जागतिक काळजी आणि स्वच्छतेबाबत हयात वचनबद्ध

कोविड-१९ महामारीचा काळ आणि त्यानंतरही सहकारी व पाहुण्यांच्या सुरक्षितता आणि कल्याणावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या हयातच्या वचनबद्धतेमध्ये ग्लोबल बायो रिस्क अ‍ॅॅॅॅडव्हायजरी काउन्सिल अक्रिडेश, हॉटेल पातळीवरील स्वच्छतेच्या तज्ज्ञांचा सहभाग, विश्वासार्ह वैद्यकीय आणि औद्योगिक सल्लागारांची कृती समिती यांचा समावेश आहे

शिकागो (एप्रिल 30२०२०)  गेल्या ६० वर्षांपासून जागतिक दर्जाच्या हॉस्पिटॅलिटी सेवा पुरवण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करणाऱ्या हयातने आज सहकारी आणि पाहुण्यांच्या सुरक्षितता व मन:शांती सेवेशी संबंधित स्रोत आणि क्रियाशील मार्गदर्शनात दर्जेदार वाढ करण्यासाठी ग्लोबल केअर अँड क्लिनलीनेसबद्दलची आपली वचनबद्धता जाहीर केली. या अनेक स्तरांच्या वचनबद्धतेमुळे हयातच्या सध्याच्या कठोर नियमांचे कसोशीने पालन होणारच आहे पण त्याचबरोबर ग्लोबल बायो रिस्क अ‍ॅॅॅॅडव्हायजरी काउन्सिलने (जीबीएसी) तयार केलेली अक्रिडिटेशन प्रक्रियाही जगभरातील सर्व हॉटेलांत, सहकाऱ्यांच्या प्रशिक्षण केंद्र व सहाय्यक स्रोतांमध्ये लागू केली जाणार आहे. त्याचबरोबर वैद्यकी तज्ज्ञांबरोबरच उद्योग जगतातील प्रोफेशनल्सही हॉटेलमधील सेवांच्या अनुभवांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

”आपल्याला माहीत असलेले जग कोविड-१९ मुळे पूर्णपणे बदलले आहे आणि आपण सगळेच जण जेव्हा पुन्हा प्रवास करायला सज्ज असू तेव्हा आमचे सहकारी आणि पाहुणे यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हयातने आपली वचनबद्धता पाळली आहे आणि आम्ही त्यांच्या आरोग्यदायी अनुभवाला प्रथम प्राधान्य देत आहोत, असा विश्वास प्रत्येक सहकारी आणि पाहुण्याच्या मनात असावा असा आमचा मानस आहे,” असे मत हयातचे सीईओ आणि अध्यक्ष मार्क होप्लामाझियन म्हणाले. ते पुढे म्हणाले, ”ते साध्य करण्यासाठी सर्वांत अद्ययावत संशोधन व तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या प्रत्येक सेवेचा म्हणजे खोल्या, लॉबींपासून ते स्पा, डायनिंगपर्यंत प्रत्येक घटकाची आम्ही काटेकोरपणे तपासणी करायला हवी. लोकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांना आता आणि भविष्यातही सर्वोत्तम अनुभव मिळावा म्हणून हयात ग्लोबल केअर अँड क्लिनलीनेससाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्याचा समावेश आम्ही आमच्या उद्देशांतच केला आहे.”

जागतिक क्लिनलीनेस अक्रिडेशन

जगभरातील सर्व हॉटेलांमध्ये सहकारी आणि पाहुण्यांना सर्वोच्च दर्जाची स्वच्छता तसेच स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी हयात कायमच वचनबद्ध आहे. मे २०२० मध्ये हयातने जीबीएसी स्‍टारTM अक्रिडेशन करण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि संसर्गजन्य आजारांपासून प्रतिबंध या घटकांच्या क्रियान्वयनावर आधारित मूल्यमापन केले जाणार आहे,जेणेकरून हॉटेलमधील वातावरण निर्जंतुक, सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण असेल. जीबीएसी हा जगभरातील औद्योगिक क्लिनिंग संघटना आयएसएसएचा एक विभाग आहे. यामध्ये सूक्ष्मजीव-रोगकारक धोक्याचे विश्लेषण करणे व त्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वैज्ञानिकांचा समावेश असतो. सूक्ष्मजीवांपासून असलेला धोका आणि कोविड-१९ महामारीसारख्या वास्तवातील संकटांचा सामना करण्यासाठी विशेषत्वाने हे वैज्ञानिकांचे गट तयार केलेले असतात. जीबीएसी स्‍टारTM अक्रिडेशन करून घेणार असल्याची घोषणा करणारा हयात हा पहिलाच हॉस्पिटॅलिटी ब्रँड आहे. ज्यामध्ये जगभरातील ९०० हून अधिक हयात हॉटेलांमध्ये इत्यंभूत प्रशिक्षण देण्याचाही समावेश आहे. याला पूरक म्हणून नियमितपणे केले जाणारे अंतर्गत आणि थर्ड-पार्टी ऑडिटिंगही यासोबत करून घेण्याचा हयातचा विचार आहे.

हॉटेल स्तरावरील निर्जतुकीकरण विशेषज्ञ

सहकाऱ्यांचे हित हा हयातच्या व्यवसायातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे आणि पाहुणे व ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे हे मूळ ध्येय आहे. कोविड-१९ महामारीनंतरची काळजी म्हणून सहकारी व पाहुण्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हयात नव्या कार्यपद्धती विकसित करत असून त्यासंबंधी प्रशिक्षण सगळ्यांना बंधनकारक असतील. सहकाऱ्यांचे आरोग्य, हॉटेलमधील स्वच्छता, कामांचा क्रम व ग्राहक सेवा या सगळ्याचे मूल्यमापन करण्यासाठी दररोज सहकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ज्याच्या माध्यमातून हॉटेलमधील प्रमुखांना नव्या संधी उपलब्ध होतील, सहकाऱ्याला वास्तवात असलेली गरज लक्षात घेऊन आवश्यक असलेल्या तडजोडी करता येतील.

याही पुढे जाऊन हयातच्या ग्लोबल केअर अँड क्लिनलीनेस वचनबद्धतेचा भाग म्हणून सप्टेंबर २०२० मध्ये प्रत्येक हयात हॉटेलात व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्या हायजिन मॅनेजरची नेमणूक करण्यात येणार आहे. नव्या कार्यप्रक्रिया आणि नियमांबद्ल मार्गदर्शन करून त्यांचे पालन करून घेण्याची जबाबदारी या व्यक्तीवर असेल. यापैकी काही नियम खाली दिले आहेत:

  • हायजिन व स्वच्छतेची प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सहकाऱ्यांची प्रमाणपत्रे, प्रशिक्षण आणि फेरप्रशिक्षण
  • सर्व पाहुण्यांच्या खोल्या, एकत्रित बसण्याची ठिकाणे आणि हॉटेलमधील सर्वसामान्यांचा स्पर्श होणाऱ्या ठिकाणांचे हॉस्पिटल दर्जाच्या निर्जंतुकांचा वापर करून स्वच्छता करण्याची वारंवारता वाढवणे
  • रेस्टॉरंट्स, रूम सर्व्हिस, ग्रुप मीटिंग्ज व इव्हेंट्समध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नव्या नियमांचे पालन
  • हॉटेलमधील प्रवेशद्वार, सार्वजनिक ठिकाणे, कर्मचाऱ्यांची ठिकाणे या सर्व ठिकाणी लगेच दृष्टिस पडतील असे सॅनिटायझर स्टेशन्स लावणे.
  • प्युरिफिकेशन आणि सॅनिटायझेशन उपकरणे बसवण्यामागे उत्तम दर्जाची हवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे
  • हॉटेलमधील सहकाऱ्यांसाठी प्रोटेक्टिव्ह मास्क आणि इतर उपकरणे उपलब्ध करणे
  • हॉटेलच्या सर्व प्रॉपर्टीजमध्ये असलेल्या सार्वजनिक ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगचे मार्गदर्शन करणे

उद्योगांतील तज्ज्ञ आणि प्रोफेशल्सची समिती

कोविड-१९ संकटाच्या निमित्ताने हयातने ग्लोबल क्रॉस फंक्शनल रिस्पॉन्स समिती तयार केली आहे. यामध्ये संसर्गजन्य रोग आणि आरोग्यासंबंधीच्या तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. कोविड-१९ संबंधी सुरू असलेल्या संशोधनांची माहिती घेऊन हयातच्या हॉटेलच्या स्थानानुसार व गरजेनुसार जे बदल करण गरजेचे आहे अशा बदलांचे मार्गदर्शन करण्याचे काम ही समिती करणार आहे.

आपल्या वचनबद्धतेचा भाग म्हणून हयातच्या वतीने या समितीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योगांतील प्रोफेशनल्सच्या नावांची भर घातली जाणार आहे. नव्या परिस्थितीत हयातसमोरील व्यावसायिक आव्हाने, सर्वसमावेशक प्रयत्न यांबद्दल सल्ला देणे असे या समितीचे मुख्य काम आहे. याबद्दलच्या चर्चा आणि सल्लागार खालीलप्रमाणे:

  • आरोग्य व स्‍वच्‍छताडॉ. डॅनियल लुसी, एम. डी.,एम. पी. एच., संसर्गजन्य आजारांचे प्राध्यापक, जेरोटाउन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर; फेलो, इन्फेक्शियस डिसिज सोसायटी ऑफ अमेरिका
  • सहकारी सुरक्षितताडॉ.चार्ल्स यारब्रॉट,एम. डी.,एम. पी. एच.,प्रिव्हेंटिव्ह/ऑक्युपेशनल मेडिसिन एक्सपर्ट,जॉन्स हॉपकिन डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन आणि जॉन्स हॉपकिन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थशी संलग्न
  • अन्न व बेव्हरेजेस सुरक्षाडॉ. एलियन ब्लॅक,पीएचडी., फूड सायन्स अँड मायक्रोबायॉलॉजी, इकोलॅब
  • प्रवास व यात्रा:

o  ज्युली राथ, उपाध्यक्षा, कस्टमर एक्सपिरियन्स,इनोव्हेशन अँड डिलिव्हरी, अमेरिकन एअरलाइन्स;

o  डेव्हिड पेकिंगपॉ, अध्यक्ष, मारिट्स ग्लोबल इव्हेंट्स

  • स्पेस डिझाइन: टॉम इटो, FAIA, LEED® AP, ग्लोबल हॉस्पिटॅलिटी लीडर, प्रिन्सिपल, जेन्सलर
  • तंत्रज्ञान: अहमद ओरी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर,सोनिफाय
  • वेलबिइंग: ग्लोबल वेलनेस इन्स्टिट्युटमधील वरिष्ठ नेते

”हयातसोबत आम्ही केलेल्या लॉयलिटी कोलॅबरेशनचा भाग म्हणून आमच्या ग्राहकांना सर्वसमावेशक अनुभव कसा मिळेल याकडे आमचे लक्ष असेल, ज्यामध्ये त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत केलेले असेल,” असे अमेरिकन एअरलाईन्सच्या कस्टमर एक्स्परियन्स,इनोव्हेशन आणि डिलिव्हरी विभागाच्या उपाध्यक्षा ज्युली राथ यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, ”हयातशी संबंधित असलेल्या आमच्या घटकांच्याबाबतीत हयातच्या वतीने स्वच्छता व सुरक्षेसंबंधी प्रक्रियांचा वापर केला जाईल आणि त्याबद्दल आमची मते आम्ही त्यांना सांगू शकू हा या कोलॅबरेशनचा मोठा फायदा आहे.”

कोविड-१९ मदतीसंबंधी जादाचे प्रयत्न हयातच्या वतीने सुरू आहेत,ज्यामध्ये दि हयात केअर फंड सुरू करण्यात आला आहे. ज्याच्या माध्यमातून कोविड-१९ मुळे आर्थिक हाल सोसणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जगभरातील सर्व हयातमध्ये हा फंड गोळा केला जात आहे. जगभरातील हयातच्या मालकीची,व्यवस्थापनासाठी घेतलेल्या प्रॉपर्टी, फ्रँचायजी असलेली हॉटेल्स आणि हयातची कॉर्पोरेट ऑफिस या सर्व ठिकाणी नोकरी करणारे सहकारी या फंडातून मदत मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. याबद्दल अधिक माहिती www.hyatt.com/hyattcarefund येथे उपलब्ध आहे.

हयातच्या ग्लोबल केअर अँड क्लिनलीनेस कमिटमेंटसंबंधी अधिक माहितीसाठी कृपया www.hyatt.com/info/global-care-and-cleanliness-commitment येथे भेट द्या.

या प्रसिद्धीपत्रकात हयात हॉटेल्स कॉर्पोरेशन आणि/किंवा एक किंवा त्याहून अधिक हयातशी संलंग्न संस्थांच्याबाबत ‘हयात’ या शब्दाचा वापर करण्यात आला आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "जागतिक काळजी आणि स्वच्छतेबाबत हयात वचनबद्ध"

Leave a comment

Your email address will not be published.


*