ओमिडयार नेटवर्क इंडिया नीलेश मिश्रा व बिग एफएमच्‍या सहयोगाने नवीन रेडिओ शो ‘जिंदगी मोबाइल’ सादर करणार

Launch of #Zindagi Mobile
Launch of #Zindagi Mobile

Launch of #Zindagi Mobile

नवीन रेडिओ शो नेक्‍स्‍ट हाफ बिलियन भारतीयांसाठी तंत्रज्ञानाचे लाभ व धोक्‍यांना सादर करणा-या कथांवर,तसेच आजच्‍या डिजिटल युगात गोपनयीतेसाठी असलेल्‍या गरजेवर फोकस देणार

मुंबई, १७ डिसेंबर २०१९: ओमिडयार नेटवर्क इंडिया या सामाजिक परिणामांवर लक्ष केंद्रित करणा-या गुंतवणूक कंपनीने आज ५८ स्‍टेशन्‍स असलेले भारतातील सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क बिग एफएम आणि प्रख्‍यात रेडिओ कथाकार नीलेश मिश्रा यांच्‍या सहयोगाने रेडिओ शो जिंदगी मोबाइल सादर केला. शक्तिशाली कथानकाच्‍या माध्‍यमातून हा शो डिजिटल युगामध्‍ये सामावून राहण्‍याचे महत्त्‍वाचे पैलू, तंत्रज्ञानाचे फायदे, त्‍यामधून निर्माण होणारे धोके, नुकसानांपासून संरक्षण आणि गोपनीयतेची संकल्‍पना व महत्त्‍व याबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करेल.

भारताचा लोकप्रिय कथाकार नीलेश मिश्राद्वारे वर्णन करण्‍यात येणारा शोचा प्रत्‍येक एपिसोड नेक्‍स्‍ट हाफ बिलियन व्‍यक्‍तींना सक्षम करण्‍यासह तंत्रज्ञानाच्‍या नुकसानांपासून संरक्षण करणा-या थीम्‍सबाबत माहिती सांगेल. एपिसोड्समध्‍ये संमतीचे महत्त्‍व (उदा. कंपनी तुमच्‍या फोन क्रमांकाच्‍या बाबतीत काय करते ते जाणून घेण्‍याचा अधिकार), तंत्रज्ञान देणारे सक्षमीकरण (उदा. पेमेण्‍टच्‍या नवीन पद्धतींचा अवलंब) आणि नुकसानांपासून संरक्षणासाठी उपाय (उदा. बँकिंग फसवणूकीसंदर्भात संरक्षण) अशा विषयांचा समावेश असेल. तसेच शो गोपनीयतेबाबतचे महत्त्‍व, तसेच बारकावे देखील सादर करेल. हा शो दर मंगळवारी प्राइमटाइमच्‍या वेळी १५ मिनिटांच्‍या साप्‍ताहिक एपिसोडसह १० आठवड्यांपर्यंत सुरू राहणार आहे. हा शो अधिकाधिक प्रेक्षकांना पाहता यावा यासाठी तीन वेळा पुनर्प्रसारित करण्‍यात येईल. प्रत्‍येक एपिसोड महत्त्‍वपूर्ण बाजारक्षेत्रांमध्‍ये हिंदी, इंग्रजी, कन्‍नड,मल्‍याळम व तमिळ अशा पाच भाषांमध्‍ये प्रसारित करण्‍यात येईल. 

२०२२ पर्यंत अर्ध बिलियन भारतीय त्‍यांच्‍या मोबाइल फोन्‍सच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन येण्‍याची अपेक्षा आहे.नेक्‍स्‍ट हाफ बिलियनसाठी (एनएचबी) बदलाचे स्रोत असताना देखील मोबाइल फोन्‍स या युजर्ससाठी आर्थिक फसवणूक, ओळखपत्रांची चोरी आणि वैयक्तिक डेटाचा बेकायदेशीर वापर यासंदर्भात असुरक्षित ठरत आहेत.जिंदगी मोबाइलच्‍या माध्‍यमातून निर्माते गोपनीयता हा व्‍यक्‍तीचा मुलभूत अधिकार आहे या गोष्‍टीला महत्त्‍व देतील. तसेच शो प्रेक्षकांना टेक फॉर गुडचा वापर करत तंत्रज्ञानाचा चांगल्‍याप्रकारे वापर करण्‍याच्‍या दोन पैलूंबाबत जागरूक करेल. यामधून रिस्‍पॉन्सिबल टेकनिर्माण होण्‍यासाठी मदत होईल, ज्‍यामुळे तंत्रज्ञान निर्माण करण्‍यावर फोकस देता येईल आणि प्रेक्षकांचे संभाव्‍य धोके व नुकसानांपासून संरक्षण होईल.  

कंपनीच्‍या या अद्वितीय उपक्रमाबाबत बोलतानाओमिडयार नेटवर्क इंडियाच्‍या विपणन व संवाद विभागाचे संचालक रोहन व्‍यवहारकर म्‍हणाले, ”ओमिडयार नेटवर्क इंडियामध्‍ये आमचा विश्‍वास आहे की, समाजाने विस्‍तृत स्‍तरापर्यंत तंत्रज्ञान सेवेचा लाभ घेतला पाहिजे. भारताचे नेक्‍स्‍ट हाफ बिलियन लोक ऑनलाईन येण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे हा शो त्‍यांना तंत्रज्ञान कशाप्रकारे त्‍यांचे जीवन संपन्‍न करू शकते,त्‍यामधून निर्माण होणारी असुरक्षितता आणि गोपनीयतेच्‍या अधिकाराचा कशाप्रकारे वापर करावा हे उत्तमरित्‍या समजण्‍यामध्‍ये माहिती देण्‍यासह, जागरूक व मदत करण्‍याचा प्रयत्‍न करतो. आमचा विश्‍वास आहे की, हे जागरूकता निर्माण प्रयत्‍न त्‍यांना डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये कार्यक्षमपणे सहभाग घेण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी योगदान देतील.

या सहयोगाबाबत बोलताना नीलेश मिश्रा म्‍हणाले, ”डिजिटल युग आपल्‍या जीवनामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे आणि आपल्‍याला चालू घडामोडींशी कनेक्‍टेड राहण्‍यामध्‍ये मदत करत आहे. माझे आईवडिल आता त्‍यांच्‍या नातवांपासून दूर नाहीत,याचे श्रेय जाते व्हिडिओ कॉल्‍सना. पण याबाबतीत काळजी घेण्‍याची देखील गरज आहे. डिजिटल सुविधांमुळे नुकसान किंवा इतरांना त्रास देखील होऊ शकतात. तसेच मुलभूत अधिकार राइट टू प्रायव्‍हसीबाबत मोठी समस्‍या आहे. आपण या गोष्‍टीला अधिक प्राधान्‍य देत नाही. प्रत्‍येक वेळी आपण आपले फोन क्रमांक, आपला पत्ता, आपला ईमेल आयडी यांची माहिती देतो, ज्‍यामुळे त्‍यांचा गैरवापर कधी होतो हे समजतच नाही. लाखो असुरक्षित लोकांसाठी एटीएम पिन्‍स देखील सुरक्षित नाहीत. लाखो भारतीयांमध्‍ये याबाबत जागरूकता निर्माण करण्‍याची गरज आहे. मला या नवीन शोचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. हा शो महत्त्‍वाच्‍या समस्‍यांना समोर आणतो आणि त्‍यांचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करतो. तसेच या शोमुळे आम्‍हाला प्रबळ व प्रभावी कथानकाच्‍या माध्‍यमातून जागरूकता निर्माण करण्‍यामध्‍ये मदत होईल. मला वाटत नाही की, जगात कुठेही गोपनीयतेबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी ऑडिओ कथाकथनाचा वापर करण्‍यात आला असेल.

उद्देशपूर्ण उपक्रमांवर काम केल्‍यानंतर श्री. सुनिल कुमारन, कंट्री हेड – प्रोडक्‍ट, मार्केटिंग व थ्विंक बिग, बिग एफएम आजच्‍या काळात जिंदगी मोबाइलसाठीच्‍या गरजेबाबत बोलताना म्‍हणाले, ”आमचे तत्त्‍व चेंज स्‍टार्ट विथ यूशी बांधील राहत बिग एफएम सर्वात प्रभावी व नाविन्‍यपूर्ण उद्देशपर उपक्रम राबवण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिले आहे. ओमिडयार नेटवर्क इंडियासोबतचा आमचा सहयोग आमच्‍या तत्त्‍वाला सादर करतो आणि आम्‍हाला व्‍यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत त्‍यांना तंत्रज्ञानाच्‍या धोक्‍यांबाबत जाणीव करून देण्‍यामध्‍ये मदत करतो. २०२० पर्यंत ५६४ दशलक्षहून अधिक भारतीय लोक इंटरनेट युजर्स बनण्‍याच्‍या अंदाजासह हा संवाद काळाची गरज आहे. आम्‍हाला जिंदगी मोबाइल सारखा शो सादर करण्‍याचा अभिमान वाटत आहे. या शोच्‍या माध्‍यमातून आम्‍ही व्‍यासपीठ प्रदान करण्‍याचा प्रयत्‍न करतो. हे व्‍यासपीठ अब्‍जो लोकांचे कोणत्‍याही तंत्रज्ञान नुकसानापासून संरक्षण करण्‍यासाठी त्‍यांना मदत करण्‍यामध्‍ये मार्गदर्शक स्रोत म्‍हणून कार्य करते.

ओमिडयार नेटवर्क इंडिया काही बाजारपेठांमधील आपल्‍या प्रेक्षकांवर या कथांचा होणा-या परिणामाबाबत देखील अभ्‍यास करणार आहे आणि या सीझनच्‍या शेवटी त्‍याबाबतच्‍या निष्‍पत्‍ती सादर करणार आहे.

ओमिडयार नेटवर्क इंडिया बाबत

ओमिडयार नेटवर्क इंडिया प्रत्‍येक भारतीयासाठी,खासकरून अल्‍प–उत्‍पन्‍न व अल्‍प-मध्‍यम-उत्‍पन्‍न असलेल्‍या लोकांसाठी, गरीबांपासून विद्यमान मध्‍यमवर्गीयांसाठी अर्थपूर्ण जीवन निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करणा-या धाडसी उद्योगांमध्‍ये गुंतवणूक करते. मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण व सामाजिक परिवर्तनाला चालना देण्‍यासाठी आम्‍ही भारताच्‍या आव्‍हानात्‍मक व सर्वात गंभीर समस्‍यांचा सामना करणा-या खाजगी, ना-नफा तत्त्‍वावरील आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील उद्योगांसोबत काम करतो. आम्‍ही सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यात असलेल्‍या एंटरप्राईजेजमध्‍ये इक्विटी गुंतवणूक करतो आणि ना-नफा तत्त्‍वावर असलेल्‍या उद्योगांना डिजिटल ओळख, शिक्षणउदयोन्‍मुख तंत्रज्ञान, आर्थिक समावेशन, शासन व नागरी सहभाग आणि मालमत्ता अधिकार या क्षेत्रांमध्‍ये मंजूरी देतो. ओमिडयार नेटवर्क इंडिया ही दि ओमिडयार ग्रुपची शाखा आहे. दि ओमिडयार ग्रुपमध्‍ये कंपन्‍या, संस्‍था व उपक्रमांचा समावेश आहे. या ग्रुपला समाजसेवक पॅम आणि ईबेचे संस्‍थापक पेरी ओमिडयार यांचा पाठिंबा आहे.

बिग एफएम बाबत:

बिग एफएम हे ५८ स्‍टेशन्‍स असलेले भारताचे सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क देशभरातील १२०० हून अधिक शहरे, ५०,००० हून अधिक गाव आणि ४५ कोटींहून अधिक भारतीयांपर्यंत पोहोचते. बिग एफएमने बदलत्‍या काळासह स्‍वत:मध्‍ये बदल केला आहे. नवीन बदलासह बिग एफएम ग्राहकांच्‍या जीवनांमध्‍ये अर्थपूर्ण, संबंधित व लक्षवेधक भूमिका बजावेल. हा फक्‍त मनोरंजन देणारा ब्रॅण्‍ड नसून एक हेतूपूर्ण ब्रॅण्‍ड आहे. व्‍यापक पोहोच,स्‍थानिक कन्‍टेन्‍ट आणि विश्‍वसनीय आरजेंसह ब्रॅण्‍ड समाजात सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍यासाठीविचार प्रेरक व स्रोताची भूमिका बजावेल. नवीन टॅगलाइन धुन बदल के तो देखोमध्‍ये तुमचे विचार बदलण्‍यासह उत्तम शुभारंभासाठी जगामध्‍ये बदल घडवून आणणे हे तत्त्‍व दिसून येते. नवीन बदल घडवून आणण्‍यासाठी कार्यक्रमामध्‍ये बदल करत बिग एफएमने संगीत वचनामध्‍ये सुधारणा केली आहे. कंपनी प्रेक्षकांसोबत चाचणी करण्‍यात आलेले तुमच्‍या आवडीचे संगीत सादर करण्‍यासोबत सर्व प्रमुख बाजारपेठांमधील रेडिओ व मनोरंजन क्षेत्रांतील काही दिग्‍गज व्‍यक्‍तींना समोर आणत आहे. नेटवर्कचे प्रसंगानुसार कार्यक्रम,सीएसआर उपक्रम आणि ग्राहक एकीकृत मोहिमांमधूनधुन बदल के तो देखो तत्त्‍व दिसून येते. मूळ कन्‍टेन्‍ट-आधारित शोज आणि सर्वसमावेशक ब्रॅण्‍ड-केंद्रित मोहिमांनी सातत्‍याने एमवीज, अॅबीजएशियन कस्‍टमर एंगेजमेंट अवॉर्डस्, इंडियन रेडिओ फोरम आणि न्‍यूयॉर्क फेस्टिवल अशा प्रतिष्ठित इंडस्‍ट्री अवॉर्ड्समध्‍ये सातत्‍याने पुरस्‍कार जिंकले आहेत.

अधिक माहितीसाठी www.bigfmindia.com येथे भेट द्या.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "ओमिडयार नेटवर्क इंडिया नीलेश मिश्रा व बिग एफएमच्‍या सहयोगाने नवीन रेडिओ शो ‘जिंदगी मोबाइल’ सादर करणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*