्गत भारतात पहिल्यांदाच स्ट्रोक व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. यूएसएफडीएने स्ट्रोकच्या निदानासाठी मंजूर केलेल्या एआय प्लॅटफॉर्मला वैद्यकीय चाचण्यांची जोड मिळाली आहे. एआय सॉफ्टवेयर केवळ दोन मिनिटांत स्वयंचलित विश्लेषण करणार असून सद्या स्ट्रोकचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इमेजिंग पद्धतीमुळे हेच निदान करण्यासाठी एक तास लागतो. यामुळे स्ट्रोकदरम्यान प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असल्याने वेगाने निर्णय घेणे शक्य होणार आहे. या भागिदारीअंतर्गत मेडट्रॉनिक स्ट्रोक तंत्रज्ञान, तंत्रज्ञांचे कौशल्य, प्रशिक्षण आणि एआय प्लॅटफॉर्मचा समावेश असलेले सर्वसमावेशक स्ट्रोक व्यवस्थापन देशभरात अपोलो हॉस्पिटल्स असलेल्या दहा ठिकाणच्या अपोलो इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसमधे कार्यान्वित केले जाणार आहे. यातून स्ट्रोक निदानाची पद्धत प्रमाणित करून क्लिनिशियन्सना जास्त जलद व अचूक निदान करून त्याप्रमाणे उपचारपद्धती ठरवणे शक्य होणार आहे.
अपोलो हॉस्पिटल्स समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी म्हणाले, ‘’स्ट्रोक ही जगातील प्रमुख आरोग्यविषयक समस्या आहे. जागतिक स्ट्रोक संघटनेच्या अहवालानुसार २५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ४ पैकी १ व्यक्ती स्ट्रोकचा सामना करते. स्ट्रोक हे आजघडीला मृत्यूंमागचे चौथे प्रमुख कारण असून दरवर्षी भारतात १.८ दशलक्ष लोकांना स्ट्रोकचा त्रास होतो. लवकर निदान आणि वेळेवर उपचार झाल्यास या आजारामुळे होणारी विकृती आणि मृत्यूचे प्रमाण कमी होईल.डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून स्ट्रोकवरील उपचार आणि त्याचे व्यवस्थापन सुधारण्याची गरज आहे. आज एआय प्लॅटफॉर्म्समुळे रूग्णांची काळजी घेण्याची पद्धत आणि त्यातून मिलणारा निष्कर्ष दर दिवशी सुधारत आहे आणि अपोलो हॉस्पिटलमधे आम्ही, आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहोत. या भागिदारीअंतर्गत आम्ही अपोलो हॉस्पिटलचे वैद्यकीय कौशल्य, एआय प्लॅटफॉर्म आणि मेडट्रॉनिकचे स्ट्रोक तंत्रज्ञान एकत्र आणून देशातील स्ट्रोक उपचारांचे चित्र बदलले जाणार आहे. या भागिदारीसह अपोलो हॉस्पिटल सर्वसमावेशक स्ट्रोक व्यवस्थापनासाठी एआयचा संघटित आणि व्यापक पद्धतीने वापर करणाऱ्या दक्षिण आशियातील पहिल्या काही हॉस्पिटल्सपैकी एक ठरले आहे. त्याचबरोबर सेरेब्रल अन्जिओग्राम काढण्याची क्षमता असलेल्या ६४० स्लाइस सीटी स्कॅन उपलब्ध केल्याने रूग्णांना स्ट्रोक उपचारांतील अत्याधुनिक तांत्रिक सुविधांचा निश्चितच फायदा मिळेल.’’
मेडट्रॉनिक इंडियन सबकॉन्टिनेंटचे उपाध्यक्ष श्री. मदन कृष्णन म्हणाले, ‘मेडट्रॉनिक्स सातत्याने अक्युट येमिक स्ट्रोक (एयएस) विरोधात लढा देत असून त्याचाच एक भाग म्हणून आमच्या फिजिशियन सहकाऱ्यांना आपले कौशल्य समर्थपणे वापरता यावे यासाठी कंपनी अर्थपूर्ण स्ट्रोक तंत्रज्ञान पुरवण्यावर भर देते. भारतात स्ट्रोक तसेच त्याच्या पचारांविषयी जागरूकता वाढवण्याची तातडीची गरज आहे. रूग्णांचे जलद निदान करता यावे आणि त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी मेडट्रॉनिक्स देशभरातील हॉस्पिटल्सशी भागिदारी करून सेंटर ऑफ एक्सलन्स उभारत आहेत. आपल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने स्ट्रोक्सवरील उपचारांमधील दरी भरून काढण्याचे, डोर टु नीडल वेळ कमी करण्याचे व पर्यायाने रुग्णांना अधिक चांगले निष्कर्ष मिळवून देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. अपोलो हॉस्पिटलबरोबर केलेली ही भागिदारी भारतातील स्ट्रोकच्या रुग्णांना जलद गतीने दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्याच्या आणि या आजाराविषयी जागरूकता पसरवण्याच्या आमच्या ध्येयाला हातभार लावेल.’
एआय प्लॅटफॉर्मद्वारे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून नॉन- कॉन्टास्ट सीटी, सीटी अँजिओग्रापी, सीटी परर्फ्युजन आणि एमआरआया डिफ्युजन व परर्फ्युजन स्कॅन्सच्या दर्जेदार, अत्याधुनिक इमेजेस तयार केल्या जातात. या इमेजेसमुळे हॉस्पिटल्सना वेळेच्याबाबतीत संवेदनशील व गंभीर स्थिती हाताळण्यास किंवा स्थलांतर करण्याचे निर्य घेण्यास आणि रुग्णांना जास्त चांगला निष्कर्ष मिळवून देण्यात मदत होते. स्ट्रोक टीमला स्ट्रोक रुग्णांया मेंदुचे स्कॅन कुठेही असताना मोबाइल ऍप किंवा ईमेलवर पाहाता येतील आणि वेगाने निर्णय घेता येतील. इतर फायद्याबाबत सांगायचे झाल्यास, फिजिशियन्सना कुठूनही रुग्णांचे मूल्यमापन करता येईल आणि स्कॅनच्या एआय विश्लेषणात उपचारांचा सूचना मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष भेटता येतील. एआय यंत्रणेद्वारे क्लिनिशियन्सच्या स्ट्रोक रुग्णाच्या उपचाराशी संबंधित घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणारा कागदोपत्री पुरावाही तयार केला जाईल.
अपोलो हॉस्पिटल्स आणि मेडट्रॉनिक भागिदारीतून तयार होणाऱ्या सर्वसमावेश स्ट्रोक व्यवस्थापनामुळे रुग्णांना विविध फायदे मिळतील. स्ट्रोक व्यवस्थापनामदे एआय प्लॅटफॉर्मचा वापर केल्याने निदानाचा वेळ ६० मिनिटांवरून २ मिनिटांवर येणार आहे. वेळ वाचवणे म्हणजे मेंदूतील पेशी पाचवणे आहे, कारण प्रत्येक मिनिटाच्या दिरंगाईमधे मेंदूतील २ दशलक्षांपेक्षा जास्त पेशी मरतात. स्ट्रोकचा प्रभाव सुरू झाल्यापासून उपचारापर्यंतचा कालावधी लक्षणीय प्रमाणात कमी केल्यास निष्कर्ष सुधारण्यास, हॉस्पिटलमधील वास्तव्य कमी करण्यास मदत होऊन रुग्णाचा वेळ आणि खर्च वाचतोच, शिवाय फॉलो-अप आणि पुनर्वसनही वेळेत आणि पैशांची बचत होते. प्रत्येक रूग्णाला सूचनेनुसार योग्य उपचार मिळतील आणि उपचारांच्या संधी वाया जाणार नाहीत. ENDS
Be the first to comment on "Sophisticated Stroke Centres set up by Apollo Hospitals and Medtronic’s Artificial Intelligence"