पावसाळ्यात उद्भवणा-या श्वसनाच्या समस्यांपासून असे रहा दूर: डॉ अरविंद काटे, फुफ्फुसविकार तज्ञ, झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल, चेंबूर

Dr. Arvind Katel Pulmonologist Zen Multispeciality Hospital, Chembur

Dr. Arvind Katel Pulmonologist Zen Multispeciality Hospital, Chembur

मुंबई, 27 जुलै, 2020 (जीपीएन):

– गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या उष्णतेला कंटाळलेले सारेच आता पावसाच्या आगमनाने सुखावले आहे. मात्र हे बदलते वातावरण आरोग्यासाठी तितकेच हानीकारक असून श्वसन विकार, छातीत जळजळ अशा विकारांना आमंत्रण देते. म्हणून या दिवसात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसे सतत पावसात भिजणे, ओले कपडे अंगावर अधिक काळ राहणे, केस ओले न ठेवणे, मास्कचा वापर करणे, स्वच्छता राखणे तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यामध्ये योग्य खबरदारी न घेतल्यास कोणत्या श्वसन विकारांना सामोरे जावे लागते याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
दमा हे अप्पर रेस्पीरेटरी इन्फेक्शन (विविध प्रकारचे सामान्य सर्दी, टॉन्सिलिटिस आणि सायनस इन्फेक्शन) आहे. याची सामान्य लक्षणे खोकला, वाहणारे नाक, घसा खवखवणे आणि शिंका येणे, छातीत घरघर आणि फुफ्फुसातील फायब्रोसिस देखील आमंत्रित करतात.
त्याचप्रमाणे, कमी लोअर रेस्पीरेटरी ट्रक्ट इन्फेक्शन्स (फुफ्फुसात किंवा श्वासोच्छवासाच्या श्वसनमार्गामध्ये उद्भवते). यामध्ये न्यूमोनिया (दोन्ही फुफ्फुसाचा संसर्ग), ब्राँकायटिस , क्षयरोग किंवा टीबी यांचा समावेश आहे. यामुळे खोकला, श्वास घेण्यात अडचणी येणे आणि छातीत रक्तसंचय होते. म्हणूनच श्वासोच्छवासाच्या या सामान्य समस्यांपासून स्वत: ला दूर ठेवण्यासाठी पावसापासून दूर राहणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात उद्भवणा-या श्वसनमार्गातील अडचणींपासून असे दूर रहा
फप्फुसाला निरोगी ठेवण्यात मदत करणा-या पदार्थांचा आहारात समावेश असू द्या. जसे की ओमेगा ३ फॅटी एसिडयुक्त पदार्थांचे सेवन करा अक्रोड, ब्रोकोली, सफरचंद तसेच एन्टीऑक्सीडंट्सचाही आहारात समावेश करा. बेरी, पपई, अननस, कोवी, गाजर, हळद, आलं यांचा जेवणात समावेश करा. भरपूर पाणी प्या.
दररोज व्यायाम करा. स्वस्थ राहण्यासाठी योगाभ्यास तसेच मेडिशनसारख्या पर्यांचा वापर करा.
दररोज गरम पाण्याची वाफ घ्या. फुफ्फसामध्ये जमा होणारा कफ काढून टाकण्यास याची नक्कीच मदत होईल. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.
धुम्रपान करणे टाळा. तसेच पॅसिव्ह स्मोकींगही तितकेच धोक्याचे असून त्यापासून दूर रहा.
खोकताना व शिंकताना तोंडासमोर रुमाल धरा.
जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर लागणारी औषधांचा घरात पुरेसा साठा करून ठेवा.
नियमित फप्फुसांचा व्यायाम करा. त्याने फुफ्फसात साचलेला कफ दूर ठेवण्यास मदत होईल.
पावसात बाहेर पडणे टाळा. धुर,धुळ आणि प्रदुषकांपासून दूर रहा.
रस्त्यावर इतरत्र थुंकु नका. आणि जर कोणी तसे करताना दिसले तर त्यांना तिथेच थांबवा.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "पावसाळ्यात उद्भवणा-या श्वसनाच्या समस्यांपासून असे रहा दूर: डॉ अरविंद काटे, फुफ्फुसविकार तज्ञ, झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल, चेंबूर"

Leave a comment

Your email address will not be published.


*