‘बिग बी’चे पुनरागमन: ‘सेगमेंट-फर्स्‍ट’ ६.६ इंची डॉट-इन डिस्‍प्‍ले व १३ मेगापिक्‍सल एआय क्‍वॉड कॅमेरा असलेला ‘टेक्‍नो स्‍पार्क ५’ सादर; किंमत फक्‍त ७९९९ रूपये

IMG_20200521_233050

  • स्‍पार्क ५ हा १३ मेगापिक्‍सल रिअर एआय क्‍वॉड-कॅमेरासह मोठे ६.६ इंची डॉट-इन डिस्‍प्‍ले असलेला सब-८के विभागामधील एकमेव स्‍मार्टफोन
  • टेक्‍नोच्‍या सर्वोत्तम ‘डोअरस्‍टेप डिलिव्‍हरी’उपक्रमाची सेवा स्‍पार्क ५ साठी देखील देण्‍यात येणार; हा स्‍मार्टफोन ३५,००० हून अधिक ऑफलाइन रिटेल नेटवर्कमध्‍ये उपलब्‍ध असणार
  • स्‍पार्क ५ २२ मे २०२० पासून Amazon.in  वर देखील उपलब्‍ध असणार

नवी दिल्‍ली, २१ मे २०२०: टेक्‍नो या जागतिक प्रि‍मिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने त्‍यांच्‍या लोकप्रि‍य व यशस्‍वी स्‍पार्क सिरीजअंतर्गत आणखी एक सर्वोत्तम स्‍मार्टफोन’टेक्‍नो स्‍पार्क ५’च्‍या लाँचची घोषणा करत त्‍यांच्‍यासेगमेंट-फर्स्‍ट प्रतिष्‍ठेप्रतीची कटिबद्धता पुन्‍हा एकदा सिद्ध केली आहे. ७९९९ रूपये किंमत असलेला टेक्‍नो स्‍पार्क ५ हा १३ मेगापि‍क्‍सल क्‍वॉड्रपल रिअर कॅमेरा सेट-अप आणि मोठा ६.६ इंची डॉट-इन डिस्‍प्‍ले असलेला ८के विभागामधील पहिला स्‍मार्टफोन आहे. सेगमेंट-फर्स्‍ट ऑफरिंगमधून टेक्‍नोचा ‘अहेड-ऑफ-दि-कर्व्‍ह’दृष्टिकोनाशी बांधील राहण्‍याचा प्रयत्‍न दिसून येतो. या दृष्टिकोनाचा ग्राहकांना भविष्‍यासाठी सुसज्‍ज असे डिवाईसेस देण्‍याचा मनसुबा आहे. आपल्‍या तत्त्वाशी बांधील राहत टेक्‍नो स्‍मार्टफोन्‍समध्‍ये दर्जात्‍मक डिझाइन,डिस्‍प्‍ले, कॅमेरा अनुभव यांची भर करेल आणि परवडणा-या दरामध्‍ये ग्राहकांना सर्वोत्तम स्‍मार्टफोन अनुभव देईल.

टेक्‍नो स्‍पार्क ५ परवडणा-या दरामध्‍ये प्रि‍मिअम वैशिष्‍ट्यांनी युक्‍त डिवाईसेसचा शोध घेत असलेल्‍या महत्त्वाकांक्षी ‘ग्रेटर भारत’च्‍या ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. नवीन स्‍मार्टफोन विभागातील अग्रणी वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे, जसे क्‍वॉड्रपल रिअर-कॅमेरा सेट-अप, ज्‍यामध्‍ये एफ१.८ अर्पेचर असलेला १३ मेगापिक्‍सल मुख्‍य रिअर कॅमेरा, पोर्ट्रेट्ससाठी साजेसा असा २ मेगापिक्‍सल कॅमेरा आहे. २ मेगापिक्‍सल, मायक्रो लेन्‍स ४ सेमी अंतरापर्यंत देखील सूक्ष्‍मातिसूक्ष्‍म गोष्‍टी सुस्‍पष्‍टपणे कॅप्‍चर करतात. स्‍पार्क ५मध्‍ये ८के विभागांतर्गत पहिल्‍यांदाच उपलब्‍ध असलेले प्रि‍मिअम वैशिष्‍ट्य ६.६ इंची डॉट-इन डिस्‍प्‍ले आहे. तसेच या विभागातील ग्राहकांसाठी २०:९ अस्‍पेक्‍ट रेशिओ व्‍युईंग अनुभवाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. ग्राहक या नवीन उत्‍पादनावर टेक्‍नोची एक-वेळ स्क्रिन रिप्‍लेसमेंट ऑफर आणि १-महिना अधिक वॉरंटी (१२+१ महिना) यांचा देखील लाभ घेऊ शकतील.

या सादरीकरणाबाबत बोलताना ट्रान्झिशन इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. अरिजीत तालपत्राम्‍हणाले, ”आपल्‍या जीवनामध्‍ये सोशल डिस्‍टन्सिंग महत्त्वाचा भाग बनला असताना ‘ग्रेटर भारत’च्‍या लोकांना त्‍यांच्‍या जीवनातील महत्त्वाची कामे आणि रोजच्‍या कृती सुलभतेने करता येईल अशा स्‍मार्टफोनसह सक्षम करण्‍याची गरज आहे. आमचा विश्‍वास आहे की,सद्यस्थितीमध्‍ये देखील आमचा दृष्टिकोन अधिक महत्त्वपूर्ण बनला आहे. या काळामध्‍ये देखील आमच्‍या उत्‍पादनांबाबत चर्चा निर्माण करण्‍यासाठी सानुकूल नाविन्‍यता अधिक महत्त्वाची आहे. टेक्‍नो स्‍पार्क ५ स्‍मार्टफोन टेक्‍नोची नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने निर्माण करण्‍याप्रतीच्‍या क्षमतेला दाखवतो. ज्‍यामुळे आमचे स्‍मार्टफोन ग्राहकांसाठी अधिक उपयोग होण्‍याजोगे असण्‍यासोबत त्‍यांना सर्वोत्तम, संपन्‍न व एकसंधी अनुभव देतात.”

टेक्‍नो स्‍पार्क ५ स्‍मार्टफोन आईस जॅडेइट व स्‍पार्क ऑरेंज या दोन आकर्षक रंगाच्‍या व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. हा नवीन स्‍मार्टफोन २५ मेपासून ३५,००० हून अधिक ऑफलाइन रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल. टेक्‍नो ग्राहकांना https://www.tecno-mobile.in/home-delivery येथे त्‍यांच्‍या पसंतीच्‍या रिटेलर्सकडे ऑर्डर देत नवीन ‘डोअरस्‍टेप डिलिव्‍हरी’चा लाभ घेण्‍याचे आवाहन करते. स्‍टोअर लोकेटर सुविधा असलेली ही मायक्रोसाइट रिटेलर व त्‍यांची संपर्क माहिती माहित करण्‍यामध्‍ये साह्य करेल आणि कोविड-१९ संकटामुळे सरकारने विभागांसाठी निर्धारित केलेले नियम व मार्गदर्शकतत्त्व सूचनांचे पालन करत २४ तासांमध्‍ये ग्राहकांना त्‍यांच्‍या जवळच्‍या रिटेलरद्वारे घरपोच डिवाईसची डिलिव्‍हरी दिली जाईल.

स्‍पार्क ५ ची प्रमुख वैशिष्‍ट्ये 

  • विभागातील उच्‍च दर्जाच्‍या सर्वोत्तम प्रो फोटोग्राफीचा अनुभव घ्‍या

स्‍पार्क ५ च्‍या रिअर कॅमेरा सेट-अपमध्‍ये १३ मेगापिक्‍सल + २ मेगापिक्‍सल + २ मेगापिक्‍सल + एआय लेन्‍ससह क्‍वॉड फ्लॅश आणि एफ१.८ अर्पेचर आहे. ज्‍यामुळे अंधुक प्रकाशात देखील प्रखर व सुस्‍पष्‍ट फोटो येण्‍याची खात्री मिळते. सखोल लर्निंग अल्‍गोरिदमवर आधारित एआय ऑटो सीन डिटेक्‍शनसह (एएसडी) कॅमेरा आपोआपपणे विविध वस्‍तू आणि सर्व प्रकारच्‍या प्रकाशीय स्थितींना ओळखत आपोआपपणे ब्राइटनेस व कॉन्‍ट्रास्‍ट रेशिओचे समायोजन करतो. ज्‍यामुळे कोणत्‍याही प्रकाशीय स्थितीमध्‍ये सर्वोत्तम व सुस्‍पष्‍ट फोटो कॅप्‍चर करता येतात. तसेच ग्राहक एआर मोडचा आनंद घेऊ शकतात. एआर मोड युजर्सना मित्र आणि कुटुंबासोबत मजेशीर व उत्‍साहपूर्ण क्षणांची निर्मिती करण्‍यामध्‍ये मदत करते. स्‍थानिकीकृत स्टिकर फोटोग्राफीमध्‍ये मजेशीर पैलूंची भर करतात. बोकेह मोड, मॅक्रो मोड, एचडीआर, एआय ब्‍युटी, पॅनोरमा यासारखी इतर वैशिष्‍ट्ये फोटोग्राफीचा अनुभव द्विगुणित करतात.

  • अविश्‍वसनीय डिझाइन व स्‍मार्ट सेल्‍फी कॅमेरा 

नवीन स्‍मार्टफोनमध्‍ये ८ मेगापिक्‍सल डॉट-इन सेल्‍फी कॅमेरा आहे. ६.६ इंची एचडी+ स्क्रिनवर फ्रण्‍ट कॅमेरा व लाइट सेन्‍सर आहे. या स्क्रिनवर ९०.२ टक्‍के स्क्रिन-टू-बॉडी रेशिओ, सुपर वाइड व्‍ह्यू आणि अधिक कार्यक्षम डिस्‍प्‍ले माहितीचा समावेश आहे. हे वैशिष्‍ट्य सध्‍या उच्‍च किंमत असलेल्‍या स्‍मार्टफोन्‍समध्‍येच उपलब्‍ध आहे. एफ२.० फ्रण्‍ट कॅमे-यामध्‍ये सॉफ्ट ड्युअल एलईडी फ्लॅश आहे, जे अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट सेल्‍फीज काढण्‍यामध्‍ये आणि सुस्‍पष्‍ट व्हिडिओ कॉल्‍स करण्‍यामध्‍ये मदत करते.

  • अधिक सुरक्षितता

आजच्‍या घडीला सुरक्षितता आपल्‍या जीवनात प्रमुख भाग बनली आहे. स्‍मार्टफोनमध्‍ये स्थिर व प्रबळ सुरक्षितता असणे आवश्‍यक आहे. स्‍पार्क ५ मध्‍ये स्‍मार्ट फिंगरप्रिंट सेन्‍सर व फेस अनलॉक २.० आहे. फिंगरप्रिंट सेन्‍सर कॉल्‍स घेणे व रेकॉर्ड करणे, फोटो काढणे व अलार्म्‍स बंद करणे अशी इतर कार्ये देखील करू शकतो. फेस अनलॉक २.० स्‍मार्टफोनवरील सुरक्षितता अधिक प्रबळ करते. हे वैशिष्‍ट्य तुमचे लक्ष नसताना दुस-यांकडून फोन अनलॉक करण्‍याला प्रतिबंध करते.

  • दीर्घकाळापर्यंत टिकणारी मोठ्या क्षमतेची बॅटरी

टेक्‍नो स्‍पार्क ५ मध्‍ये उच्‍च घनता असलेली ५००० एमएएच इतक्‍या उच्‍च क्षमतेची बॅटरी आहे. यामध्‍ये एआय पॉवर सेव्हिंग व सेफ चार्ज वैशिष्‍ट्य आहे. ज्‍यामुळे दिवसभरात अनेकदा डिवाईस चार्जिंग करण्‍याचा त्रास दूर होतो. बॅटरी पूर्णपणे चार्ज असताना तुम्‍ही १६ तासांपर्यंत व्हिडिओ पाहू शकता, यामध्‍ये ५२७ तासांची स्‍टॅण्‍डबाय वेळ आहे. तसेच तुम्‍ही १२० मिनिटांपर्यंत संगीत ऐकण्‍याचा आनंद घेऊ शकता आणि ३५ तासांपर्यंत कॉल वेळेचा लाभ घेऊ शकता.

  • अधिक स्‍टोरेज क्षमता

स्‍पार्क ५ मध्‍ये ३२ जीबी इंटर्नल स्‍टोरेज क्षमता आहे. ही स्‍टोरेज क्षमता २५६ जीबीपर्यंत वाढवता येते. ज्‍यामुळे तुम्‍ही स्‍मार्टफोनमध्‍ये सुलभपणे व विनाव्‍यत्‍यय अनेक सर्वोत्तम क्षणांना साठवून ठेवू शकता. या स्‍टोरेज क्षमतेला शक्तिशाली क्‍वॉड-कोअर २.० गिगाहर्टझ सीपीयू हेलिओ ए२२ प्रोसेसरचे पाठबळ आहे. ENDS

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "‘बिग बी’चे पुनरागमन: ‘सेगमेंट-फर्स्‍ट’ ६.६ इंची डॉट-इन डिस्‍प्‍ले व १३ मेगापिक्‍सल एआय क्‍वॉड कॅमेरा असलेला ‘टेक्‍नो स्‍पार्क ५’ सादर; किंमत फक्‍त ७९९९ रूपये"

Leave a comment

Your email address will not be published.


*