टिंडर सदस्‍य लॉकडाऊनदरम्‍यान देखील टिंडर पासपोर्टसह कशाप्रकारे एकमेकांशी कनेक्‍ट होत आहेत: दिल्‍ली-मुंबई ही पहिल्‍या क्रमांकाची पासपोर्टिंग जोडी

टिंडरने सर्व सदस्‍यांसाठी सुरू केले देय भरुन वापरता येणारे वैशिष्‍ट्य पासपोर्ट‘; बहुतांश सदस्‍य भारतीय शहरांमध्‍ये पासपोर्टसाठी वैशिष्‍ट्याचा वापर करत आहेत

पार्श्‍वभूमी, नवी दिल्‍ली, एप्रिल २०२०टिंडर पासपोर्ट हे विशेषत: टिंडर प्‍लस अ‍ॅॅॅॅण्‍ड गोल्‍ड सबस्‍क्रायबर्ससाठी देय भरलले वैशिष्‍ट्य आहे. सदस्‍य शहरानुसार शोधू घेऊ शकतात किंवा मॅपवर पिन ड्रॉप करू शकतात आणि तुम्‍ही तुमच्‍या आवडीच्‍या गंतव्‍यांमधील टिंडर सदस्‍यांसोबत लाइकिंग,मॅचिंग व चॅटिंग सुरू करू शकता. सदस्‍य त्‍यांचे सध्‍याचे लोकेशन व नवीन गंतव्‍यादरम्‍यान नेव्हिगेट करू शकतात. हे वैशिष्‍ट्य सर्व टिंडर सदस्‍यांसाठी मोफत उपलब्‍ध करून देण्‍यात आले.)

सोशल डिस्‍टन्सिंग नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्‍यामुळे लोक एकमेकांना भेटत नाही आहेत. यामुळेच टिंडरने एप्रिल महिन्‍यामध्‍ये मोफतपणे त्‍यांचे पासपोर्ट वैशिष्‍ट्य उपलब्‍ध करून दिले. टिंडर या आव्‍हानात्‍मक काळादरम्‍यान नवीन कनेक्‍शन्‍स निर्माण करण्‍यासह सोशल संवाद सुरू राहण्‍याची सुविधा देण्‍यास तत्‍पर आहे.  सदस्‍यांना तात्‍पुरत्‍या कालावधीसाठी त्‍यांच्‍या लोकेशनमध्‍ये बदल करण्‍याची सुविधा देत टिंडर पासपोर्ट जगभरातील सोबती कितीही दूर असो त्‍यांच्‍यासोबत संलग्‍न होण्‍याची सुविधा देते. कारण घरात असलेल्‍या लोकांसाठी सोशल डिस्‍टन्सिंग पाळणे म्‍हणजे तुम्‍ही लोकांशी व्‍हर्च्‍युअली संलग्‍न होऊ शकत नाही असा अर्थ होत नाही. नुकत्‍याच मिळालेल्‍या माहितीनुसार टिंडर सदस्‍य अधिकाधिक लोकांशी व्‍हर्च्‍युअली संवाद साधत आहेत.

मार्च ते एप्रिल महिन्‍यापर्यंतचा डेटा पाहता आम्‍हाला कोणती शहरे व देशांमधील सदस्‍य व्‍हर्च्‍युअली प्रवास करत आहेत आणि कोणत्‍या शहरांमधील सदस्‍य एकमेकांसोबत वारंवार संवाद साधत आहेत, हे समजले. बहुतांश टिंडर सदस्‍य देशांतर्गत लोकेशन बदलण्‍यासाठी वैशिष्‍ट्याचा उपयोग करत आहे. दिल्‍ली-मुंबई व मुंबई-दिल्‍ली हे एकमेकांशी पासपोर्टिंग करणारी २ अव्‍वल शहरे ठरली आहेत. टिंडरची सदस्‍य मानसशास्‍त्रज्ञ सोनाली गुप्‍ताच्‍या मते भारतातील सदस्‍यांदरम्‍यान बहुतांश लोकेशन बदलण्‍यात आले आहेत. प्रमुख कारण हे असेल की, संपूर्ण जगामध्‍ये महामारीने थैमान घातले असल्‍यामुळे सर्व देश या संकटाचा कशाप्रकारे सामना करत असतील यामध्‍ये कदाचित फरक नसावा. लोक भारतीय शहरांमधील इतर लोकांपर्यंत पोहोचण्‍यामागील कारण म्‍हणजे त्‍यांना वाटते की त्‍यांचे संदर्भ व वैयक्तिक वास्‍तविकता इतर भारतीयच समजू शकतात. यामधून वास्‍तववादी अपेक्षांचे एक प्रतिबिंब समोर येते – लोकांना माहित आहे की आंतरराष्‍ट्रीय प्रवास होण्‍याची शक्‍यता दुर्मिळच आहे आणि त्‍यांना देशामध्‍येच असलेल्‍या कोणा व्‍यक्‍तीला भेटण्‍याची उत्तम संधी आहे.” 

आम्‍ही लॉकडाऊनदरम्‍यान मुंबईकर काय करत आहेत हे व्‍हर्च्‍युअली तपासले.

भारतीय टिंडर सदस्‍य मुख्‍यत्‍वे पासपोर्टिंग करत असलेली अव्‍वल शहरे व देशांबाबतचे संपूर्ण तथ्‍य पत्रक खाली दिले आहे:

टॉप १५ पासपो‍र्टिंग पेअरिंग्‍ज म्‍हणजे शहरे एकमेकांना पासपोर्टिंग करत आहेत.

भारतातील टॉप ५ गंतव्‍ये म्‍हणजे भारतातील अव्‍वल ५ शहरांमधील सदस्‍य पासपोर्टिंग करत आहेत.

टॉप ५ जागतिक गंतव्‍ये म्‍हणजे अव्‍वल ५ देशांमधील सदस्‍य भारतामध्‍ये पासपोर्टिंग करत आहेत.

संपूर्ण तथ्‍य पत्रक पुढील पानावर

सदस्‍यांच्‍या कथा पान ३ वर image006image007

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "टिंडर सदस्‍य लॉकडाऊनदरम्‍यान देखील टिंडर पासपोर्टसह कशाप्रकारे एकमेकांशी कनेक्‍ट होत आहेत: दिल्‍ली-मुंबई ही पहिल्‍या क्रमांकाची पासपोर्टिंग जोडी"

Leave a comment

Your email address will not be published.


*