सोनी सबवरील मालिका ‘कॅरी ऑन आलिया’मधील अनुषा मिश्रा म्‍हणते, ”आलियाचा नवीन अवतार मला माझ्या कार्यालयीन दिवसांची आठवण करून देतो”

Alia’s new avatar reminds me of my office days”, says Anusha Mishra from Sony SAB’s Carry On Alia

Alia’s new avatar reminds me of my office days”, says Anusha Mishra from Sony SAB’s Carry On Alia

Alia’s new avatar reminds me of my office days”, says Anusha Mishra from Sony SAB’s Carry On Alia

Alia’s new avatar reminds me of my office days”, says Anusha Mishra from Sony SAB’s Carry On Alia

मुंबई, 03 सप्टेंबर, 2020 (GPN):

सोनी सबवरील हलकी-फुलकी विनोदी मालिका कॅरी ऑन आलियाने नुकतेच नवीन रोमांचक कथानक सादर केले. आलियासह इतर शिक्षकांनी न्‍यूज रिपोर्टर म्‍हणून नवीन प्रवास सुरू केला आहे. सोनी सबच्या उत्‍साही आलियाचे नवीन मेकओव्‍हर करण्‍यात आले, जेथे तिने क्‍लासरूमपासून न्‍यूजरूमपर्यंतच्‍या तिचा प्रवास केला आहे.

मालिकेमधील परिवर्तनासह आलियाची भूमिका साकारणारी अनुषा मिश्रा आता न्‍यूज अँकरची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा नवीन अनुभव व पटकथेमधील परिवर्तनाबाबत बोलताना अनुषा म्‍हणाली, ”मला एकाच भूमिकेचे विभिन्‍न अवतार साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप आनंद झाला आहे. आतापर्यंत आलियाच्‍या भूमिकेमधील प्रवास अद्भुत राहिला आहे. हे नवीन परिवर्तन अत्‍यंत धमाल असून हास्‍य व आनंद पसरवण्‍याची खात्री देते. आलिया उत्‍साही, आत्‍मविश्‍वासू असून जीवनाचा आनंद घेते. या नवीन करिअर बदलासह तिची पूर्णत: नवीन बाजू पाहायला मिळेल. मला या नवीन अध्‍यायाबाबत आवडलेली बाब म्‍हणजे प्रत्‍येक पात्राने एकमेकांना त्‍यांच्‍या उदरनिर्वाहासाठी पाठिंबा दिला आहे. प्रत्‍येक पात्र न्‍यूज रिपोर्टिंगच्‍या नवीन पैलूचा सामना करण्‍यासोबत या नोकरीमध्‍ये त्‍यांच्‍या अद्वितीय वैशिष्‍ट्यांची भर करताना पाहायला मिळणार आहे. जसे की, आलोक, जो अगोदर क्रीडा शिक्षक होता, आता स्‍पोर्टस रिपोर्टरच्‍या भूमिकेत दिसणार आहे.

या नवीन भूमिकेसाठी केलेल्‍या तयारीबाबत बोलताना अनुषा म्‍हणाली, ”शिक्षक म्‍हणून करिअर घडवण्‍याच्‍या स्‍वप्‍नांचा हृदयस्‍पर्शी शेवट झाल्‍यानंतर कॅरी ऑन आलिया प्रेक्षकांना पूर्णत: नवीन अध्‍यायामध्‍ये घेऊन जाईल. आलिया व इतर सर्व शिक्षक त्‍यांची नोकरी गमावल्‍यानंतर पुढील करिअर घडवताना दिसणार आहेत. त्‍यांचा क्‍लासरूमपासून न्‍यूजरूमपर्यंतचा प्रवास कसा पुढे जातो हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असणार आहे. मला देखील अगदी आलियाप्रमाणेच वाटत आहे, म्‍हणजेच न्‍यूज रिपोर्टर असण्‍याचा पूर्णत: नवीन अनुभव मिळणार आहे. यासंदर्भात बारकावे योग्‍य असण्‍यासाठी मी बातम्‍या पाहत आहे आणि अँकर्स, त्‍यांची देहबोली व वावरण्याचे निरीक्षण करत आहे. तसेच मी आता साडी परिधान केल्याच्‍या रूपात दिसणार नसल्‍यामुळे त्‍याच्‍याशी देखील जुळवून घेण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. हा नवीन अवतार मला माझ्या कार्यालयीन दिवसांची आठवण करून देतो.

ती पुढे म्‍हणाली, ”आलियाची संपूर्ण समर्पिततेसह कॅरी ऑनची इच्‍छा आहे. मी आशा करते की, सर्वजण तिला व कॅरी ऑन आलियाच्‍या संपूर्ण कुटुंबाला तेच प्रेम व पाठिंबा देतील. न्‍यूज चॅनेल देश की धडकन‘ सुरू करण्‍याचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. हा प्रवास धमाल असण्‍याची आशा करते. आलिया व टीम त्‍यांची पत्रकारिता कौशल्‍ये आणि अनोख्‍या विचारसरणीसह मजेशीर व रोमांचक घटनांचे निराकरण करण्‍याच्‍या मिशनवर जाण्‍यास सज्‍ज आहे.

न्‍यूज अँकर आलियाला पाहा कॅरी ऑन आलियामध्ये दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७.३० वाजता फक्‍त सोनी सबवर

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सोनी सबवरील मालिका ‘कॅरी ऑन आलिया’मधील अनुषा मिश्रा म्‍हणते, ”आलियाचा नवीन अवतार मला माझ्या कार्यालयीन दिवसांची आठवण करून देतो”"

Leave a comment

Your email address will not be published.


*