MUMBAI, 09 JULY, 2020 (GPN):

Anusha Mishra As Alia on Sony Sab
१. आलियाचे विश्व कशाप्रकारे बदलणार आहे आणि मालिकेमधील तुझी भूमिका कशी असणार आहे?
आलिया ही लढाऊ आहे. ती स्वत:च्या असुरक्षिततेविरोधात लढा देण्यासोबत तिच्या कुटुंबाचे संरक्षण करत आहे. तसेच ती इतरांना देखील साह्य करत आहे. तिची भूमिका काळानुरूप प्रबळ होत आहे. आगामी एपिसोड्समध्ये आलिया पूर्णत: नवीन भूमिकेमध्ये दिसणार आहे. शाळा हिंदी व इंग्रजी माध्यमांमध्ये विभागण्यात आल्यानंतर तिचे विश्व बदलून जाते. प्रेक्षकांना आलियाची वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे, जेथे ती पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ बनत तिच्यासमोर येणा-या मोठ्या आव्हानाचा सामना करते. ती आता लीडरशीप भूमिकेमध्ये दिसणार आहे. ती आता हिंदी माध्यमाची उपमुख्याध्यापिका बनली आहे.
२. सोनी सबवरील मालिका ‘तेरा क्या होगा आलिया‘मधील आगामी देसी वि. अंग्रेजी ट्विस्टमधून प्रेक्षक काय अपेक्षा करू शकतात?
प्रेक्षकांनी मालिकेमधील ‘देसी वि. अंग्रेजी‘ट्विस्टसाठी तयार राहावे. हे अत्यंत उत्साहवर्धक आहे. हा ट्विस्ट आपण सर्व कशाप्रकारे मोठे झालो या संकल्पनेला दाखवतो. नवीन मुख्याध्यापकांच्या प्रवेशासह शाळा हिंदी माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन विभागांमध्ये विभागण्यात येणार आहे. आलिया हिंदी माध्यमाचे नेतृत्व सांभाळणार आहे, तर तारा इंग्रजी माध्यमाची प्रमुख असणार आहे. आलिया व तारामधील संघर्ष वाढणार आहे. त्या त्यांच्या संबंधित विभागांच्या प्रमुख आहेत आणि कोणाचा विभाग चांगली कामगिरी करतो याबाबत संघर्ष करताना दिसणार आहेत. ही नवीन ‘आलिया की देसी पाठशाला‘ ताराच्या अंग्रेजी स्वॅगपेक्षा कमी नाही. तसेच प्रेक्षकांना आलियाच्या जीवनातील या नवीन अध्यायामध्ये काही नवीन पात्रे देखील पाहायला मिळणार आहेत.
३. तू हिंदी माध्यमाची उपमुख्याध्यापिका म्हणून या नवीन भूमिकेसाठी कशाप्रकारे तयारी करत आहेस?
‘तेरा क्या होगा आलिया‘मधील आलियाची भूमिका साकारण्यासाठी मी यापूर्वीच हिंदी बोलीभाषेचे ज्ञान घेतले होते. मालिकेची कथा आग्राच्या पार्श्वभूमीची आहे. आता आलिया हिंदी माध्यमाची उपमुख्याध्यापिका बनणार असल्यामुळे विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिचे हिंदी अधिक उत्तम असणे गरजेचे आहे. मी माझे हिंदी बोलण्याची कौशल्ये अधिक निपुण करत आहे आणि नवनवीन गोष्टी शिकताना खूप मजा देखील येत आहे.
४. आलिया व तारामधील संबंध कशाप्रकारे बदलणार आहेत?
आलिया व तारामधील स्पर्धात्मक संबंध अधिक प्रखर होणार आहेत. त्या आता त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये स्पर्धा करण्यासोबत त्यांच्या संबंधित विभागांना सर्वोत्तम प्रकारे सादर करण्याचा देखील प्रयत्न करणार आहेत. नवीन एपिसोड्स मनोरंजनाने भरलेले असून आलिया व ताराला सामना करावी लागणारी आव्हाने पाहायला मिळणार आहेत. आगामी एपिसोड्समध्ये आलियाचे आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व ताराला‘काटें की टक्कर‘ देणार आहे. हा लढा कोण जिंकतो आणि आलियाला कोणत्या चाचण्यांमध्ये यशस्वी ठरावे लागते हे पाहणे रोमांचकारी असणार आहे.
५. ३ महिन्यांनंतर पुन्हा शूटिंगवर परतल्याने कसे वाटत आहे?
मी सध्याच्या अनपेक्षित काळादरम्यान पुन्हा शूटिंग सुरू करण्याबाबत सुरूवातीला काहीसी चिंताग्रस्त होते. पण सोनी सब व प्रॉडक्शनने सेटवर घेतलेले खबरदारीचे उपाय पाहिल्यानंतर मला सुरक्षित वाटले आणि माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आम्ही प्रत्येकवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहोत आणि कथेमध्ये देखील या बदललेल्या काळाची एक झलक पाहायला मिळणार आहे. तसेच माझ्या सर्व सह-कलाकारांना पुन्हा भेटून खूप आनंद झाला. पुन्हा कॅमे-यासमोर आल्याने चांगले वाटत आहे. मी आलियाच्या भूमिकेत पुन्हा एकदा सामावून जात शूटिंग सुरू करण्यासाठी खूपच उत्सुक आहे.
६. तुझ्या चाहत्यांसाठी एखादा संदेश?
सोनी सबवरील मालिका ‘तेरा क्या होगा आलिया‘चे चाहते व प्रेक्षकांना मला सांगावेसे वाटते की, प्रतिक्षाकाळ अखेर संपला आहे. आलिया काही नवीन चेहरे व पटकथा आणि नवीन अवतारासह लवकरच परतणार आहे. मी या अनपेक्षित काळादरम्यान देखील आमच्यावर सातत्याने प्रेमाचा वर्षाव करण्यासोबत आम्हाला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभार मानते. तर मग#SwitchOnSAB, जेथे आम्ही १३ जुलैपासून अनेक सरप्राईजेजसह नवीन एपिसोड्स घेऊन येत आहोत. आमच्यासोबत या ‘खुशियोंवाला झोन‘मध्ये सामील व्हा.
१३ जुलैपासून #SwitchOnSAB आणि आलियाच्या देसी पाठशालामध्ये नोंदणी करत मनोरंजनाचा आनंद घ्या दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७ वाजता
Be the first to comment on "‘आलिया की देसी पाठशाला’ ताराच्या अंग्रेजी स्वॅगपेक्षा कमी नाही"