On World Energy Day, Racold calls for the use of smart energy-efficient devices

‘जागतिक ऊर्जा दिनी’ स्मार्ट ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे वापरण्याचे रॅकोल्डचे आवाहन; हरित आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी स्मार्ट व योग्य उपकरणांची निवड करणे महत्वाचे

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२०: कोरोनाच्या काळात व्यवसायांवरच नव्हे, तर आपल्या जीवनावर आणि आपण ज्या वातावरणात राहात आहोत त्यावरही परिणाम झाला आहे. राष्ट्रीय टाळेबंदीत घरातून काम करण्याची सक्ती झाल्यामुऴे देशातील घरगुती उर्जेच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे, नैसर्गिक संसाधने आणि साहित्य यांचा ऱ्हास होत चालला असून त्याचा धोका पर्यावरणास होऊ लागला आहे. म्हणूनच, केवळ जागतिक स्तरावरच नाही तर वैयक्तिक पातळीवरदेखील ऊर्जा व पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन यांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर, आजच्या जागतिक ऊर्जा दिनी, ‘रॅकॉल्ड’ या पाणी तापविण्याची उपकरणे बनविणाऱ्या कंपनीने, ग्राहकांना ‘ऊर्जा कार्यक्षम’ अशी स्मार्ट उत्पादने निवडण्याचे आणि त्यांचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

भारतातील एकूण निवासी वीज वापरापैकी ५० ते ६० टक्के वापर पंखे, टीव्ही, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि वॉटर हीटर यांसारख्या रोजच्या उपकरणांमुळे होत असतो. म्हणूनच हरित आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी स्मार्ट व योग्य उपकरणांची निवड करणे महत्वाचे ठरते. ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल उत्पादने तयार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, रॅकॉल्ड तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि अत्यंत टिकाऊ अशा अत्याधुनिक उत्पादने बनविते. ‘राकॉल्ड’ची ‘सोलर वॉटर हीटिंग सिस्टम’ ही कमी ऊर्जा वापरणारी आणि उच्च कार्यक्षमतेसाठी आंतरराष्ट्रीय मानके लक्षात ठेवून डिझाइन केलेली आहे. त्या अनुषंगाने,’ रॅकॉल्ड’ची ‘इलेक्ट्रिक स्टोरेज वॉटर हीटर’ श्रेणीतील ‘सीडीआर डीएलएक्स’, ‘सीडीआर स्विफ्ट’, ‘बुओनो प्रो’ आणि ‘ओमनीज’, तसेच वरीलपैकी निवडक मॉडेल्समध्ये ‘बीईई 5-स्टार रेटिंग’ देण्यात आलेले आहे. त्यामुळे ती अत्यंत ऊर्जा कार्यक्षम आहेत. आपले वीज बिल कमी करण्यात ती फार मदत करतात.

अॅरिस्टन थर्मो इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक मोहित नरुला म्हणाले, “रॅकॉल्डने सुरुवातीपासूनच भारतातील वॉटर हीटिंग उद्योगात नवे तंत्रज्ञान आणून, सौंदर्यशास्त्र, गुणवत्ता, टिकाऊपणा व उत्पादनाची कार्यक्षमता या गोष्टी वाढवल्या आहेत आणि त्यायोगे त्यातील मानके स्थापन केली आहेत. आमच्या शाश्वत वाढीच्या धोरणामध्ये ऊर्जा कार्यक्षमतेला मोलाचे स्थान आहे आणि आम्ही ऊर्जा संवर्धनासाठी मनापासून वचनबद्ध आहोत. तसेच ग्राहकांमध्ये व समाजात पर्यावरण व ऊर्जा कार्यक्षमतेविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या ‘रॅकॉल्ड’ च्या प्रतिबद्धतेची ही साक्ष आहे.

‘रॅकॉल्ड’ ने सततच्या कामगिरीमुळे “ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी अॅवॉर्ड” (बीईई) हे प्रतिष्ठित पारितोषिक नऊ वेळा जिंकले आहे. ऊर्जा मंत्रालयांतर्गत असलेली ‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी’ (बीईई) ही संस्था भारतातील ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनाचे नियमन आणि प्रचार करते. ‘बीईई स्टार’ मानांकने असलेल्या उपकरणांच्या उत्पादकांनी व उद्योगांनी ऊर्जा संवर्धनात केलेल्या कामगिरीबद्दल व त्यातील नाविन्यतेबद्दल ही पारितोषिके देण्यात येत असतात. ‘रॅकॉल्ड’ने नवीन युगातील जगतासाठी व ग्राहकांसाठी शाश्वत डिझाईन्स निर्माण केली व त्यांत नाविन्यता आणली, याच्या सन्मानार्थ ही पारितोषिके ‘रॅकॉल्ड’ला मिळाली आहेत. ‘वॉटर हीटिंग’ क्षेत्रामधील दिग्गज अशा या कंपनीने गरम पाण्यासाठी संपूर्ण नूतनीकरणयोग्य उपाय तयार केले आहेत आणि स्मार्ट, हरित घरांसाठी स्मार्टर सोल्युशन्स सादर केली आहेत. काही वॉटर हीटर हे अॅप्स आणि स्मार्टफोनद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. ENDS

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "On World Energy Day, Racold calls for the use of smart energy-efficient devices"

Leave a comment

Your email address will not be published.


*