Mumbai, 29 September, 2020 (GPN):
कोरोना व्हायरसमुळे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात एकच हाहाकार माजला आहे. या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रोगप्रतिकारक क्षमता कमी असणार्यांना या आजाराची लागण पटकन होते. या अनुषंगाने मधुमेह आणि हृदयविकाराच्या रूग्णांना या आजाराचा धोका सवाँधिक आहे, आपण हे ऐकलेच आहे! त्यामुळे यंदाच्या वर्षी जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारावर मात करण्यासाठी “यूजहर्ट” या थीमसह आम्ही आपल्या कुटुंबातील हृदयरोगाची काळजी कशी घ्यावी हे सांगत आहोत. जेणेकरून आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती हदयरोगी असल्यास तिची काळजी योग्य पद्धतीने घेता येईल.
तुमच्या कुटुंबात हृदयविकाराचा त्रास, धमनीचा आजार किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार कोणाला आहे का? आपण त्यांच्या हृदय आरोग्याबद्दल काळजीत आहात? या रुग्णांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊ इच्छिता? यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी काही टिप्स खालीलप्रमाणे दिल्या आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,
सध्या भारतातील बहुसंख्य लोक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांनी पिडित आहेत. सदोष जीवनशैली, कौटुंबिक इतिहास आणि योग्य उपचारांचा अभाव यामुळे ही समस्या अधिकच बळावते. अशा प्रकारे, जर आपण किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला हृदयाच्या कोणत्याही समस्येमुळे त्रास होत असेल तर योग्य वैद्यकीय मदत घेणे अत्यावश्यक आहे. शिवाय, जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काळजीत असाल तर काहीटिप्स लक्षात ठेवा ज्या तुम्हाला आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला मदत करतील.
*१) कुटुंबातील हदयरोगी नियमितपणे व्यायाम करत आहे का याची खात्री करुन घ्या :* जर आपल्या कुटुंबातील सदस्य शारीरिकरित्या सक्रिय नसेल तर त्याला दररोज व्यायामाचे महत्त्व समजावून सांगा. सकाळी व्यायामासाठी त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न करा. आपण दोघेही फेस मास्क, हातमोजे घालून आणि सेनिटायझर घेऊन कोविड -१९ प्रोटोकॉलचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करा. चालणे, एरोबिक्स किंवा योग यासारखे व्यायाम दररोज करा. कोणताही कठीण व्यायाम करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.
*२) आहाराकडे लक्ष द्या:* आपल्या कुटुंबातील सदस्याला जेवणात पौष्टिक आहाराचा समावेश करा. आहारात ताजी फळे, भाज्या, धान्य आणि डाळींचा समावेश असणं गरजेचं आहे. हे पहा की आपल्या प्रिय व्यक्तीने प्रक्रिया केलेले, तेलकट, जंक, मसालेदार आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळले आहे. यामुळे हदयाची समस्या टाळता येऊ शकते. तांदूळ आणि गव्हाच्या पीठासारख्या कार्बोहायड्रेट्सने भरलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळा.
*३) वेळेवर औषध घेतात का याकडे लक्ष द्या:* वेळोवेळी रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळी आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. रुग्ण त्याची वेळेवर घेतो का हे पहा. जर रुग्णाला डॉक्टरांकडे जायचे असल्यास त्याच्यासोबत जा.
डॉक्टरांना रूग्णाच्या आरोग्याबद्दल माहिती द्या किंवा तुम्हाला काही असामान्य लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना सांगा. त्यांच्या आजारपणाबद्दल स्वत: सगळी माहिती जाणून घ्या.
*४) आपल्या प्रिय व्यक्तीला त्याच्या मनातील भावना व्यक्त करू द्या:* आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांना कसे वाटते याबद्दल त्यांना मोकळे होऊ द्या. त्यांना एकटे किंवा थकल्यासारखे वाटत असल्यास त्यांना विचारा. त्यांना शारीरिक तसेच भावनिक प्रतिकार करण्यास मदत करा. नृत्य, गाणे, चित्रकला किंवा बागकाम यासारख्या त्यांच्या आवडीची कामे करण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्याला कधीही कोणतीही मदत लागल्यास नेहमी तयार रहा.
*५) चांगला वेळ घालवा:* घरी राहणं, सामाजिक अंतर पाळणं, आजारी लोकांच्या आसपास राहणे आणि हात वारंवार स्वच्छ धुवणं अशा सर्व कोविड-१९ च्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कामाव्यक्तिरिक्त घराबाहेर पडू नका. हृदयाच्या रूग्णांसमवेत घरी राहण्यासाठी काही दर्जेदार वेळ घालविण्याचा प्रयत्न करा. जुन्या आठवणी काढा, जेणेकरून रूग्ण आनंदी राहील. याशिवाय रुग्णाला त्याची दैनंदिन कामे करण्यास मदत करा.
Be the first to comment on "तुमच्या घरी कोणी हदयरोगी असल्यास अशी घ्या काळजी – डॉ. नारायण गडकर, सल्लागार कार्डिओलॉजिस्ट झेन मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल, चेंबूर"