मुंबई, २८ जुलै २०२०: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकतेच बहुप्रतिक्षित नवीन अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज ‘बंदिश बँडिट्स’ची घोषणा केली. ४ ऑगस्ट २०२० पासून ही सिरीज पाहण्यास मिळेल. अमृतपाल सिंग बिंद्रा यांची निर्मिती आणि आनंद तिवारी यांचे दिग्दर्शन असलेली नवीन अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज जोधपूर स्थित आहे. ही नवीन सिरीज विरूद्ध पार्श्वभूमी असलेल्या दोन तरूण संगीतकारांची कथा सादर करते. या सिरीजमध्ये रित्विक भौमिक व श्रेया चौधरी प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच नसीरूद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, शीबा चड्ढा, हे कलाकार देखील इतर प्रमुख भूमिकेत आहेत. ‘बंदिश बँडिट्स’मध्ये दिग्गज संगीतकार त्रिकूट शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेले उत्साहवर्धक ओरिजिनल साऊंडट्रॅक आहे. हे संगीतकार या सिरीजच्या माध्यमातून त्यांचे डिजिटल पदार्पण करत आहेत.
‘बंदिश बँडिट्स’मध्ये रित्विकने महत्त्वाकांक्षी संगीत सम्राटची भूमिका साकारली आहे. त्याला वेगळे राहण्यासोबत शुद्धीकरणाच्या खडतर प्रथेमधून जावे लागते. रित्विक म्हणाला, ”राधेच्या भूमिकेसाठी कोणताही शारीरिक बदल करावा लागला नाही किंवा प्रशिक्षण घ्यावे लागले नाही. पण मला ५७ अंश सेल्सिअसच्या उकाड्यामध्ये ३ दिवसांचे सीक्वेन्स शूट करण्याबाबत मनाची तयारी करण्यास सांगण्यात आले. मी संपूर्ण सीनचे शूटिंग होईपर्यंत अनवाणी व टॉपलेस होतो. आम्हाला माहित होते की, आमच्याबाबतीत काहीतरी चांगले होणार आहे, म्हणून आम्ही आनंदी चेह-याने सीक्वेन्सचे शूटिंग सुरूच ठेवले.”
तो पुढे म्हणाला, ”शूटिंग सुरू होण्यापूर्वी निर्मात्यांनी मला शोमध्ये नैसर्गिक लुक दिसण्यासाठी दररोज धावायला सांगितले. यामुळे मी शूटिंगच्या वेळी अधिक दमल्यासारखा दिसलो. मला यासाठी इतर प्रमुख कलाकार करत असलेले व्यायाम किंवा नित्याचा डाइट्स करण्याची गरज भासली नाही. पण मला वाटते की राधेची भूमिका साकारल्यानंतर मी अधिक शिस्तबद्ध व्यक्ती बनलो आहे.”
‘बंदिश बँडिट्स’ ही राधे व तमन्नाची कथा आहे. राधे हा प्रतिभावान गायक असून त्याने त्याच्या आजोबांच्या शास्त्रीय संगीताच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा निर्धार केला आहे. तमन्ना ही उदयोन्मुख पॉप सेन्सेशन असून तिची भारताची पहिली आंतरराष्ट्रीय पॉपस्टार बनण्याची इच्छा आहे. राधे तमन्नाच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याचे जीवन संकटमय होऊन जाते. तो तिचे सुपरस्टारडम बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये मदत आणि त्याचे स्वत:चे संगीत स्वप्न पूर्ण करण्यासोबत त्याच्या कुटुंबाचा वारसा पुढे घेण्याचा प्रयत्न यादरम्यान अडकला आहे. तो त्याच्याकडे असलेले सर्व गमावण्याचा धोका पत्करत या दोन्ही जबाबदा-या पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होईल का?
तमन्ना व राधे यांच्यामधील मोहक जुगलबंदी पाहण्यासाठी पाहा ‘बंदिश बँडिट्स’ ४ ऑगस्टपासून फक्त अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर.
Be the first to comment on "‘बंदिश बँडिट्स’साठी शूटिंग करण्याबाबत रित्विक भौमिक म्हणाला, ”मला राजस्थानच्या ५७ अंश तापमानामध्ये अनवाणी व टॉपलेस स्थितीत शूटिंग करण्यासाठी मनाची तयारी करावी लागली”"