“माझे यापूर्वीचे काम बघता, हंसलमेहता मला त्यांच्या चित्रपटात कामदेतील असे कधी वाटलेच नव्हते,”नुसरत भरुचा

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२०: नुसरत भरुचाने तिच्या अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले आहे पण ‘छलांग’च्या माध्यमातून ती प्रथमच ज्येष्ठ दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटाचा अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील वर्ल्ड प्रीमियर जवळ आलेला असताना, हंसल यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न कसे पूर्ण झाले हे नुसरतने सांगितले आहे.हंसल मेहता कधी आपल्याला त्यांच्या चित्रपटात घेतील असे वाटलेच नव्हते, असेही नुसरतने सांगितले.
नुसरत म्हणाली, “हंसल मेहता मला कधी त्यांच्या चित्रपटात घेतील असे मला वाटलेच नव्हते, कारण मला वाटायचे की मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अभिनय करूच शकत नाही. मी केव्हा त्यांना अपेक्षित दर्जाचे काम करू शकेन आणि ते मला त्यांच्या चित्रपटात घेतील याची मी वाट बघत होते. जेव्हा त्यांनी मला छलांगमध्ये घेतले तेव्हा मी आकाशात उडत होते. मला माझ्या कामावर शिक्कामोर्तब झाल्यासारखे वाटले. माझ्यासाठी स्वप्नच सत्यात अवतरले होते आणि आणि त्यांच्या टीमहून अधिक चांगल्या टीमची मी कल्पनाच करू शकत नव्हते.छलांग हा चित्रपट माझ्यासाठी आणखी विशेष आहे,कारण माझे अशक्यवत स्वप्न यामुळे शक्य झाले आणि मी हे स्वप्न अगदी मनापासून जगले आहे.”
छलांग हा एका पीटी शिक्षकाचा विनोदी पण प्रेरणादायी प्रवास आहे. उत्तर भारतातील एका अनुदानित शाळेतील पीटी शिक्षकाची ही कथा आहे. मोंटू (राजकुमार राव) हा एक टिपिकल पीटी शिक्षक आहे. त्याच्यासाठी पीटी शिकवणे ही फक्त एक नोकरी आहे. मात्र, मोंटूला ज्यांची पर्वा आहे त्या सगळ्या गोष्टी, यात तो जिच्यावर प्रेम करतो त्या नीलूचाही (नुसरत भरुचा) समावेश असतो,पणाला लावणारी परिस्थिती निर्माण होते आणि त्याने कधीही न केलेली गोष्ट करणे- अर्थात शिकवणे- त्याला भाग पडते.
भारतातील व सुमारे २०० देश व प्रदेशातील प्राइम सदस्य १३ नोव्हेंबर रोजी ‘छलांग’ या चित्रपटाचा ग्लोबल प्रीमियर केवळ अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम करू शकतात.
Be the first to comment on "“I never thought Hansal Mehta would ever cast me in his film considering my previous projects”, Nushrratt Bharuccha"