तुम्ही हृदयरोगाने त्रस्त असाल तर ही काळजी घ्या.- डॉ. नारायण गडकर, सल्लागार कार्डिओलॉजिस्ट, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर

मुंबई, 24 ऑगस्ट, 2020 (GPN):

• डॉ. नारायण गडकर, सल्लागार कार्डिओलॉजिस्ट
, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर -

सध्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठिण होत आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. परंतु, अशाच दुर्लक्षामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा कळत नाही. केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटँक असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इथपासून ते हृदयविकाराचे प्रकार, तुम्हाला हृदयविकार असल्यास काय करावेत? कशी काळजी घ्यावी? याबाबत तज्ज्ञ हृदयविकार तज्ज्ञांद्वारे माहिती देण्यात आली आहे.
भारतात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांचा आकडा सर्वांधिक आहे. दिवसेंदिवस हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढतेय. हा हृदयविकार होण्याची अनेक कारणं जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण अतिताणतणाव, धुम्रपान, अयोग्य जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, वाढत वयं आणि लठ्ठपणा आदी कारणांमुळे हृदयविकार होतात. याशिवाय, बऱ्याचदा अनुवांशिकता हे सुद्धा एक कारण आहे. परंतु, हृदयविकार आपणं नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी आहारात योग्य बदल आणि नियमित व्यायाम केल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो.
आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला की, हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. अशावेळी अचानक हृदय बंद पडते. याला हृदयविकारचा झटका आला असं म्हटलं जाते.
हृदयविकाराचे प्रमुख प्रकारः-
१) कोरोनरी आर्टरी डिसीज – कोरोनरी हार्ट डिसीज हा एक आजार आहे. ज्यात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पुरवठा करतात त्यांच्या कडांवर प्लेक (फॅटी पदार्थ) जमा होतात. यामुळे हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं. हा हृदयरोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. छातीत दुखणं, छाप लागणं, मळमळ होणे, अचानक चक्कर येणं आणि घाम येणं ही या आजारात लक्षणं दिसून येतात.
२) हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी – हा अनुवांशिक आजार असून हृदयाच्या स्नायूंशी संबंधित आहे. या आजारात थकवा, चक्कर येणं, छातीत दुखणे, श्वास न लागणे आणि पाय सुजणे ही लक्षणे दिसून येतात.
३) जन्मजात लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित विकार दिसून येतात. जसे की, हार्ट वाल्व्ह आणि वॉल दोष), भूक न लागणे, वजन न वाढणे, अंग निळसर दिसणं, श्वास घेताना अडचण जाणवणे ही नवजात मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं दिसून येतात.
४) कुठल्याही प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग हृदयापर्यंत पोहोचल्यासही हृदयविकार होऊ शकतो. यामुळे हृदयात जळजळ होणं ही समस्या उद्भवते.
हृदयविकार कशामुळे होतो हे माहिती असणं गरजेचं आहे –
• उच्च रक्तदाब:- जेव्हा रक्तवाहिन्या आणि इतर रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दबाव जास्त असतो तेव्हा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो. या उच्च रक्तदाबाचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास हदयासह, मूत्रपिंड, मेंदू आणि शरीराच्या अन्य अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो.
• अनियंत्रित कोलेस्टेरॉलची पातळी:- शरीरात चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयविकार होऊ शकतो. यामुळे रक्तवाहिन्या अरूंद होतात आणि हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि शरीराच्या इतर भागात रक्तप्रवाह कमी होऊ लागतो.
• मधुमेहः- रक्तात साखरेचं प्रमाण अधिक असल्यास मधुमेहाची लागण होते. हा मधुमेह नियंत्रणात न ठेवल्यास हृदयावर याचा परिणाम होऊ शकतो.
• लठ्ठपणाः- लठ्ठपणा हा अनेक आजारांना निमंत्रण देतो. जसे की, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तसेच हृदयरोग देखील होतो.
हृदयविकाराची प्रमुख कारणेः-
• हृदयाला रक्तपुरवठा योग्यपद्धतीने न झाल्यास हा आजार होऊ शकतो
• व्यायामाचा अभाव
• अतिताणतणाव
• धुम्रपान व मदयपानाची सवय
• लठ्ठपणा
• अयोग्य जीवनशैली
• पौष्टिक आहाराचा अभाव
हदयविकार टाळण्यासाठी खास टिप्सः-
• तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाच्या धमक्यांवर परिणाम होतो. यामुळे धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणे टाळावेत.
• शारीरिकदृष्ट्या तंदूरूस्त राहण्याने आपल्या हृदयाचे कार्य सुधारते. यामुळे सायकलिंग, चालणे, पळणे, पोहणे, अँरोबिक व्यायाम, ट्रेडिमिल आणि नियमित जॉगिंग करा. दररोज शारीरिक व्यायाम केल्याने शरीराला ऑक्सिजन योग्यप्रमाणात मिळण्यास मदत होते. याशिवाय हृदयाचे पंपिंग योग्यपद्धतीने होते.
• लठ्ठपणा टाळण्यासाठी विविध उपाय करा
• शाकाहारी, नट्स, बियाणे खावेत, ज्यामुळे आपल्या हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढेल.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "तुम्ही हृदयरोगाने त्रस्त असाल तर ही काळजी घ्या.- डॉ. नारायण गडकर, सल्लागार कार्डिओलॉजिस्ट, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर"

Leave a comment

Your email address will not be published.


*