देशभरात असलेल्या टाळेबंदीत अनेक ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत ओडिया कामगारांसाठी ओडिशा सरकारच्या वतीने हेल्पलाईन पोर्टलची मदत

अन्य राज्यांनी देखील या पद्धतीचे अनुकरण करण्याबद्दल एम्पॉवर्ड ग्रुप फॉर फूड अँड लॉजिस्टीक्स (EG5), भारत सरकार आग्रही 

भुवनेश्वर, 20 एप्रिल, 2020, (GPN): सध्या देशभर कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचे दुसरे सत्र सुरू आहे. नोवेल कोरोना व्हायरस (कोविड-19)चा प्रादुर्भाव वाढल्याने टाळेबंदी जाहीर करावी लागली. त्यामुळे देशाच्या अनेक भागांत मूळ ओडिशा राज्याचे रहिवासी असलेले लाखो स्थलांतरीत कामगार अडकून पडले आहेत. कोविड-19 संसर्गाची परिस्थिती जाणून ओडिशा सरकारच्या वतीने मापदंड ठरेल असा निर्णय घेण्यात आला. त्यांनी आंतरराज्य समन्वय राखत देशात अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या आपल्या कामगार बांधवांकरिता सुस्थापित धोरणाची आखणी केली. देशाच्या विविध राज्यांमध्ये अनेक कुशल आणि अर्ध-कुशल कामगार रोजगारासाठी स्थलांतर करतात. यामध्ये गुजरात राज्यातील कामगारांची संख्या मोठी आहे.

ओडिशा राज्यातून रोजगारानिमित्त इतर राजांमध्ये गेलेले आणि टाळेबंदीनंतर अडकून पडलेल्या कामगारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ओडिशा शासनाने 30-लाईन हेल्प सेंटरची सुरुवात केली आहे. ओडिशा राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नोडल ऑफिसर म्हणून समावेश करण्यात आला. ते इतर राज्यांच्या सरकारसोबत समन्वय साधून संबंधित राज्यांमध्ये अडकून पडलेल्या ओडिया कामगारांच्या पोटापाण्याची सोय करतात.

याविषयी माहिती देताना ओडिशा सरकारचे मुख्य सचिव, असित त्रिपाठी, आयएएस म्हणाले की, “आमचे ओडिया कामगार देशभरात विखुरले आहेत. सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीत स्थलांतरीत ओडिया कामगारांना विविध प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागतो. त्यांच्या तक्रारी दाखल करून घेण्यासाठी आम्ही हेल्पलाईन आणि वेब पोर्टल सुरू केले. ओडिशा सरकारच्या सेवेत असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आयपीएस अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून या तक्रारींना प्रतिसाद देतात, तसेच विविध राज्यांतील योग्य त्या प्राधिकरणांसमवेत समन्वय साधून योग्य ती कारवाई करतात. स्थलांतरीत कामगारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कार्यकुशल यंत्रणा सुरू करणारे ओडिशा हे पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात अडकून राहिलेल्या लाखो कामगारांना संबंधित राज्य शासनाच्या यंत्रणेमार्फत मदत करणे शक्य झाले.”

गृह मंत्रालय, ओडिशा सरकार, प्रधान सचिव, आयएएस, संजीव चोप्रा म्हणाले की: “सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात स्थलांतरीत कामगारांना जाणवणारा त्रास आमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या स्थलांतरीत कामगार बांधवांकरिता 24×7 हेल्प लाईन आणि पोर्टलची सुविधा 26 मार्चपासून कार्यन्वित करण्यात आली. त्यामुळे संकटात असलेल्या लोकांच्या स्थितीचा रेकॉर्ड ठेवणे, ती ट्रॅक करणे आणि येणाऱ्या प्रत्येक कॉलचे निरक्षण करून संबंधित सरकारपर्यंत ती पोहोचविणे शक्य झाले. एकदा का संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने मदत पोहोचल्याची पुष्टी दिली की, त्यांची केस बंद केली जाते. ही यंत्रणाच अशापद्धतीने तयार करण्यात आली आहे. आमच्या कॉल सेंटरमधील टीमला मानसोपचार तज्ज्ञांनी प्रशिक्षित केले आहे. ज्यामुळे ते तणावात असलेल्या कामगारांचे समुपदेशन करून या कठीण परिस्थितीत साह्य करतात.”

राज्याच्या राजधानीत बसून देशाच्या इतर भागांत अडकलेल्या ओडिया स्थलांतरीत कामगारांच्या तक्रारींचे निवारण करणे नक्कीच आव्हानात्मक ठरते. आमच्या नोडल ऑफिसरचे कार्यकुशल प्रयत्न आणि चिकाटी तसेच पोर्टलवरील रेडीमेड डेटा संबंधित राज्य प्रशासनाकडे पाठवून योग्य ती पावले उचलणे शक्य होते. इतर राज्ये आमच्या नोडल ऑफिसरसमवेत समन्वय राखून वेगवान यंत्रणेद्वारे त्रासात असलेल्या कामगारांना दिलासा मिळवून देतात. विविध राज्यांमध्ये अडकून राहिलेल्या, एकीकडे मनातील असंतोष तर दुसरीकडे कोविड विकाराशी दुहेरी संघर्ष करणाऱ्या स्थलांतरीत कामगारांना या समन्वय राखणाऱ्या यंत्रणेने मोठा दिलासा मिळवून दिला आहे. 

एम्पॉवर्ड ग्रुप फॉर फूड अँड लॉजिस्टीक्स (EG5), भारत सरकारने ओडिशा सरकारच्या या प्रयत्नाचे कौतुक करण्यात आले. अन्य राज्यांनी अनुकरण करावे अशी ही सर्वोत्तम पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ओडिशाविषयी 

भारताच्या पूर्वेकडील किनारपट्टीवर वसलेल्या ओडिशाला बंगालच्या उपसागरालगत 480 कि.मी. किनारपट्टी लाभली आहे. आधुनिक ओडिशा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 मध्ये झाली असली तरीही त्याचा इतिहास महाभारतात उल्लेखल्याप्रमाणे  कलिंगाच्या काळापासून आहे. मागील अनेक वर्षांत राज्याने आपल्या सर्व शेजारील राज्यांपेक्षा वेगळी सांस्कृतिक ओळख राखली आहे. हे राज्य समृद्ध खनिजसंपदा  आणि खाणी यासाठी पारंपरिकरित्या ओळखले जाते. अलीकडे नवीन सुरू झालेल्या शतकात राज्याचे लक्ष औद्योगिक उत्पादनात व सेवांकडे आकर्षित झाले. राज्यात स्वत:चे युनिट स्थापन करू पाहणाऱ्या गुंतवणुकदारांना अडचणमुक्त व अनुकूल व्यवसाय वातावरण मिळावे यासाठी राज्य सरकारने काहीअनोखी पाऊले उचलली आहेत. अशा सर्व माहितीसाठी ही वेबसाइट वन-स्टॉप पर्याय आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "देशभरात असलेल्या टाळेबंदीत अनेक ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत ओडिया कामगारांसाठी ओडिशा सरकारच्या वतीने हेल्पलाईन पोर्टलची मदत"

Leave a comment

Your email address will not be published.


*