सिग्निफायने कार्बन न्युट्रल ऑपरेशन्सचे उद्दिष्ट भारतात केले साध्य

नवी दिल्लीभारत  १४ डिसेंबर २०१९:– सिग्निफाय (Signify(युरोनेक्स्ट: LIGHT) या लायटिंगच्या क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपनीने आपल्या वाढीसाठी आवश्यक बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात शून्य कार्बन उत्सर्जनाचे (कार्बन न्युट्रॅलिटीउद्दिष्ट साध्य केले आहे.पाच बाजारपेठांमध्ये– विशेषतआसीयान राष्ट्रे,अतिपूर्वेकडील राष्ट्रेभारतइंडोनेशिया व प्रशांत महासागरीय प्रदेश– कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करण्याच्या उद्दिष्टाचा हा एक भाग आहेयामुळे आता सिग्निफाय काम करत असलेल्या एकूण १९ बाजारपेठांपैकी १५ बाजारपेठांमध्ये कंपनीने कार्बन न्युट्रॅलिटी साध्य केली आहेयामुळे २०२० पर्यंत १०० टक्के कार्बन न्युट्रॅलिटी या ध्येयाच्या कंपनी जवळ येऊन पोहोचली आहे.कंपनीच्या ब्राइटर लाइव्ह्जबेटर वर्ल्ड” (Brighter Lives, Better Worldया शाश्वतता कार्यक्रमांतर्गत ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी हे एक आहे.

ऊर्जा कार्यक्षमतानूतनीकरणीय ऊर्जेचा वापर आणि कार्यालयीन जागेचा योग्य वापर यांवर भर देत या पाच बाजारपेठांमधील एकंदर कार्बन उत्सर्जन कंपनीने २०१९ वर्षात १९ टक्के कमी केलेयातील ३३ टक्के कपात बिगरऔद्योगिक स्थळांवर साध्य झाली आहेतर १७ टक्के कपात औद्योगिक स्थळांवर साध्य झाली आहे.व्यवसायासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात ३२ टक्के कपात व लॉजिस्टिक्समधील कार्बन उत्सर्जनात १८ टक्के कपात कंपनीने साध्य केली आहेसिग्निफायने उर्वरित कपातीचे लक्ष्य पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या तसेच समाजावर प्रभाव टाकणाऱ्या प्रकल्पांमध्ये दिलेल्या योगदानाच्या माध्यमातून पूर्ण केले आहेयांमध्ये भारतातील छोट्या ते मध्यम पवनचक्क्यांचातर व्हिएतनाममधील धरणाचा वापर न करता चालवल्या जाणऱ्या हायड्रो प्लाण्टचा समावेश आहे.

आमच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अविरत बांधिलकीमुळे आम्हाला हा मोठा पल्ला गाठणे शक्य झाले आहेत्यांचा मला खूप अभिमान वाटतोकार्बन न्युट्रॅलिटीचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे आणि आजही शक्य आहे हे आम्ही दाखवून दिले आहे,” असे सिग्निफायचे मार्केट लीडरइंडिया सुमित पद्माकर जोशी म्हणाले. “आमच्या यशामुळे आजूबाजूच्या अन्य कंपन्यांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा आम्ही करतो व २०५० पर्यंत संपूर्ण जगात कार्बन न्युट्रॅलिटीचे ध्येय गाठण्याच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही त्यांना करतो.”

ब्राइटर लाइव्ह्जबेटर वर्ल्ड

सिग्निफायने आपला ब्राइटर लाइव्ह्जबेटर वर्ल्ड” हा शाश्वतता कार्यक्रम २०१६ मध्ये सुरू केलायावेळी २०२० साठी महत्त्वाकांक्षी शाश्वतता उद्दिष्टे निश्चित करण्यात आलीही उद्दिष्टे दोन स्तंभांवर आधारलेली होती:

शाश्वत उत्पन्न:

●    ८० टक्के उत्पन्न हे शाश्वत उत्पादनेप्रणाली व सेवा यांच्यामार्फत निर्माण करण्याचे उद्दिष्ट २०२० पर्यंत गाठणे

●    २०२० पर्यंत २ अब्ज एलईडी लॅम्प्स व ल्युमिनेअर्सच्या पुरवठ्याचे उद्दिष्ट गाठणे

शाश्वत ऑपरेशन्स:

●    ऑपरेशन्समध्ये १००कार्बन न्युट्रॅलिटी

●    नूतनीकरणीय विजेचा १००वापर

●    उत्पादनातून निर्माण झालेला कोणताही कचरा भरावक्षेत्रात जाणार नाही

●    एकूण नोंदणी करण्याजोग्या केसेसचा दर ०.३५ खाली नेत कार्यस्थळ सुरक्षित व निरोगी राखण्याचा प्रयत्न करणे

●    पुरवठादाराच्या किमान कामगिरीचा दर ९० टक्के ठेवून पुरवठा साखळी शाश्वत राहील याची काळजी घेणे

कंपनीच्या ऊर्जाकार्यक्षमता उपाययोजनांचा भाग म्हणून वर्ल्ड ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (World Green Building Council)च्या २०३० पर्यंत सर्व इमारती कार्बन न्युट्रल करण्याच्या उपक्रमात सहभागी घेण्यास सिग्निफाय बांधील आहेयाशिवाय१०० टक्के इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहने वापरण्याचे उद्दिष्ट २०३० पर्यंत गाठण्यासाठी सिग्निफाय क्लायमेट ग्रुपच्या ईव्ही१००(EV100) कार्यक्रमाला सहाय्य करत आहेनूतनीकरणीय वीज वापराचे प्रमाण वाढवण्याच्या आरई१०० (RE100)उपक्रमालाही कंपनी मदत करत आहेया उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी कंपनीने क्लायमेट वीक न्यूयॉर्क २०१९दरम्यान कंपन्या व राष्ट्रांना थ्री परसेंट क्लब (Three Percent Club)मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले,जेणेकरून कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करण्याचे उद्दिष्ट २०५० पर्यंत पूर्ण होऊ शकेल.

२०१९ वर्षाच्या डो जोन्स सस्टेनिबिलिटी इंडेक्समध्ये(डीजेएसआयसिग्निफायचा उल्लेख इलेक्ट्रिकल कम्‍पोनंट्स अँड इक्विपमेंट्स विभागातील आघाडीची कंपनी म्हणून करण्यात आलायामुळे कंपनीने शाश्वततेच्या दृष्टीने केलेल्या सुधारणांची सलग तिसऱ्या वर्षी दखल घेतली गेली.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सिग्निफायने कार्बन न्युट्रल ऑपरेशन्सचे उद्दिष्ट भारतात केले साध्य"

Leave a comment

Your email address will not be published.


*