# ट्रूफॅन देणार आवडत्या सुपरस्टार्सना भेटण्याची संधी
सुपरस्टार्स रणवीर सिंग, करीना कपूर, ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबत ट्रूफॅनची हातमिळवणी

Karena Kapoor – Photo By GPN
मुंबई, ३ सप्टेंबर २०२०:- ट्रूफॅन (#TrueFan) हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जो ए-लिस्ट सेलिब्रेटींसाठी बिझनेस मॉडेल घेऊन आला आहे, यासारखे दुसरे बिझनेस मॉडेल सध्या बाजारपेठेत उपलब्ध नाही.सर्वात मोठा एकमेव, फॅन्सवर आधारित व्यापारी प्लॅटफॉर्म निर्माण करणे हे ट्रूफॅनचे उद्धिष्ट आहे. बॉलिवूड, खेळ, संगीत आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांना यामध्ये सहभागी करवून घेतले जाणार आहे. हा प्लॅटफॉर्म फॅन्सना एक कप कॉफीच्या किमतीमध्ये आपल्या आवडत्या सुपरस्टार्सना भेटण्याची संधी जिंकण्याच्या एक पाऊल पुढे घेऊन येतो. ट्रूफॅनमध्ये युजर्सना सहजसोप्या क्विझ खेळायच्या असतात, यातील प्रश्न सेलिब्रेटीजच्या जीवनावर आधारित असतात. भाग्यशाली विजेत्यांना बक्षीस म्हणून त्या स्टार्सकडून व्यक्तिगत संदेश पाठवला जातो. सुरुवातीच्या फंडींगमध्ये ४.३ मिलियन डॉलर्स उभे करण्यात यशस्वी ठरलेल्या ट्रूफॅन या सेलिब्रेटी-फॅन स्टार्टअपने पहिल्या फेरीमध्ये सुपरस्टार्स रणवीर सिंग, करीना कपूर, ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबत विशेष हातमिळवणी केली आहे.
श्री. निमिष गोयल, सह-संस्थापक व सीईओ, ट्रूफॅन यांनी सांगितले, “मला विराट कोहली प्रचंड आवडतो आणि त्याला भेटण्याची एक संधी मिळावी मी एका लग्नात अक्षरशः घुसलो होतो. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला पण मला माहिती आहे की प्रत्येकालाच अशी संधी मिळते असे नाही. ट्रूफॅनमध्ये आम्ही अशा कोट्यवधी फॅन्सना त्यांच्या आवडत्या स्टार्ससोबत अर्थपूर्ण पद्धतीने कनेक्ट होण्यासाठी मदत करणार आहोत. रणवीर सिंग, करीना कपूर, ह्रितिक रोशन, टायगर श्रॉफ यांच्यासारख्या सुपरस्टार्ससोबत हातमिळवणी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, कोट्यवधी चाहत्यांच्या अशाच इतर अनेक स्टार्सना यामध्ये सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
श्री.रॉनी स्क्र्यूवाला, ट्रूफॅनचे शेअर होल्डर यांनी सांगितले,”आपल्याकडे कोट्यवधी लोक असे आहेत जे विविध क्षेत्रातील विविध व्यक्तींचे खूप मोठे चाहते असतात आणि त्यांना आपले आदर्श मानत असतात, परंतु ९९.९% वेळा हा स्नेह फक्त एकतर्फीच उरतो. ही परिस्थिती बदलण्याचे ट्रूफॅनने ठरवले आहे. आपल्या सुपरस्टार्सविषयी भरपूर प्रेम व आदर बाळगणाऱ्या फॅन्ससाठी प्रभावी कनेक्टरची भूमिका ट्रूफॅन बजावणार आहे, स्टार्ससाठी देखील ही एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे कारण त्यामुळे त्यांना त्यांच्या सच्च्या फॅन्सना भेटता येणार आहे.”
ह्रितिक रोशन – “भारतीय प्रेक्षकांसाठी ट्रूफॅन हा प्लॅटफॉर्म सादर केला जाणे ही अतिशय छान गोष्ट आहे. #ट्रूफॅन सोबत पार्टनरशिपमुळे मला माझ्या सच्च्या चाहत्यांसोबत व्यक्तिगत स्नेह अधिक घट्ट करता येणार आहे, देशभरातील कोणत्याही भागातील चाहते आणि मी एकमेकांशी संपर्क साधू शकणार आहोत.अतिशय नाविन्यपूर्ण, अनोखा व्हर्च्युअल इंटरफेस प्लॅटफॉर्म ट्रूफॅन निर्माण केल्याबद्दल संस्थापकांचे अभिनंदन!”
रणवीर सिंग – “ट्रूफॅनमुळे गेमिफिकेशनच्या मनोरंजक माध्यमातून फॅन आणि सेलिब्रेटी यांच्यामध्ये एक अतिशय अनोखे आणि खास नाते निर्माण होणार आहे.सर्वांना सामावून घेईल आणि आवडीचा ठरेल असा हा प्लॅटफॉर्म असून ट्रूफॅनसोबत पार्टनरशिप करताना मला खूप आनंद होत आहे.”
करीना कपूर – “माझ्या आजवरच्या संपूर्ण कारकिर्दीत चाहत्यांकडून मला प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळाला याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आता मला माझ्या सच्च्या चाहत्यांसोबत व्यक्तिशः संपर्क साधता येणार आहे. या विचाराने मला खूप प्रभावित केले आणि म्हणूनच मी ट्रूफॅनसोबत पार्टनरशिप केली आहे.”
टायगर श्रॉफ – “माझ्या फॅन्सनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि ते मला कायम प्रोत्साहन देत राहतात. त्यांच्यासोबत दिल से कनेक्ट होणे मला खूप आवडेल, ट्रूफॅनमुळे मला व माझ्या चाहत्यांना ती संधी मिळणार आहे.या प्लॅटफॉर्मसोबत विशेष हातमिळवणी करून माझ्या फॅन्सच्या आणखी जवळ जाता येणार आहे.”
Be the first to comment on "# ट्रूफॅन देणार आवडत्या सुपरस्टार्सना भेटण्याची संधी"