भरपूर मनोरंजनासाठी तयार राहा, जेथे सोनी सबवरील लोकप्रिय काल्पनिक मालिका ‘बालवीर रिटर्न्स’ प्रेक्षक व चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. मालिका बालवीरच्या जीवनातील नवीन अध्याय सादर करत प्रेक्षकांना पाण्याखालील विश्वामध्ये घेऊन जाणार आहे. मालिका जादुई पाण्याखालील विश्वातील नवीन पात्र सादर करणार आहे. प्रत्येक पात्राला पाण्याखालील विश्वाच्या भव्यतेनुसार सुरेखरित्या डिझाइन करण्यात आलेला आकर्षक लुक्स देण्यात आले आहेत. पात्रांना शक्तींचे अद्वितीय सेट देखील देण्यात आले आहेत, जे प्रेक्षकांना अचंबित करतील. चला तर मग, प्रत्येक नवीन पात्राच्या लुक्सबाबत माहिती घेऊया.
१. धडाकेबाज व शक्तिशाली – राय
राय हा तरूण, करिश्माई व देखणा आहे. पण नजरेने जे दिसते त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे. रायच्या लुक्सबाबत सांगायचे झाले तर त्याच्या योद्धाच्या पोशाखामध्ये पाण्याप्रमाणे चमकणा-या घटकांचा समावेश आहे. पोशाखाला चंदेरी, पितळ व निळसर रंगांचा लेप, तसेच हेडगिअर रायच्या शाही पार्श्वभूमीला दाखवतात. पात्राला आकर्षक लुक देण्यासाठी आणि पात्र इतरांमध्ये वरचढ दिसण्यासाठी हेडगिअर खासरित्या डिझाइन करण्यात आले आहे. पाण्याखाली जन्मलेल्या रायमध्ये श्वास रोखून धरण्याची क्षमता आहे, तसेच त्याला दुखापत होऊ शकत नाही. सूक्ष्म धार असलेल्या तलवारीने देखील स्पर्श केल्यास त्याला काहीच दुखापत न होता ती तलवार तुटते.
पात्र व लुकबाबत बोलताना शोएब अली म्हणाला, ”काल्पनिक मालिकेचा भाग असणे हा माझ्यासाठी पूर्णत: नवीन अनुभव आहे. शक्ती असलेली काल्पनिक भूमिका साकारणे हा माझ्यासाठी शिकण्यास मिळणारा अनुभव आहे. मी अशा प्रकारचा पोशाख कधीच परिधान केलेला नाही. रायचा लुक काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आला आहे. या लुकमधून त्याची चांगली व उग्र बाजू दिसून येते. सुरूवातीला माझ्या पोशाखाचे विविध भाग परिधान करताना आव्हानात्मक वाटले, पण जसे दिवस सरत गेले तसे मला आरामदायी वाटू लागले. आता मी पोशाखासह शूटिंग करत असताना मला शक्तिशाली राजकुमार असल्यासारखे वाटते. प्रेक्षकांनी नव्या सीझनमध्ये माझी भूमिका पाहावी, यासाठी मी खूपच उत्सुक आहे. राय ही रहस्यमय भूमिका आहे, जी लोकांना खूप आवडेल.”
२. निर्दयी व कपटी – बंबाल
विमर्श रोशन बंबालची भूमिका साकारताना दिसणार आहे. बंबालचा संपूर्ण लुक मगरीमधून प्रेरित आहे. पोशाख लेदरचा आहे आणि त्यामध्ये मगरीच्या त्वचेप्रमाणे घडण दिसण्यासाठी स्पाइक्स आहेत. बंबालमध्ये पाण्यामधून शस्त्रे तयार करण्याची अद्वितीय शक्ती आहे. त्याच्यामध्ये मगरीप्रमाणे सामर्थ्य आहे. त्याच्या तावडीत सापडलेला कोणताही प्राणी किंवा व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे.
या भूमिकेबाबत बोलताना विमर्श म्हणाला, ”बंबाल ही नकारात्मक भूमिका असली तरी अत्यंत प्रभावी आहे. त्याचा लुक एका मगरीप्रमाणे आहे आणि सर्व बारकावे लक्षात घेत लुक तयार करण्यात आले आहे. हा अत्यंत विलक्षण लुक आहे, जे मी यापूर्वी कधीच धारण केलेले नाही. हीच काल्पनिक शैलीची खासियत आहे. बंबालच्या मेकअपकडे बारकाईने पाहिले तर त्यामधून त्याची मगरीप्रमाणे वैशिष्ट्ये दिसून येतील. हा संपूर्ण लुक धारण करण्याकरिता काहीसा वेळ लागतो. तरीदेखील या भूमिकेची भव्यता पाहून मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.”
३. प्रमाणिक व हुशार – जलराज कायकोस
जलराज कायकोस हा वॉटर किंग्डम शिंकाईचा प्रामाणिक व सत्यवादी राजा आहे. त्याचा लुक पूर्णत: सफेद पोशाखाने नटलेला आहे, ज्यामधून त्याची निर्मळता व सकारात्मक स्वभाव दिसून येतो. प्रचंड शक्ती व अधिकार असलेल्या राजाचा लुक दिसण्यासाठी पोशाखासोबत आकर्षक आभूषणांची जोड देण्यात आली आहे. मनगटाचे कफ्स व बेल्टसह मुकुट काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आला आहे. मनगटावरील कफ्सना फिन्स व सीशेल्सचे रूप देण्यात आले असून त्यावर सोनेरी लेप देण्यात आला आहे, जे पाण्याखालील विश्वाला अनुरूप अशा सीशेल्सला देखील देण्यात आले आहे. या राजामध्ये उपचार करण्याची शक्ती आहे. तो त्याच्या स्पर्शाने कोणतीही जखम बरी करू शकतो.
४. दुष्ट व क्रूर – मिल्सा
बंबालची निष्ठावान मिल्सा ही दुष्ट भूमिका आहे. मिल्सा वॉटर किंग्डमची राणी बनण्याची तिची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने बंबालचा विश्वास मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. तिचा बालवीरला सर्वाधिक धोका असणार आहे. नकारात्मक भूमिका असलेली मिल्सा सोनेरी कडा असलेला काळ्या रंगाचा फ्लोवी गाऊन परिधान करते. आकर्षक पितळेच्या अंगठ्या पाण्याखालील विश्वाचे घटक व जलचरांमधून प्रेरित आहेत, जे भूमिकेला आकर्षक व मोहक लुक देतात.
नवीन सीझन हे लक्षवेधक लुक्स सादर करण्यास सज्ज आहे. बालवीरला दुष्टांचा सामना करत पाण्याखालील विश्वाच्या धोक्यांपासून विश्वाचे संरक्षण करताना पाहणे रोमांचक असणार आहे. दुष्टांमध्ये अद्वितीय शक्ती असल्यामुळे बालवीरसमोरील आव्हाने अत्यंत खडतर असणार आहेत.
पाण्याखालील विश्वाची भव्यता पाहा ‘बालवीर रिटर्न्स‘मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्त सोनी सबवर
Be the first to comment on "‘बालवीर रिटर्न्स’च्या नवीन सीझनमधील नवीन लुक्सचा उलगडा"