कल्याण ज्वेलर्सतर्फे दिवाळीचे नवीन कलेक्शन ‘अमेया’

Kalyan Jewellers Logo
Kalyan Jewelers launches new Diwali collection 'Ameya'

कोरोना विरोधात निस्वार्थीपणे लढा देणाऱ्यांना सलाम करत #ट्रॅडिशनऑफटुगेदरनेसवर दिवाळीची जाहिरात केली प्रसिद्ध

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२०:- कल्याण ज्वेलर्सने सणासुदीला परिधान करण्यासाठी अमेया हे नवे कलेक्शन आभासी माध्यमातून बाजारात आणले आहे. अमेय म्हणजे अमर्यादित हे कलेक्शन सणासुदीच्या दागिन्यांचे भरपूर प्रकार उपलब्ध करून देणारे आहे. नवे व खिशाला परवडणारे हे कलेक्शन आम्ही यंदाच्या सणांसाठी खास सादर केले आहे. या जाहिरातीत भारतात विविध निवासी प्रकल्पांत राहणारे लोक एकत्र येऊन एकमेकांच्या संगतीने प्रकाशाचा उत्सव साजरा करताना दाखविण्यात आले आहेत. सध्याची कोरोनाची स्थिती देखील या जाहिरातीसाठी लक्ष्यात घेण्यात आली आहे.

मोहिमेविषयी माहिती देताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणारामन म्हणाले,” माणिक, पाचू आणि मोती यांना सोने, हिरे व मूल्यवान खड्यामध्ये गुंफण्यात आले आहे. त्यालाच अमेय हे नाव आहे. याच्या अमर्यादित शक्यता तयार होतात. या कलेक्शन मध्ये ग्राहकाच्या आवडीनुसार वेगवेगळे पर्याय तयार करता येण्यासारखे आहेत, असे कल्याणारामन म्हणाले.

पारंपरिक प्रतीक आणि अद्वितीय डिझाईन, कुंदन पोल्की कारागिरी, प्राचीन वारशापासून प्रेरित टेम्पल डिझाईन्स, मौल्यवान खड्यांसह नक्षीकाम या कलेक्शनचा भाग आहे. यंदाच्या सणासुदीसाठी कल्याण ज्वेलर्सने आकर्षक प्रस्ताव सादर केले आहेत, ज्यात ३०० किलो गोल्ड गिव अवे केम्पेनचा समावेश आहे. कल्याण ज्वेलर्समध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, त्यांनी केलेल्या खरेदीवर तत्काळ रिडिमेबल व्हाउचर्स किंवा सोन्याची नाणी मिळणार आहे. ज्याचे एकूण प्रमाण वर नमूद केल्याप्रमाणे ३०० किलो असेल. हि व्हाउचर्स, सोन्याच्या दागिन्यांवर २५ टक्क्यांपर्यंतच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी रिडिम करता येतील. हि ऑफर ३० नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध असेल.

#ट्रॅडिशनऑफटुगेदरनेस अधोरेखित करणाऱ्या या जाहिरातीमध्ये शेजारी अशाच एका कुटुंबाची दिवाळी प्रकाशमान करण्यासाठी एकत्र येत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी भेटवस्तू देताना दिसतील. या जाहिरातीसह कल्याण ज्वेलर्सने आपण सर्वांनी एकमेकांना मदत करत, खासगी स्वरुपात का होईना सणांचा आनंद जिवंत ठेवण्याची गरज असल्याचा संदेश यांनी अधोरेखित केला आहे. ENDS

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "कल्याण ज्वेलर्सतर्फे दिवाळीचे नवीन कलेक्शन ‘अमेया’"

Leave a comment

Your email address will not be published.


*