सोनी सबवरील मालिका ‘तेरा क्‍या होगा आलिया’ नवीन एपिसोड्स व नवीन कलाकारांसह परतणार

IMG_20200701_101159मुंबई, ३० जून २०२०: सोनी सबवरील मालिकांच्‍या चाहत्‍यांसाठी उत्‍साहपूर्ण काळ लवकरच येणार आहे. सर्व मालिकांचे शूटिंग पुन्‍हा सुरू झाले आहे आणि लवकरच मालिकांचे नवीन एपिसोड्स पाहायला मिळणार आहेत. सोनी सबवरील हलकी-फुलकी कौटुंबिक मनोरंजनपूर्ण मालिका तेरा क्‍या होगा आलियाने देखील नवीन एपिसोड्ससाठी नवीन रोमांचपूर्ण पटकथेसह शूटिंगला सुरूवात केली आहे.

Neelu Kohli- Principal Saudamini in Sony SAB Tera Kya Hoga Alia -Photo By GPN

Neelu Kohli- Principal Saudamini in Sony SAB Tera Kya Hoga Alia -Photo By GPN

Aarvika Gupta- Yashika in Sony SAB Tera Kya Hoga Alia -Photo By GPN

Aarvika Gupta- Yashika in Sony SAB Tera Kya Hoga Alia -Photo By GPN

आलिया व ताराच्‍या जीवनामधील नवीन अध्‍यायाचा उलगडा होणार असताना मालिकेमध्‍ये तारा व सौदामिनीच्‍या भूमिकेमध्‍ये अनुक्रमे छावी पांडे व नीलू कोहलीचा प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. तेरा क्‍या होगा आलिया मालिका आलिया (अनुषा मिश्रा),आलोक (हर्षद अरोरा) आणि तारा यांच्‍या अवतीभोवती फिरते. हे तिघेही आग्रामधील ज्ञानसरोवर स्‍कूलमध्‍ये शिक्षक आहेत.

आलिया व ताराच्‍या जीवनाला मोठे वळण मिळणार आहे, जेथे त्‍या त्‍यांच्‍या व्‍यावसायिक जीवनांमध्‍ये नवीन भूमिका घेण्‍यासाठी सज्‍ज आहेत. एकाच शाळेमध्‍ये शिक्षिका असल्‍यामुळे आलिया व तारा उप-मुख्‍याध्‍यापिका पदासाठी एकमेकांशी स्‍पर्धा करत आल्‍या आहेत. पण नवीन मुख्‍याध्‍यापिका सौदामिनीच्‍या येण्‍याने शाळा हिंदी माध्‍यम व इंग्रजी माध्‍यम अशा दोन विभागांमध्‍ये विभागण्‍यात येणार आहे. नीलू कोहलीद्वारे साकारण्‍यात येणारी भूमिका सौदामिनी ही कडक मुख्‍याध्‍यापिका आहे, जी तिच्‍या कर्तव्‍यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्‍यास तत्‍पर आहे. शाळा दोन विभागांमध्‍ये विभागण्‍यात आली आहे, जेथे आलिया हिंदी माध्‍यमाची उप-मुख्‍याध्‍यापिका आहे, तर छावी पांडेद्वारे साकरण्‍यात येणारी भूमिका तारा इंग्रजी माध्‍यमाची उप-मुख्‍याध्‍यापिका आहे.

मालिकेच्‍या विद्यमान कलाकारांमध्‍ये छावी व नीलू यांचा नवीन प्रवेश आहे. या विभागणीसह कथेमध्‍ये नवीन शिक्षक सादर करण्‍यात येणार आहेत. अत्‍यंत मोहकशाइनी दिक्षित फ्रेंच भाषा व इतिहास शिक्षिका काव्‍या क्लिंटनची भूमिका साकारणार आहे. ती लंडनमधील असून तिचे वडिल ब्रिटीश व आई भारतीय आहे. तिने युकेमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे आणि ती भारतीय संस्‍कृती जाणून घेण्‍यासाठी भारतामध्‍ये आली आहे. ग्‍लॅमरसमध्‍ये अधिक भर करत आर्विका गुप्‍तागणित शिक्षिका वाय ऊर्फ याशिका गुप्‍ता म्‍हणून प्रवेश करणार आहे. तिला तिचे मूळ नाव आवडत नाही आणि म्‍हणूनच ती स्‍वत:ला वाय हाक मारण्‍याला प्राधान्‍य देते. वाय ही मध्‍यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्‍मलेली आहे, पण तिला या गोष्‍टीची लाज वाटते आणि म्‍हणूनच ती उच्‍चभ्रू व्‍यक्‍तीप्रमाणे वागण्‍याचा प्रयत्‍न करते.

ताराची भूमिका साकारणारी छावी पांडे म्‍हणाली, ”मला ताराच्‍या भूमिकेत तेरा क्‍या होगा आलियामालिकेमध्‍ये प्रवेश करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही शूटिंग करण्‍याला खूप काळ लोटला आहे आणि मला शूटिंगची खूप आठवण येत होती. माझ्यासाठी ही नवीन सुरूवात आहे. मी अवघड काळानंतर एका नवीन मालिकेमध्‍ये काम करणार आहे. मला खात्री आहे की,मी सर्व कलाकारांसोबत धमाल करणार आहे. तारा ही अत्‍यंत मोहक आहे आणि ती आता शाळेतील इंग्रजी माध्‍यम विभागाची उप-मुख्‍याध्‍यापिका असणार आहे. म्‍हणून मी ही भूमिका साकारण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. मी आशा करते की, प्रेक्षक देखील ही भूमिका पाहण्‍याचा आनंद घेतील.

सौदामिनीची भूमिका साकारणारी नीलू कोहलीम्‍हणाली, ”सौदामिनीने नवीन मुख्‍याध्‍यापिका म्‍हणून शाळेमध्‍ये प्रवेश केला आहे. ती शाळेमध्‍ये येताच शाळेला दोन विभागांमध्‍ये विभागते. सौदामिनीच्‍या प्रवेशासह मालिकेमध्‍ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत आणि ते निश्चितच प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. ही अत्‍यंत प्रबळ भूमिका आहे, जेथे सौ‍दामिनी ही रूल मेकर, लीडर व व्‍यवसायी वृत्तीची महिला आहे. मी ही भूमिका साकारण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. आशा करते की, मी या भूमिकेला योग्‍य न्‍याय देईन.

अधिक माहितीसाठी पाहा तेरा क्‍या होगा आलियाचे नवीन एपिसोड्स लवकरच फक्‍त सोनी सबवर

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सोनी सबवरील मालिका ‘तेरा क्‍या होगा आलिया’ नवीन एपिसोड्स व नवीन कलाकारांसह परतणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*