सोनी सबवरील ‘कॅरी ऑन आलिया’मध्‍ये पाहा आलियाचा नवीन अवतार

क्‍लासरूम ते न्‍यूजरूमपर्यंत – आलिया अब हर खबर की लेगी खबर.

मुंबई27 अगस्‍त2020 (GPN): सोनी सबवरील उत्‍साही आलिया कॅरी ऑन आलियासह नवा अवतार धारण करण्‍यास सज्‍ज आहे. मालिका नवीन रोमांचक पटकथा सादर करण्‍यास सज्‍ज आहे. आलियासह इतर शिक्षक टेलिव्हिजन न्‍यूज रिपोटर्स म्‍हणून नवीन प्रवास सुरू करतात.

चाहत्‍यांना अनेक अचंबित करणारे क्षण पाहायला मिळणार आहेत. छावी पांडे साकारत असलेली भूमिका तारा तिचे सत्‍य उघडकीस आल्‍यानंतर आग्रा सोडून जाणार आहे. दुसरीकडे मुख्‍याध्‍यापिका सौदामिनीला (नीलू कोहली) नफ्याच्या अभावी शाळा बंद करावी लागली. तिने घेतलेल्‍या या निर्णयामुळे सर्व कर्मचारी बेरोजगार झाले आहेत आणि सर्वांसमोर मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे – ‘पुढे काय होणार?’

न्‍यूज रिपोर्टिंगसह नवीन वळण घेतलेल्‍या मालिकेमध्‍ये आलिया नवीन अँकर म्‍हणून तिची जादू दाखवणार आहे. ती आता न्‍यूज चॅनेल ‘देश की धडकन’शी संबंधित नवीन कथेसह प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करणार आहे. हे नवीन परिवर्तन धमाल प्रवासाचे वचन देते. आलिया व टीम त्‍यांची पत्रकारिता कौशल्‍ये व विलक्षण विचारांचा उपयोग करत मजेशीर व रोमांचक घटनांचे निराकरण करण्‍याच्‍या मिशनवर जाणार आहेत. आलिया उत्‍साही न्‍यूज अँकरच्‍या रूपात आनंद पसरवणार आहे, तर आलोक धडाकेबाज स्‍पोर्टस् व हेल्‍थ रिपोर्टरच्‍या रूपात दिसणार आहे.

‘कॅरी ऑन आलिया’मध्‍ये प्रेक्षकांना काही नवीन चेहरे पाहायला मिळतील. मोहक रिपोर्टर धडकनच्‍या भूमिकेत जिया मुस्‍तफा आणि न्‍यूज चॅनेलचा चतुर फायनान्शियर विजय वाजपेयीच्‍या भूमिकेत अभिनेता दीपक पारिख हे कलाकार मालिकेमध्‍ये प्रमुख भूमिकांसह सामील होणार आहेत.

आलिया व टीम चाहत्‍यांना उत्तम बातम्‍या सादर करणार आहेत. आगामी एपिसोड्समध्‍ये न्‍यूज चॅनेल ‘देश की धडकन’च्‍या स्‍थापनेचा प्रवास आणि त्‍यासंबंधित नाट्यमय घटना पाहायला मिळणार आहेत.

‘कॅरी ऑन आलिया’ हे काल्‍पनिकतेसह अकाल्‍पनिक घटनांचे सुरेख मिश्रण असलेले हलके-फुलके संकलन आहे, जे हलक्‍या-फुलक्‍या मूल्याधारित कन्‍टेन्‍टसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍याचे वचन देते आणि तुम्‍हाला हसवून-हसवून लोटपोट करण्‍याची खात्री देते. स्‍टाफरूमपासून न्‍यूजरूमपर्यंतचा हा प्रवास कसा ठरतो, ही एका उत्‍साहवर्धक प्रवासाची सुरूवात असेल का? जाणण्‍यासाठी पाहा ‘कॅरी ऑन आलिया’.

आलियाची भूमिका साकारणारी अनुषा मिश्रा म्‍हणाली, ”मी नेहमीच पत्रकारांचा खूप आदर करते. ‘कॅरी ऑन आलिया’चा भाग म्‍हणून मला आनंद होत आहे की, मला अँकरची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली आहे. मला आजही आठवते की, बालपणी मी आरशासमोर बसून अगदी अँकरप्रमाणे बातम्‍या सांगायची आणि खूप धमाल करायची. माझ्या कॉलेज इव्‍हेण्‍ट्समध्‍ये अँकरची भूमिका बजावण्‍याचा अनुभव देखील यावेळी उपयुक्‍त ठरेल. क्‍लासरूम्‍सच्‍या धावपळीमधून आलिया आता न्‍यूजरूमच्‍या उत्‍साहवर्धक धावपळीमध्‍ये गुंतली आहे. मालिका अधिक धमाल व सर्वसमावेशक कथानकाची खात्री देते आणि मालिकेमध्‍ये नवीन पात्रांसह नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत.”

आलोकची भूमिका साकारणारा हर्षद अरोरा म्‍हणाला, ”स्‍टाफरूम्‍सपासून न्‍यूजरूम्‍सपर्यंतचा प्रवास उत्‍साहवर्धक असणार आहे. चाहत्‍यांना आलिया व आलोकच्‍या जीवनातील पूर्णत: नवीन अध्‍याय पाहायला मिळणार आहे. क्रीडा शिक्षकानंतर मी आता स्‍पोर्टस् रिपोर्टरची भूमिका साकारणार आहे आणि हा संपूर्ण प्रवास एखाद्या साहसी कृत्‍यासारखाच आहे. मी आमच्‍या सर्व चाहत्‍यांना या प्रवासाचा भाग होण्‍याचे आवाहन करतो. मालिकेमध्‍ये काही रोमांचक वळण पाहायला मिळणार आहेत. आम्‍ही सर्वांनी ‘कॅरी ऑन आलिया’साठी शूटिंग करताना खूप धमाल केली आणि मला प्रबळ विश्‍वास आहे की, चाहत्‍यांना देखील हे पाहायला खूप आवडेल.”

पाहा कॅरी ऑन आलिया ३१ ऑगस्‍टपासून दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७.३० वाजता फक्‍त सोनी सबवर

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सोनी सबवरील ‘कॅरी ऑन आलिया’मध्‍ये पाहा आलियाचा नवीन अवतार"

Leave a comment

Your email address will not be published.


*