
कल्याण ज्वेलर्सचे सोन्याचे दागिने परिधान करत मां दुर्गा अवतार
रिताभरी यांनी कल्याण ज्वेलर्सच्या संग्रहांतील हाताने घडवलेले पारंपरिक दागिने परिधान केलेल्या रूपात केले सादरीकरण

कल्याण ज्वेलर्सचे सोन्याचे दागिने परिधान करत महिषासुर मर्दिनी अवतार

कल्याण ज्वेलर्सचे सोन्याचे दागिने परिधान करत सती अवतार
मुंबई, १८ सप्टेंबर २०२०:- शुभो महालया अमावास्या म्हणजे श्राद्ध किंवा पितृ पक्षाचा अखेर आणि शुभ मानल्या जाणाऱ्या देवी पक्षाची सुरुवात. बहुतेक वेळेस हीच 10 दिवसांच्या दुर्गा पूजनाच्या सणाची सुरुवात असते, मात्र यंदा देवी दुर्गा शुभो महालया अमावास्येनंतर एका महिन्याने येणार आहे.
हा महत्त्वाचा दिवस साजरा करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सच्या ब्रँड अँबेसेडर रिताभरी चक्रवर्तीने कधी न पाहिलेले रूप धारण केले होते. त्या दुर्गामांच्या तीन वेगवेगळ्या लक्षणीय रुपात दिसल्या. सती देवी, मां पार्वती आणि महिषासुर मर्दिनी या तीन रुपांत रिताभरी यांनी कल्याण ज्वेलर्सच्या विविध संग्रहांतील हाताने घडवलेले, पारंपरिक दागिने परिधान केले होते.
महालयाच्या पवित्र प्रसंगी कल्याण ज्वेलर्सच्या प्रादेशिक ब्रँड अँबेसेडर रिताभरी चक्रवर्ती म्हणाल्या, ‘या दिवशी मां दुर्गा आपल्या मुलाबाळांसह स्वर्गातून पृथ्वीवर वडिलांच्या घरी येते. बंगालींसाठी दुर्गा पूजन हा सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि हा दिवस या उत्सवाची सुरुवात असते. गेली कित्येक वर्ष मां दुर्गाने असुरांवर मिळवलेला विजय आपण रेडिओ, टीव्ही आणि नाटकांच्य माध्यमातून अनुभवलेला असून तिचं हे रूप ‘महिषासुरमर्दिनी’ या नावाने ओळखले जाते. मां दुर्गाच्या कोणत्याही मूर्तीत तिने नखशिखांत परिधान केलेले दागिने उठून दिसत असतात. कल्याण ज्वेलर्स आणि आनंदबझार पत्रिका यांच्या सहकार्याने मां दुर्गाचं रूप धारण करणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. हे माझ्यासाठी जास्त खास आहे, कारण त्यातून मां दुर्गा जर नारीशक्तीचे प्रतीक आहे, तर आपण आपल्या स्त्रियांचा समान आदर व पूजन का करायला नको असा महत्त्वाचा संदेश दिला जातो. आपल्या देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार गेल्या काही वर्षांत खूप वाढलेले आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा वास असतो आणि आपण तिचा आदर करायला हवा याची लोकांना आठवण करून देण्याचा हा आमचा एक साधा प्रयत्न आहे.’
रिताभरी चक्रवर्ती यांनी 2009 मध्ये ओगो बोधू सुंदरी या बंगाली टीव्ही मालिकेतून पर्दापण केले होते. आतापर्यंतच्या 11 वर्षांच्या प्रवासात या गुणी अभिनेत्रीने काही भव्य बंगाली प्रकल्पांत तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभियनाने प्रशंसा मिळवली आहे. 2017 मध्ये या अभिनेत्रीने नेकेड या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेत्री कल्की कोचल्निसह काम करत हिंदी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले व त्यानंतर अनुष्का शर्मा यांच्या परी या सिनेमातल्या त्यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. त्याशिवाय रिताभरी चक्रवर्ती आयुषमान खुराना यांच्या ‘ओरे मॉन’ या संगीत व्हिडिओमध्ये तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिकी टाका या झी5 ओरिजनल स्पोर्ट्स ड्रामा सिनेमामध्ये दिसल्या होत्या.
रिताभरी चक्रवर्ती यांनी महालया प्रसंगी परिधान केलेल्या दागिन्यांची यादी :-
सती देवी अवतार – रिताभरी यांनी कोरियल लाल पार साडी आणि कल्याण ज्वेलर्सचे सोन्याचे दागिने परिधान करत सती अवतार धारण केला. या अतिशय सुंदर, हाताने घडवलेल्या, फिलिग्रीपासून प्रेरणा घेतलेल्या सोन्याचा चोकरचे डिझाइन खूप नाजूक आहे. त्याला पांच पालीच्या वारसा नेकलेसची जोड दिल्यानंतर दिसणारं रूप भारावून टाकणारं असतं.सोन्याचे पारंपरिक चूर किंवा बांगड्या हा बंगाली पोशाख पूर्ण करतील. गडद लाल रंगाच्या साडीवर शाखा पोल्का बांगड्या, चूर या रूपाचे स्त्रीत्व अधोरेखित करतात. वैविध्यपूर्ण हस्तभूषण असणाऱ्या चूरचे सौंदर्य कधीच कमी होत नाही.
महिषासुर मर्दिनी अवतार – रिताभरी यांनी तिसरे नेत्र दर्शवले असून त्याला घुमटाच्या आकाराच्या सोनार मुकुटाची जोड दिली आहे.पंच नोली हार हा पाच स्तर असलेला सोन्याचा हार असून तो सौंदर्यात आणखी भर घालत आहे. कमरबंध, जुही बांगड्या आणि नथ या पारंपरिक रूपाला उठाव देत आहेत.
माँ पार्वती देवी – गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या साडीतलं हे त्यांचं पार्वतीचं रूप सोन्याच्या टेम्पल डिझाइन असलेल्या दागिन्यांनी पूर्ण झालं आहे. सोन्याची टिकली (टिका) आणि टेम्पल डिझाइनचा हार, झुबे, कान पाशा आणि नाजूरकशी नथ एकंदर रूपाचं सौंदर्य खुलवणारी आहे. अंगटी हे अंगठीसाठीचं बंगाली नाव असून हा दागिना प्रत्येक पारंपरिक पोशाखासाठी आवश्यक असतो. अंगठीसाठी काही ठराविक पॅटर्न्स असतात जे बोटांना आणखी सुंदर बनवतात.
Be the first to comment on "अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीने महालया प्रसंगी सादर केले पार्वतीचे रूप"