ओयोकडून लॉकडाऊननंतरच्‍या तयारीची खात्री घेण्‍याकरिता उपाय सादर; किमान स्‍पर्श होणारे ‘सॅनिटाईज्‍ड स्‍टे’ सादर

Rohit Kapoor, CEO, India & South Asia for OYO Hotels & Homes. -Photo By GPN

Rohit Kapoor, CEO, India & South Asia for OYO Hotels & Homes. -Photo By GPN

  • हॉटेल्‍स बुकिंग व्‍यासपीठांमध्‍ये सॅनिटायझेशन, स्‍वच्‍छ व संरक्षणात्‍मक उपकरणासंदर्भात तपासणी करण्‍यात आलेल्‍या प्रॉपर्टीज दाखवण्‍यासाठी ‘सॅनिटाईज्‍ड स्‍टे’ टॅगची भर करण्‍यात येईल
  • पहिल्या टप्‍प्‍यामध्‍ये ओयोची पुढील १० दिवसांमध्‍ये १००० हॉटेल्‍समध्‍ये या उपायांची अंमलबजावणी करण्‍याची योजना आणि लॉकडाऊनसंदर्भात शिथिलता आणताच देशातील सर्व १८,००० हॉटेल्‍समध्‍ये उपायांची अंमलबजावणी करण्‍याचा मनसुबा
  • चेक-इन व चेक-आऊट, हाऊसकिपिंग व रूम सर्विससाठी मिनि‍मल-टच स्‍टॅण्‍डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी)

नवी दिल्‍ली, १९ मे २०२०: कोविड-१९ महामारीने ग्राहकांच्‍या वर्तणूकीमध्‍ये विशेषत: प्रवास व आदरातिथ्‍यासंदर्भात वर्तणूकीमध्‍ये मोठा बदल घडवून आणला आहे. उच्‍च आरोग्‍यदायी दर्जा, किमान संपर्क होण्‍याची खात्री देणारी सेवा आणि सुधारित विश्‍वसनीयता या ग्राहकांच्‍या लॉकडाऊननंतर प्रवास नियोजनासाठी उच्‍च मागण्‍या आहेत. ओयो ही जगातील आघाडीची हॉटेल शृंखला परिणाम कमी करण्‍यासाठी, तसेच उत्तम दर्जाचा प्रवास व आदरातिथ्‍य अनुभवाची पूर्तता करण्‍याकरिता आणि सध्‍याच्‍या ‘न्‍यू नॉर्मल’ स्थितींमध्‍ये कार्यसंचालन सुरू ठेवण्‍याकरिता नाविन्‍यता आणण्‍यासाठी विविध उपाय व उपक्रम हाती घेत आहे.
यामध्‍ये लॉकडाऊननंतरच्‍या आदरातिथ्‍य विभागामधील आव्‍हाने व कार्यसंचालन ओळखण्‍यासाठी ग्राहक, मालमत्ता भागीदार व कर्मचारी-केंद्रीत उपक्रमांचा समावेश आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये ओयो पुढील १० दिवसांमध्‍ये १००० हॉटेल्‍समध्‍ये या उपायांची अंमलबजावणी करण्‍याची योजना आखते. तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्‍यानंतर देशातील सर्व १८,००० हॉटेल्‍समध्‍ये उपायांची अंमलबजावणी करण्‍याचा मनसुबा आहे.

ग्राहक व हॉटेलमधील कर्मचा-यांच्‍या सुरक्षिततेसाठी विविध प्राधान्‍यस्‍तरीय कार्यवाही करण्‍यात येतील. ओयोला लॉकडाऊननंतरच्‍या विश्‍वामध्‍ये ग्राहकांच्‍या गरजा मोठ्या प्रमाणात बदलतील, याबाबत देखील माहित आहे. म्‍हणून सद्यस्थितीमध्‍ये कार्यसंचालन सुरळीत ठेवण्‍यासाठी ओयोने ग्राहकांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी व त्‍याचे व्‍यवस्‍थापन पाहण्‍यासाठी उपाय योजले आहेत.

● किमान स्‍पर्शासह सॅनिटाईज स्‍टे
○ चेक-इन आणि चेक-आऊट: सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन होत असल्‍याच्‍या खात्रीसाठी ओयो किमान संपर्क येण्‍याच्‍या खात्रीसह अतिथी चेक-इन व चेक-आऊट प्रक्रियेमध्‍ये सुधारणा आणत आहे. हॉटेल शृंखला हॉटेलमधील त्‍यांची औपचारिकता पूर्ण करण्‍याकरिता अतिथींना त्‍यांचे आयडी, क्‍यूआर कोड अपलोड करत आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.
○ किमान संपर्क सेवा: ग्राहकांशी संपर्क येणा-या सर्व टचपॉइण्‍ट्समध्‍ये सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन होत असल्‍याच्‍या खात्रीसाठी ओयो किमान संपर्क होणारी रूम सर्विस देईल आणि याबाबत हाऊसकिपिंग कर्मचा-यांना प्रशिक्षण देईल.
○ सॅनिटाईज स्‍टेज टॅग: व्‍यासपीठावर नोंदणीकृत सर्व ओयो प्रॉपर्टीज बुकिंग पानावर सॅनिटायझेशनची पातळी दाखवतील. हॉटेल्‍सची सॅनिटायझेशन, स्‍वच्‍छता व संरक्षणात्‍मक उपकरणासाठी नियमितपणे बॅकग्राऊण्‍ड ऑडिट तपासण्‍या करण्‍यात येतील. यापैकी बॅकग्राऊण्‍ड तपासणीनंतर मंजूरी देण्‍यात आलेल्‍या प्रॉपर्टीजना बुकिंग पानावरील ‘सॅनिटाईज स्‍टेज’ टॅगवर दाखवण्‍यात येतील. तसेच ‘सॅनिटाईज स्‍टेज’ टॅगच्‍या सातत्‍यतेच्‍या खात्रीसाठी अभिप्राय, अवलोकन व शिफारसींना विचारात घेत प्रॉपर्टीजमध्‍ये नियमितपणे अतिथी ऑडिट करण्‍यात येईल.
● ऑन-ग्राऊण्‍ड टीम्‍सचे प्रशिक्षण: नवीन प्रशिक्षण मॉड्यूलमध्‍ये खालील कार्यांमधील सुधारित कार्यसंचालन प्रक्रियांवरील एसओपींचा समावेश असेल:
○ अतिथी, तसेच कर्मचा-यांची आरोग्‍य तपासणी.
○ वारंवार जागेच्‍या योग्‍य सॅनिटायझेशनसोबत रिसीप्‍शनजवळ हँड सॅनिटायझर्सची सुविधा आणि प्रत्‍येकवेळी सेफ्टी गिअर परिधान करण्‍याची वाढती गरज.
○ इन-रूम डायनिंगला प्रोत्‍साहन
○ सोशल डिस्‍टन्सिंगचे योग्‍यरित्‍या पालन होत असल्‍याच्‍या खात्रीसाठी लोकांना योग्‍य शारीरिक अंतर ठेवण्‍यामध्‍ये मार्गदर्शन करण्‍यासाठी मजल्‍यांवर डिस्‍टन्‍स मार्कर चिन्‍हे पेंट करण्‍यात आली आहेत.
ई अतिथींना शक्‍यतो त्‍यांचे सामान स्‍वत:हून घेऊन जाण्‍यास विनंती करण्‍यात येईल (अतिथी ज्‍येष्‍ठ नागरिक असल्‍यास किंवा अपंग असल्‍यास साह्य करण्‍यात येईल)
○ आरोग्‍यविषयक सल्‍ले व सरकारी सूचनांचे पालन करत बाहेरील पुरवठदार व कंत्राटदारांसोबत व्‍यवहार करण्‍यासाठी धोरणे.
○ प्रॉपर्टीच्‍या हाऊसकिपिंग कार्यपद्धतींवर देखरेख ठेवण्‍यासाठी प्रॉपर्टी व्‍यवस्‍थापन.
● कोविड-१९ जागरूकता:
○ कोविड-१९ संबंधित हेल्‍पलाइन क्रमांक आणि जागरूकता माहिती रिसेप्‍शन व सर्व प्रमुख ठिकाणी दाखवण्‍यात येतील. तसेच आपत्‍कालीन संपर्क क्रमांक आणि जवळच्‍या हॉस्पिटल्‍सची सविस्‍तर माहिती देखील दाखवण्‍यात येईल.
○ ओयो अॅप, ईमेल कन्‍फर्मेशन, व्‍हॉट्सअॅप मेसेज / एसएमएस कन्‍फर्मेशनच्‍या माध्‍यमातून काय करावे आणि काय करू नये यासंदर्भात ग्राहकांना प्रत्‍येक टप्‍प्‍यावर नियमितपणे माहिती देत राहिल.
○ ओयो मालमत्ता भागीदारांना देखील जागरूक करत आहे आणि कोविड-१९साठी खबरदारीच्‍या उपायांसंदर्भात सविस्‍तर लिखित/ व्हिज्‍युअल सूचना व ईमेल्‍सच्‍या माध्‍यमातून लॉकडाऊननंतरच्‍या उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण करत आहे.

लॉकडाऊननंतरच्‍या विश्‍वामधील ओयोच्‍या तयारीबाबत बोलताना आयोचे भारत व दक्षिण आशियातील मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर म्‍हणाले, ”ग्राहकांची आदरातिथ्‍य क्षेत्राबाबत वर्तणूक बदलताना दिसत आहे. आरोग्‍यदायी, सुरक्षित दर्जाच्‍या व किमा स्‍पर्श होणा-या एसओपींना लवकरच प्राधान्‍य दिले जाणार आहे. एक जबाबदार आदरातिथ्‍य शृंखला म्‍हणून ओयोमध्‍ये आम्‍ही लॉकडाऊननंतर अतिथींचे स्‍वागत करण्‍याप्रती आणि आमच्‍या सर्व भागधारकांसह आमचे अतिथी, भागीदार व ओयोप्रीन्‍युअर्ससाठी आरोग्‍य, स्‍वच्‍छता व स्‍वास्‍थ्‍याला अधिक प्राधान्‍य देण्‍याप्रती अथक मेहनत घेत आहोत. सद्यस्थिती पाहता कंपनीच्‍या कानाकोप-यामधील आमच्‍या टीम्‍स आमच्‍या सर्व अतिथींचे स्‍वागत करण्‍यासाठी सुर‍क्षितता व स्‍वच्‍छतेच्‍या खात्रीकरिता नवीन मार्गांचा शोध घेत आहेत. आम्‍ही आमच्‍या अतिथींचे स्‍वागत करण्‍यासाठी प्रॉपर्टीजमध्‍ये सॅनिटाईज स्‍टेला चालना देण्‍यासाठी आमच्‍यासह सामील झालेल्‍या आमच्‍या मालमत्ता मालकांचे विशेष आभार मानतो.”
ओयो हॉटेल्‍स अॅण्‍ड होम्‍समधील जागतिक कार्यसंचालन व ग्राहक अनुभवाचे उपाध्‍यक्ष श्रीरंग गोडबोले म्‍हणाले, ”आम्‍ही सेवांसाठी किमान-टच एसओपींची अंमलबजावणी करण्‍याच्‍या प्रक्रियेत आहोत. तसेच आम्‍ही सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक काळादरम्‍यान सुस्‍पष्‍ट व पारदर्शक संवादाच्‍या माध्‍यमातून जागरूकता निर्माण करण्‍यावर मुख्‍यत्‍वे भर देत आहोत. आम्‍ही प्रशिक्षण उपक्रम राबवण्‍यासाठी मालमत्ता भागीदारांच्‍या आमच्‍या मोठ्या नेटवर्कपर्यंत पोहोचत त्‍यांची तयारी वाढवण्‍यामध्‍ये त्‍यांना साह्य करण्‍याकरिता आमच्‍या तंत्रज्ञान टूलकिटचा लाभ घेत आहोत. तसेच आम्‍ही पुढील काही दिवसांमध्‍ये सॅनिटायझेशन, स्‍वच्‍छता व संरक्षणात्‍मक उपकरणासाठी बॅकग्राऊण्‍ड ऑडिट तपासण्‍यांमधून मंजूरी देण्‍यात आलेल्‍या प्रॉपर्टीजसाठी ‘सॅनिटाईज स्‍टे’ दाखवण्‍याप्रती सज्‍ज आहोत. आम्‍ही ग्राहकांचा अभिप्राय मिळवण्‍यासाठी सहयोगात्‍मक क्षमता निर्माण करण्‍याच्‍या प्रक्रियेत देखील आहोत. अशा सक्रिय संरक्षणात्‍मक उपायांसह आम्‍हाला प्रत्‍येक अतिथीसाठी त्‍यांनी पुन्‍हा प्रवास सुरू केल्‍यानंतर सुरक्षित व विश्‍वसनीय निवास सेवा देण्‍याचा, तसेच त्रासमुक्‍त व आनंददायी वातावरणाचा अनुभव देण्‍याचा विश्‍वास आहे.”

गुरगावमधील गॅलेरिया मार्केट डीएलएफ फेज ४ मधील २२२३४, रिजव्‍ह्यू रेसिडन्‍सीचे मालक अमन वेनाईक म्‍हणाले, ”अशा कठीण काळामध्‍ये ओयो टीमने ग्राहकांना आकर्षून घेण्‍यासाठी आणि सर्व सुरक्षितता व स्‍वच्‍छताविषयक उपायांचे पालन केले जात असल्‍याच्‍या खात्रीसाठी सर्वोत्तम सोल्‍यूशन्‍स सादर केले आहेत. नुकतेच सादर करण्‍यात आलेले सॅनिटाईज स्‍टे टॅगची माझ्या प्रॉपर्टीमध्‍ये अंमलबजावणी करण्‍यात आली आहे. मालक म्‍हणून मी विषाणूच्‍या प्रादुर्भावावर प्रतिबंध ठेवण्‍यासाठी सर्व आवश्‍यक मूलभूत सुरक्षितता व स्‍वच्‍छताविषयक नियमांचे पालन होत असल्‍याची खात्री घेईन. आम्‍ही अतिथी व हॉटेलमधील कर्मचा-यांना हँड ग्‍लोव्‍ह्ज, मास्‍क्‍स आणि तापमानाच्‍या तपासणीसाठी थर्मल गन्‍सची सुविधा दिली आहे. रिसीप्‍शन क्षेत्राजवळ सोशल डिस्‍टन्सिंगसंदर्भात खुणा करण्‍यात आल्‍या आहेत. ओयोने आमच्‍या कर्मचारी सदस्‍यांना किमान संपर्क होण्‍याच्‍या खात्रीसाठी सुरक्षिततेसंदर्भात प्रशिक्षण दिले आहे. कोविड-१९चा निश्चितच आदरातिथ्‍य क्षेत्रावर दीर्घकालीन प्रभाव राहणार आहे. यावर मात करण्‍याचा सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे सर्व स्‍वच्‍छताविषयक नियमांचे पालन करणे. म्‍हणूनच आम्‍ही आता दरवाज्‍यांच्‍या कड्या, रेलिंग्‍स आणि मजले मान्‍यताकृत निर्जंतुके व सोल्‍यूशन्‍सचा वापर करत दर काही तासांनी स्‍वच्‍छ करत आहोत. ओयो आणि आम्‍ही सहयोगाने खात्री घेत आहोत की, आम्‍ही या संकटावर अधिक प्रबळपणे व अधिक स्थिरपणे मात करू.”

ओयोने या संकटादरम्‍यान जलद रिझॉल्‍युशन व अंमलबजावणीची गरज असलेल्‍या केसेससंदर्भात देखरेख व त्‍वरित कार्यवाही करण्‍यासाठी कोविड-१९ वॉर रूम स्‍थापित केली आहे. ओयोच्‍या व्‍यासपीठाने जगभरातील अतिथी, हॉटेल भागीदार आणि कर्मचा-यांना सर्व कोविड-१९ संबंधित समस्‍या व चौकशीसंदर्भात साह्य करण्‍यासाठी कोरोना कॉन्‍सीर्जची सुविधा देखील दिली आहे.

रितेश अग्रवाल यांनी हॉटेलला दिलेल्‍या भेटीच्‍या व्हिडिओसाठी लिंक Ritesh Agarwal’s hotel visit आणि या व्हिडिओमध्‍ये देशभरातील ओयो हॉटेल्‍सनी अंमलबजावणी केलेल्‍या नवीन उपायांना दाखवण्‍यात आले आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "ओयोकडून लॉकडाऊननंतरच्‍या तयारीची खात्री घेण्‍याकरिता उपाय सादर; किमान स्‍पर्श होणारे ‘सॅनिटाईज्‍ड स्‍टे’ सादर"

Leave a comment

Your email address will not be published.


*