१. मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘चा भाग असल्याने कसे वाटत आहे?
मी मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘ पाहत आलो आहे आणि या अद्भुत संकल्पना असलेल्या मालिकेचा भाग होताना आनंद होत आहे. या मालिकेचे अनेक चाहते आहेत आणि प्रेक्षकांची ही आवडती मालिका आहे. म्हणून मला या मालिकेचा भाग असण्याचा खूपच आनंद होत आहे. मी पहिल्यांदाच काल्पनिक मालिकेमध्ये काम करत आहे. प्रेक्षकांना मनोरंजन करण्यास कधीच असमर्थ न ठरणा-या सोनी सब सारख्या चॅनेलवर ही मालिका प्रसारित होत असल्यामुळे मी या मालिकेमध्ये काम करण्यास खूपच उत्सुक आहे.
२. नवीन सीझन प्रेक्षकांसमोर काय सादर करणार आहे?
नवीन सीझनसह आम्ही पहिल्यांदाच भारतीय टेलिव्हिजनवर प्रेक्षकांसाठी पूर्णत: नवीन जादुई पाण्याखालील विश्व सादर करणार आहोत. मी या संकल्पनेबाबत ऐकले तेव्हा माझ्या मनात पडद्यावर हे कसे दिसेल याबाबत विचार घोंघावत होते. यासंदर्भातील प्रोमो खूपच आकर्षक आहे. माझे मित्र व कुटुंब देखील या नवीन सीझनची संकल्पना ऐकून अचंबित झाले आणि त्यांनी देखील विचार केला की आमचा अभिनय कसा असेल आणि संपूर्ण पाण्याखालील विश्वाच्या टेक्निकॅलिटीज कशा असतील.
असे विश्व निर्माण करण्यासाठी आणि कायमस्वरूपी त्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी अथक मेहनत करावी लागते. मला विश्वास आहे की, प्रेक्षक ‘बालवीर रिटर्न्स‘च्या नवीन सीझनमधील पाण्याखालील विश्वासह दिसणा-या अद्भुत गोष्टींचा आनंद घेतील.
३. तुझी भूमिका रायबाबत काहीतरी सांग.
राय अत्यंत उत्साही असून त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये मोहकता आहे. बंबालसोबतची त्याची केमिस्ट्री पाहणे अत्यंत रोमांचकारी आहे. रायचे व्यक्तिमत्त्व वास्तविक जीवनातील माझ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा पूर्णत: वेगळे आहे. तो नेहमीच अग्रेसर असतो, तर मी वास्तविक जीवनात काहीसा लाजाळू आहे. म्हणून मी या भूमिकेचा वास्तविक टोन व सार अंतर्भूत करण्यासाठी अथक मेहनत घेत आहे. मी या भूमिकेला न्याय देण्यामध्ये यशस्वी होण्याची आशा करतो.
४. तू या भूमिकेसाठी काही विशेष तयारी करत आहेस का?
मी मुख्यत: रायच्या देहबोलीवर काम करत आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अद्ययावत व मोहक आहे. मी व्यक्तिश: त्याच्याशी जुडलो जाऊ शकत नाही. म्हणून या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी मला सुचवण्यात आलेल्या अनेक संदर्भांची मदत घेत आहे. सुपरहिरोप्रमाणे अभिनय कशाप्रकारे साकारावा हे जाणून घेण्यासाठी मी काही हॉलिवुडचे काल्पनिक चित्रपट पुन्हा पाहत आहे. मी देहबोलीसाठी प्रेरणा घेण्याकरिता ‘बालवीर रिटर्न्स‘चे काही एपिसोड्स देखील पाहिले.
५. संपूर्ण टीमसोबत शूटिंग करताना कसे वाटत आहे? पहिल्या दिवशी सेटवरील अनुभव कसा होता?
संपूर्ण टीम किती अद्भुत आहे, याबाबत सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. मी मालिकेच्या मध्य काळात प्रवेश करत असल्यामुळे माझे इतके सुंदररित्या स्वागत होण्याची अपेक्षा केली नव्हती. संपूर्ण टीम दीर्घकाळापासून एकत्र काम करत आहे. पण मला असे वाटले नाही की, मी पहिल्यांदाच सेटवर येत आहे. असे वाटले की मी सर्वांना पहिल्यापासूनच ओळखतो. सर्व कलाकारांनी माझे उत्तमरित्या स्वागत केले आणि आता मी सेटवर दररोज जाण्यास उत्सुक असतो. पहिल्या दिवसापासूनच दिग्दर्शक व टीम माझ्याशी संयमाने वागत आहेत. मी काल्पनिक शैलीमध्ये पहिल्यांदाच काम करत असल्यामुळे ते मला अनेक गोष्टी समजण्यामध्ये मदत करत आहेत.
मालिकेसाठी शूटिंगला सुरूवात करून काहीच दिवस झाले असले तरी मी सेटवर प्रत्येकासोबत खूप धमाल करतो. मी नुकतेच तौबातौबाची भूमिका साकारणा-या श्रीधर सरांसोबत सीन केले आणि तो खूप चांगला अनुभव होता. ते परफॉर्म करत असताना त्यांच्या नजरेमध्ये नजर मिळवत अभिनय करणे अवघड आहे, कारण ते अत्यंत विनोदी आहेत आणि प्रत्येक सीन उत्साहाने करतात. मला या विशिष्ट सीनमध्ये गंभीर राहणे अपेक्षित होते, पण ते आले व अभिनय सादर केला, तेव्हा मी माझ्या हास्यावर नियंत्रण ठेवू शकलो नाही. त्यांच्यासोबत काम करताना नेहमीच आनंददायी वाटते. इतर सर्व कलाकार देखील त्यांच्या कामामध्ये उत्तम आहेत आणि मी सेटवर प्रत्येकासोबत धमाल करतो.
६. काल्पनिक मालिकेमध्ये काम करण्याचा अनुभव?
सुपरशक्ती असणे आणि हिरव्या स्क्रिनसमोर शूटिंग करण्याचा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे, मी यापूर्वी असा अनुभव घेतलेला नाही. म्हणूनच हा मजेशीर अनुभव आहे आणि मला अनेक नवीन गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. मी कवच परिधान करत काही अॅक्शन सीन्स देखील केले आहेत. ते काहीसे अवघड असले तरी मी हे रोमांचक सीन्स करताना खूप धमाल केली. माझी नेहमीच काल्पनिक मालिकेमध्ये काम करण्याची आणि सुपरशक्ती असलेली भूमिका साकारण्याची इच्छा होती. ‘बालवीर रिटर्न्स‘ने माझी ती इच्छा पूर्ण केली आहे.
पाहत राहा ‘बालवीर रिटर्न्स‘ दर सोमवार ते शुक्रवार
Be the first to comment on "शोएब अली सोनी सबवरील मालिका ‘बालवीर रिटर्न्स’मधील त्याच्या भूमिकेबाबत म्हणाला, ”राय अत्यंत उत्साही असून त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये मोहकता आहे”"