मुंबईत ‘इन्व्हेस्ट बिहार’ रोड शो चे आयोजन

Bihar Governments Department of Industries in collaboration with Confederation of Indian Industries Successfully Organizes Road Shows in Four Cities of India -Photo By Sachin Murdeshwar GPN

Bihar Governments Department of Industries in collaboration with Confederation of Indian Industries Successfully Organizes Road Shows in Four Cities of India -Photo By Sachin Murdeshwar GPN

११.३ सर्वाधिक वृद्धिदर प्राप्त केलेले बिहार हे भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य

मुंबई, ११ डिसेंबर २०१९ :- क्रेडिट रेटिंग इनफार्मेशन सर्विस ऑफ़ इंडिया (CRISIL) ने  प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट नुसार जानेवारी २०१९ मध्ये बिहार राज्याचा वृद्ध्यांक २.० इतका होता. आंध्र प्रदेश आणि गुजरात यांसारख्या राज्यांना मागे टाकत ११.३ हा सर्वाधिक वृद्धिदर प्राप्त केलेले बिहार हे भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य आहे. मा.मंत्री श्री. श्याम राजक यांच्या नेतृत्वाखाली बिहार शासन औद्योगिक विभाग व भारतीय उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद या चार शहरांमध्ये ‘इन्व्हेस्ट बिहार’ या नावाने रोड शो चे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. जीटूबी (G2B) संवाद सुलभ होण्याच्या दृष्टीने व्यासपीठ निर्माण करणे, गुंतवणूकदार शोधून त्यांच्यासाठी हे व्यासपीठ खुले करणे आणि बिहार हे गुंतवणुकीकरता अग्रक्रमाचे राज्य व्हावे यासाठी प्रयत्न करणे हा या रोड शोच्या आयोजनामागचा मुख्य हेतू होता. या रोड शो दरम्यान स्थानिक गुंतवणूकदार व उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये अनेक बैठका घेण्यात आल्या.

बिहारचा वार्षिक वृद्धी दर १५ टक्क्यापर्यंत वाढवणे, पुढील काळातील नोकरीच्या संधी निर्माण करणे आणि राज्यातील गुंतवणूक वाढीस लावण्याच्या दृष्टीने बिहार शासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये गुंतवणूकीला चालना देणाऱ्या धोरणाचा मसुदा तयार केला. या धोरणामध्ये अन्न प्रक्रिया, चर्मोद्योग, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ईएसडीएम, पर्यटन, आरोग्य, अक्षय ऊर्जा व शिक्षण या विभागांतील उद्योगांना सर्वाधिक प्राधान्य दिले होते. २०१७ साली तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य सरकारने बिहार स्टार्ट-अप धोरण राबवले. हे धोरण तरुणांना उद्योजक होण्यास आणि स्वत:चे मोठे उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या योजनांशी संलग्न होते.

मा. मंत्री श्री.श्याम राजक, उद्योग विभाग, बिहार शासन म्हणाले, “गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील गुंतवणूकदारांकडून या रोड शोला मिळालेला भरघोस सकारात्मक प्रतिसाद पाहून आम्ही कृतकृत्य झालो आहोत. अशा उपक्रमाद्वारे गुजरात व इतर राज्यांतील वस्त्रोद्योग, हिरे यांसारख्या उद्योगांतील गुंतवणूकदारांना आमच्या राज्यात आमंत्रित करून येथील स्थानिक कारागिरांकरता त्यांच्या स्वत:च्या शहरांमध्येच शाश्वत उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. बिहारच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला सतत पाठिंबा देणाऱ्या भारतीय उद्योगसमूहाच्या सदस्यांचे देखील आम्ही ऋणी आहोत.” उद्योग विभाग, बिहार प्रशासन गुंतवणुकीच्या अधिक संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या अनेक विभागांची निर्मिती करत आहे. उदा. अन्न प्रक्रिया संचलनालय, औद्योगिक क्षेत्राच्या संरचनात्मक विकासासाठी आणि राज्यातील उद्योग क्षेत्र विस्तारासाठी बिहार औद्योगिक क्षेत्रविकास अधिकारी (BIADA), राज्यातील खाजगी- सार्वजनिक भागीदारीला चालना देण्यासाठी संरचनात्मक विकास अधिकारी (IDA), बिहार फाउंडेशन, हातमाग आणि रेशीम संचलनालय, बिहार राज्याचे खादी ग्रामोद्योग बोर्ड व उद्योगमित्र, उद्योजकांसाठी सिंगल विंडो क्लीअरन्स सिस्टीमचा समावेश आहे. निती आयोगाने दिलेल्या अहवालानुसार २०१७ साली झालेल्या भारतातील सर्व राज्यांतील उद्योजकांच्या ‘Ease of Doing Business’ या सर्वेक्षणात तरुणांनी सुरु केलेल्या नवीन उद्योगांच्या यादीत भारताच्या संदर्भात टक्केवारीनुसार बिहार राज्याचे नाव सर्वप्रथम होते. ENDS

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "मुंबईत ‘इन्व्हेस्ट बिहार’ रोड शो चे आयोजन"

Leave a comment

Your email address will not be published.


*