तुम्‍हाला माहित आहे का, पडद्यावरील जोडी विद्या बालन व जिशू सेनगुप्‍ता पडद्यामागे थट्टामस्‍करी करण्‍यामधील भागीदार आहेत?

Vidya Balan and Jisshu Sengupta
Vidya Balan and Jisshu Sengupta

Vidya Balan and Jisshu Sengupta

मुंबई, २  जुलै २०२०: अ‍ॅमेझॉन  प्राइम व्हिडिओवर  चित्रपट ‘शकुंतला देवी’च्‍या जागतिक प्रीमियर सादर केल्‍याच्‍या काही दिवसांपूर्वी असे निदर्शनास आले की, विद्या बालन व जिशू सेनगुप्‍ता यांना पडद्यामागे समान आवड होती, ती म्‍हणजे चित्रपटाच्‍या सेटवर थट्टामस्‍करी करणे. सूत्राने सांगितले,”संपूर्ण शूटिंगदरम्‍यान त्‍यांनी एकत्र टीमची मस्‍करी केली,विनोद केले आणि सेटवर त्‍यांच्‍या हास्‍यकल्‍लोळपूर्वी बंगाली भाषेमध्‍ये एकमेकांशी चर्चा केली. त्‍यांनी नृत्‍य केले, खदखदून हसले आणि खूप धमाल केली, ज्‍यामुळे त्‍यांची पडद्यावरील केमिस्‍ट्री पाहताना खूप मजेशीर वाटते.”

तसेच असे निदर्शनास आले की, विद्या बालन या सर्व खोडकर मस्‍करींमागे मास्‍टरमाइण्‍ड होती. तिच्‍या विविध मस्‍करींबाबत अधिक सांगताना सेटवरील एका सूत्राने सांगितले, ”शूटिंगदरम्‍यान विद्या खडूने आमच्‍या जॅकेट्सवर लिहायची, मजेशीर आवाजांमध्‍ये लोकांची नावे घेत त्‍यांना बोलवायची आणि ते लोक आसपास गोंधळलेल्‍या स्थितीत बघायचे, तेव्‍हा फिदीफिदी हसायची. तिने लोकांचे फोन्‍स लपवले आणि जवळपास प्रत्‍येकाला चिडवले. दररोज तिचे हास्‍य पाहून आणि हसण्‍याचा आवाज ऐकून टीमचे आव्‍हानात्‍मक दिवस देखील चांगले गेले.”

विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला ‘शकुंतला देवी हा गणितज्ञ, लेखिका व ज्‍योतिषी शकुंतला देवीच्‍या असाधारण जीवनावर आधारित आत्‍मचरित्रात्‍मक चित्रपट आहे. त्‍या मानवी संगणक म्‍हणून लोकप्रिय होत्‍या. अ‍ॅमेझॉन  प्राइम व्हिडिओवर ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणारा विद्या बालन अभिनीत चित्रपट ‘शकुंतला देवी’ पाहण्‍यास विसरू नका. ENDS

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "तुम्‍हाला माहित आहे का, पडद्यावरील जोडी विद्या बालन व जिशू सेनगुप्‍ता पडद्यामागे थट्टामस्‍करी करण्‍यामधील भागीदार आहेत?"

Leave a comment

Your email address will not be published.


*