AMAZON PRIME VIDEO AND EXCEL MEDIA AND ENTERTIANMENT BRINGS AMAZON ORIGINAL SERIES MIRZAPUR 2, BORAT: A SUBSEQUENT MOVIE FILM AND OTHER EXCITING TITLES ON AMAZON PRIME VIDEO

MIRZAPUR 2

यंदाच्‍या उत्‍सवी हंगामामध्‍ये फक्‍त अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर बहुप्रतिक्षित अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज मिर्झापूर २‘, ‘बोरट: ए सबसीक्‍वेण्‍ट मूव्‍हीफिल्‍म आणि इतर रोमांचक चित्रपट पाहण्‍याचा मनमुराद आनंद घ्‍या

२३ ऑक्‍टोबरपासून नवीन अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज ‘मिर्झापूर सीझन २‘ पाहा आणि अंतिम लढा पाहण्‍यासोबत मिर्झापूरवर अखेर कोण प्रभुत्‍व स्‍थापित करेल – गुड्डू पंडित की मुन्‍ना त्रिपाठी याचा उलगडा जाणून घ्‍या

२३ ऑक्‍टोबरपासून पाहा नवीन आंतरराष्‍ट्रीय अॅमेझॉन ओरिजिनल चित्रपट ‘बोरट: ए सबसीक्‍वेण्‍ट मूव्‍हीफिल्‍म

२१ ऑक्‍टोबरपासून पाहा रूपर्ट व्‍यॅट दिग्‍दर्शित २०१९ चा वैज्ञानिक-काल्‍पनिक थ्रिलर ‘कॅप्टिव्‍ह स्‍टेट‘चा डिजिटल प्रि‍मिअर   

मुंबई, २१ ऑक्‍टोबर २०२०: यंदा दसरा सणाला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ तुमच्‍या मनोरंजनासाठी अॅमेझॉन व्हिडिओच्‍या ग्रेट इंडियन फेस्टिवल लाइन-अपचा भाग म्‍हणून मनोरंजनपूर्ण भारतीय व आंतरराष्‍ट्रीय चित्रपट सादर करणार आहे. २३ ऑक्‍टोबरपासून बहुप्रतिक्षित अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज मिर्झापूरचा नवीन सीझन पाहण्‍याचा आनंद घ्‍या. या सिरीजमध्‍ये पंकज त्रिपाठी, अली फझल,दिव्‍येंदू, श्‍वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौड, शीबा चड्ढा, राजेश तैलंग प्रमुख भूमिकेत आहेत. बहुप्रतिक्षित सीझन गुड्डू पंडित व मुन्‍ना त्रिपाठी ‘मिर्झापूर की गद्दी’ प्राप्‍त करण्‍यासाठी संघर्ष करण्‍यास परतला आहे. मिर्झापूर २‘ सिरीज स्‍टायलिश, पण ग्रामीण विश्‍वामधील प्रवासाला सादर करते, जेथे हा प्रवास गुन्‍हा,मादक पदार्थ व अहिंसेने भरलेला असून यामधून वाचण्‍यासाठी लढण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही. शोच्‍या सीक्‍वेलमध्‍ये विजय वर्मा, अमित सियाल, प्रियांशू पैनयुली व ईशा तलवार देखील दिसणार आहेत.

२१ ऑक्‍टोबरपासून २०१९ चा वैज्ञानिक-काल्‍पनिक थ्रिलर कॅप्टिव्‍ह स्‍टेटचा डिजिटल प्रिमिअर पाहा. ही एका तरूण पुरूषाची कथा आहे, जो पृथ्‍वीवर हल्‍ला केलेल्‍या आणि सर्व मानवांवर कडक लष्‍करी कायदा लादलेल्‍या एका एलियनविरोधात बंड पुकारण्‍यासाठी कटकारस्‍थानामध्‍ये सहभाग घेतो. रूपर्ट व्‍यॅटचे लेखन व दिग्‍दर्शन असलेल्‍या या चित्रपटामध्‍ये जॉन गूडमॅन,अॅश्‍टन सँडर्स व जोनाथन मेजर्स प्रमुख भूमिकेत आहेत. हा साय-फाय थ्रिलर चित्रपट निश्चितच प्रेक्षकांना कॅप्टिव्‍ह स्‍टेटमध्‍ये घेऊन जाईल आणि महत्त्वाकांक्षी राजकीय हेतूंसह अविश्‍वसनीय एलियन कृत्‍यांना सादर करेल.

अविरत मनोरंजन सुरू राहत पाहा नवीन आंतरराष्‍ट्रीय अॅमेझॉन ओरिजिनल चित्रपट बोरट: सबसीक्‍वेण्‍ट मूव्‍हीफिल्‍म‘. हा चित्रपट एकेकाळी भव्‍य देश असलेल्‍या कझाखस्‍तानमधून लाभ मिळवण्‍यासाठी अमेरिकन शासनामध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या विचित्र लाचसंदर्भातील प्रकरणाला सादर करतो. या चित्रपटामध्‍ये सॅचा बॅरोन कोहेन व इरिना नोवाक प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट काल्‍पनिक कझाख टेलिव्हिजन पत्रकार बोरटच्‍या वास्‍तविक जीवनातील साहसी कृत्‍यांवर लक्ष केंद्रित करणारा २००६ मधील विनोदी चित्रपटावर आधारित आहे.  

खास आकर्षण:

कॅप्टिव्‍ह स्‍टेट (Captive State): २१ ऑक्‍टोबर

कालबाह्य सेनेने प्रभुत्‍व मिळवल्‍यानंतर जवळपास दशकानंतर शिकागो परिसरामध्‍ये स्थित ‘कॅप्टिव्‍ह स्‍टेट’सहयोग व असंतुष्‍ट या वादाच्‍या दोन्‍ही बाजूंवर आधारित जीवनांना सादर करते.

मिर्झापूर २ (Mirzapur 2): २३ ऑक्‍टोबर

मिर्झापूरचे विश्‍व शक्‍ती, राजनिती व सूडाने व्यापलेले बनले आहे. हा चित्रपट कटकारस्‍थानांबाबत आहे. लोक त्‍यांच्‍याकडून असलेल्‍या बंदूकांचा वापर करण्‍यामध्‍ये कोणताच संकोच न करता एकमेकांची फसवणूक करतात. हा सीझन फक्‍त मिर्झापूरच्‍या हिंसक विश्‍वाला सादर करत नाही, तर प्रेक्षकांना शक्तिशाली प्रवासावर घेऊन जातो, जेथे राजकिय नेते व गुन्‍हेगारांमधील परस्‍परसंबंध पाहायला मिळतात. हा सीझन मिर्झापूरपलीकडील एका ठिकाणी घेऊन जातो, जेथे बेकायदेशीर व्‍यवसाय चालवणारी हिंसक व शक्तिशाली कुटुंबे आहेत. मिर्झापूरच्‍या महिला अधिक मोहक व अधिक जटिल बनल्‍या आहेत. त्‍या त्‍यांची ध्‍येये संपादित करण्‍यासाठी कोणत्‍याही गोष्‍टीचा वापर करण्‍यामध्‍ये संकोच करणार नाहीत. अखेर कोणाचा विजय होईल?त्रिपाठींना आव्‍हान करण्‍यासाठी कोणी जिवंत राहिले आहे का? या सीझनमधील रोमांच अधिक वाढला आहे,पण नियम तेच आहेत – रक्‍तपात केल्‍याशिवाय येथे टिकता येणार नाही!

बोरट सबसीक्‍वेण्‍ट मूव्‍हीफिल्‍म (Borat Subsequent Moviefilm): २३ ऑक्‍टोबर

हा चित्रपट काल्‍पनिक कझाख टेलिव्हिजन पत्रकार बोरटच्‍या वास्‍तविक जीवनातील साहसी कृत्‍यांवर लक्ष केंद्रित करणारा २००६ मधील विनोदी चित्रपटावर आधारित आहे. चित्रपटामध्‍ये सॅचा बॅरोन कोहेन व इरिना नोवाक प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्‍दर्शन जेसन वोलिनर यांनी केले असून सॅचा बॅरोन कोहेन,अॅन्‍थोनी हाइन्‍स, डॅन स्विमर, पीटर बेन्‍हॅम, एरिका रिवीनोजा, डॅन मेझर, जीना फ्राइडमॅन व ली कर्न यांनी लेखन केले आहे. तसेच सॅचा बॅरोन कोहेन, मोनिका लेविनसन व अॅन्‍थोनी हाइन्‍स हे निर्माता असण्‍यासोबत बडी एनराइट, निकोलस हॅटन, पीटर बेन्‍हॅम, डॅन मेझर व स्‍टुअर्ट मिले हे कार्यकारी निर्माता आहेत.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "AMAZON PRIME VIDEO AND EXCEL MEDIA AND ENTERTIANMENT BRINGS AMAZON ORIGINAL SERIES MIRZAPUR 2, BORAT: A SUBSEQUENT MOVIE FILM AND OTHER EXCITING TITLES ON AMAZON PRIME VIDEO"

Leave a comment

Your email address will not be published.


*