~ भारतीय प्रवाश्यांसाठी ई-विजाच्या येऊ घातलेल्या चाचणीसाठीच्या अपडेट्सची माहिती दिली ~
~2030 पर्यंत 10.5 दशलक्षांवरून 21 दशलक्षांपर्यंत आणत आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आगमनांचा आकडा दुप्पट करण्यावर लक्ष केंद्रीत करणार~
मुंबई, 18 डिसेंबर, 2020: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पर्यटन संबंधांना पुन:प्रस्थापित करण्याच्या आणि त्यांना सबळ करण्याच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेच्या सन्माननीय पर्यटन मंत्री सुश्री ममोलोको कुबायी-नुबाने
आणि दक्षिण आफ्रिका पर्यटनाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी सुश्री स्थेम्बिसो द्लामिनी यांनी भारताला भेट दिली. प्रवास व पर्यटन इकोसिस्टीमच्या महत्त्वाच्याप्रतिनिधींसोबत आणि त्यांची 8वी सर्वात मोठी इंटरनॅशनल स्त्रोत बाजारपेठ असलेल्या भारतातील डेस्टिनेशन मार्केटिंग समर्थनाला सुधारण्यासाठीच्या वचनबध्दतेला दुजोरा देण्यासाठी उच्च पातळीवरील प्रतिनिधी मंडळ प्रयत्नशील आहे.
नवीन नियुक्ती झालेल्या मंत्र्यांनी सीओओ सोबत नवीन वर्षासाठी पर्यटन बोर्डाच्या भारताच्या संदर्भातील विकास धोरणाची रुपरेषा तयार केली आहे.. दक्षिण आफ्रिका पर्यटन 2030पर्यंत आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमनाला 10.5 दशलक्षावरुन 21 दशलक्षापर्यंत नेत संख्या दुप्पट करण्यास सज्ज झाले असल्यामुळे, या दीर्घकालीन उद्देशाला गाठण्यामध्ये भारत महत्त्वपूर्ण भूमिका पार पडेल अशी अपेक्षा आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2019पर्यंत दक्षिण आफ्रिकेने वायओवाय तत्वावर 81,316 भारतीय पर्यटकांचे स्थळावर स्वागत केले आहे, हा आकडा 5.48%नी वाढला आहे. 2019च्या पूर्वार्धात राखलेल्या सरासरी कालावधीच्या लांबीत 25 रात्रींपासून 27 रात्रींपर्यंत 8% वायओवाय वाढ झाली आहे. 2019च्या पूर्वार्धात दक्षिण आफ्रिका पर्यटनासोबत एकूण भारतीय प्रवासी व्यय 4थ्या वर्षी उच्चांकावर होता, या कालावधीत पर्यटनाने आपल्या वार्षिक व्यय धेय्याच्या 64% मिळवले होते.
“भारत नेहमीच आमच्या जागतिक पातळीवरील लक्षित असलेल्या महत्त्वपूर्ण बाजारपेठांपैकी एक आहे आणि देशातील उत्क्रांत होणाऱ्या आणि परिपक्व अशा अनेक बाजारपेठांची निरंतर वाढत जाणारी प्रगती पाहणे अतिशय प्रोत्साहक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या चित्रवत नैसर्गिक सौंदर्याला भेट देण्यासाठी अधिकाधिक पर्यटक येण्यासोबत, आमच्या देशातील नवनवीन भूप्रदेशांना खुले करण्याच्या दृष्टीने अधिकाधिक परिश्रम घेण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. यामुळे ग्राहकाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासोबत आमच्या व्यवसाय भागीदारांना विक्रयासाठी वैविध्यपूर्ण स्थळांचे विकल्प देऊ करणे असे दोन्ही उद्देश साध्य होतील.” असे दक्षिण आफ्रिका पर्यटन हबच्या हेड, एमइआयएसइए, सुश्री नेलिस्वा नाकानी (Ms. Neliswa Nkani) म्हणाल्या.
दक्षिण आफ्रिका पर्यटन बाजारपेठेतील आपल्या प्रगतीच्या गतीला कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत असून 2020मध्ये दक्षिण आफ्रिकेला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या आगमनामध्ये 1.3% वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिणामासाठी बोर्डाने बाजारपेठ क्षमता श्रेणीबध्द करण्यासाठी व प्रगतीचे नवीन टप्पे सुनिश्चित करण्यासाठी पर्यटन बोर्डाने व्यापार विक्री ते विक्री विपणनापर्यंत धोरणात्मक स्थानांतरणाचे नियोजन केले आहे. दक्षिण आफ्रिकन पर्यटन सहकार्यात्मक पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध प्रदेशांना पर्यटन बोर्डांसोबतही जवळून काम करत आहे.
पुढे सांगताना सुश्री नाकानी म्हणाल्या, “दक्षिण आफ्रिकापारंपारिकरित्या मल्टि-जनरेशन, कौटुंबिक स्थळ म्हणूनसमजले जाते, भारतीय प्रवासी समुहात एकल प्रवाश्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहणे अतिशय सुखद अनुभव आहे. आमचे उत्क्रांत झालेले ब्रँड धोरण आम्हाला स्टेकहोल्डर्समध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मूल्य प्रस्तावाला चालना देण्यात मदत करेल, तसेच भारतातील आमच्या लक्षित प्रदेशांपैकी प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या आवश्यकतांना साजेश्या स्थळ उत्पादन ऑफरिंग्जना प्रदर्शित करणारी कस्टमाइझ समावेशकता मॉडेल्स निर्माणात मदत करेल.”
2019मध्ये दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडमध्ये नवीन ई-विजा यंत्रणेचा प्रारंभ केला होता. त्याच्या यशस्वी पूर्ततेनंतर इतर देशांमध्ये रोलिंग आउट ई-विसा सुरु करण्याची मनिषा आहे, ज्यात भारत सर्वोच्च प्राथमिकता असलेल्या बाजारपेठांपैकी एक आहे. भारतामधून प्रवास व पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, मंत्र्यांनी बाजारपेठेसाठी ई-विजा गंभीर तत्वावर विचारात घेतला जात असल्याचे तसेच त्याचा लवकरच प्रारंभ होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. विजा प्रक्रियेला जलद करण्यासाठी आघाडीच्या टूर ऑपरेटर्ससाठी प्री-वेटेड विजाची 2018मध्ये ओळख करुन देण्याच्या हे अगदी जवळ आहे.
नोव्हेंबर 2019मध्ये, दक्षिण आफ्रिकन गृह व्यवहार मंत्र्यांनी घोषणा केली की आमचा देश तात्काळ आंतरराष्ट्रीय देशांमधून भेट देणाऱ्या अल्पवयीनप्रवाश्याकडून जन्मप्रमाणपत्रांची पूर्वी करीत असलेलीविचारणा बंद करणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या सन्माननीय पर्यटनमंत्री सुश्री ममोलोको कुबायी-नुबाने यांनी असे घोषित केले की, “दक्षिण आफ्रिकेने भारतीय पर्यटकांना हाताळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, ज्यात विजा उपाययोजनेत बदल घडवून आणण्याचा समावेश होत आहे. प्राथमिक प्रोजेक्ट त्रुटी विरहित चालला तर ऑनलाइन विजा निवेदन यंत्रणा प्राथमिक चाचण्या पुढील आठवड्यात सुरु होतील.संपूर्ण रोल आउट 1 एप्रिल 2020ला सुरु होईल. भारतीय बाजारपेठेसाठी आम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवला असून दक्षिण आफ्रिकेला मल्टिपल-एंट्री विजा देण्यासाठी भारतासोबत आम्ही बोलणी करत आहोत.”
“एमआयसीइ आणि क्रीडा पर्यटन दक्षिण आफ्रिकेच्या आगमनात वाढ आणण्याची अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिका प्रसिध्द वेडिंग डेस्टिनेशन म्हणून देखील भारतीय लोकांमध्ये प्रसिध्द होत आहे. दक्षिण आफ्रिकन शासन त्रयस्थ देशांच्या एयरलाइन्सचे दक्षिण आफ्रिकेच्या मार्गांवर थेट फ्लाइट्सचे चालन करण्यासाठी इच्छुक असण्याच्या रुचीचा तसेच भारतीय शासनासोबत संबंधित प्रस्तावांवर चर्चा करण्याचा देखील शोध घेत आहे.
जानेवारी ते सप्टेंबर 2019पासून एमआयसीइमध्ये 24% भारतीय प्रवासी भेटी नोंदवल्या गेल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एकूण भारतीय आगमनांपैकी 43% आगमने पुन्हा येणाऱ्या प्रवाशांची आहेत. 2019मध्येखरेदी करणाऱ्या भारतीय प्रवाश्यांमध्ये 36.6% आणि दक्षिण आफ्रिकेत करमणूकपर कृतीं केलेल्याप्रवाश्यांमध्ये 26% वाढ आढळून आली आहे.
व्यवसाय आणि करमणूक प्रवाश्यांचा वर्ग दक्षिण आफ्रिकेत येणे सुरु ठेवून पर्यटन बोर्डाने भारताच्या एमआयसीइ समुहांमध्ये स्थिर वाढ अनुभवली आहे. पर्यटनाला व्यवसाय देत एमआयसीइ या वर्गाला 2020मध्ये दक्षिण आफ्रिकन पर्यटनासाठी महत्त्वाचे लक्षित क्षेत्र बनवण्यास सक्षम आहे.
पर्यटन दक्षिण आफ्रिकन अर्थकारणाच्या प्रगतीतीलमहत्त्वपूर्ण सहयोगी घटक आहे. डब्ल्यूटीटीसी रिपोर्टप्रमाणे 2028पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील सुमारे 2.1 दक्षलक्ष नोकऱ्या प्रवास व पर्यटनावर अवलंबून असतील. या दृष्टीने दक्षिण आफ्रिकन पर्यटनाचा एसएमएमइसोबत जवळून काम करुन अशा रोजगार संधी निर्माण करून जीडीपीमध्ये लक्षणीय योगदान देण्याचा तसेच कल्पनेहून वेगळ्या मार्गांचे सृजन करत नवीनतम उत्पादनांचा परिचय करण्याचा मानस आहे.
Be the first to comment on "दक्षिण आफ्रिका पर्यटन मंत्री ममोलोको कुबायी-नुबाने यांची भारतीय प्रवाश्यांसाठी प्रारंभिक ई-विजा कार्यक्रमाच्या परिचयाची घोषणा करण्यासाठी भारताला भेट"