फाँन्टेरा फ्युचर डेअरीने नव्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला चालना देण्यासाठी दाखल केले ड्रीमरी

PHOTO CAPTION : Left to Right: Mr. Ishmeet Singh, CEO, Fonterra Future Dairy Mr. Sunil Sethi, Chairman, Fonterra Future Dairy & MD, Sri Lanka & India Sub Continent Fonterra Mr. Kishore Biyani, Founder and CEO, Future Group Mr. Chris Greenough, Director – Strategy & Foresights, Fonterra Co-operative Group Limited Mr. Anuraag Agarwal, Head of Business Development, Strategy and Mergers & Acquisitions at Future Group

PHOTO CAPTION : Left to Right:
Mr. Ishmeet Singh, CEO, Fonterra Future Dairy
Mr. Sunil Sethi, Chairman, Fonterra Future Dairy & MD, Sri Lanka & India Sub Continent Fonterra
Mr. Kishore Biyani, Founder and CEO, Future Group
Mr. Chris Greenough, DirectorStrategy & Foresights, Fonterra Co-operative Group Limited
Mr. Anuraag Agarwal, Head of Business Development, Strategy and Mergers & Acquisitions at Future Group

मुंबई, 26 जून 2019 : (जीपीएन) / ग्लोबल प्राइम न्यूज

  • विशेषतः भारतीयांसाठी तयार केलेल्या उत्पादनांचे अनावरण
  • डेअरी 2.0 धोरणाद्वारे नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणण्यासाठी सज्ज

फाँन्टेरा फ्युचर डेअरी या जागतिक डेअरी न्यूट्रिशन कंपनी फाँन्टेरा आणि भारतातील एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्युचर कन्झ्युमर यांच्यातील संयुक्त भागीदारी कंपनीने भारतातील ग्राहकांना डेअरीचा आनंद नव्या प्रकारे द्यायचे ठरवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने, या संयुक्त भागीदारी कंपनीने आज  ड्रीमरी हा कन्झ्युमर ब्रँड दाखल केला आहे. हा ब्रँड या आठवड्यात पश्चिम भारतातील स्टोअर्समध्ये उपलब्ध केला जाणार आहे.

ड्रीमरी रेंजमधील पहिल्या उत्पादनांचे – दही, यूएचटी टोन्ड मिल्क, चॉकलेट व स्ट्रॉबेरी मिल्कशेक यांचे आज अनावरण करण्यात आले.

फाँन्टेरा फ्युचर डेअरीचे अध्यक्ष व फाँटेरा ब्रँड्स श्रीलंका व भारतीय उपखंडाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील सेठी यांनी नमूद केले, तरुण, शहरी व नेहमी धावपळ करणाऱ्या नव्या प्रकारच्या भारतीय ग्राहकांना नवा अनुभव देण्यासाठी ड्रीमरीचा डेअरीतील शतकाहून अधिक अनुभव उपयुक्त ठरणार आहे.

फाँन्टेराचे जागतिक डेअरी नावीन्य, उत्पादन व पोषण यातील कौशल्य आणि फ्युचर कन्झ्युमरची रिटेल व वितरण यातील आघाडी यांची सांगड घालून, ग्राहकांना अत्यंत दर्जेदार, पोषक व चवदार डेअरी उत्पादनांचा आनंद देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. यास आम्ही डेअरी 2.0 असे म्हणतो.”

“ग्राहकांना आमच्या डेअरीवर विश्वास ठेवता यावा, यासाठी आम्ही या भागीदारीच्या निमित्ताने 130 वर्षांचा डेअरीचा अनुभव आणि आमची जागतिक स्तरावरील अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्रमाणके यांची सांगड घालणार आहोत. फ्युचर कन्झ्युमरबरोबर काम केल्याने आम्हाला ग्राहकांना पूर्णपणे समजून घेणे आणि भारतात यशस्वी होण्यासाठी योग्य बाबी समजून घेणे शक्य होणार आहे. या विशेष सहयोगामुळे भारतीय डेअरी उद्योगामध्ये नवे बदल घडून येणार आहेत.”

फ्युचर कन्झ्युमरचे अध्यक्ष किशोर बियाणी यंनी सांगितले, ड्रीमरी नवी उत्पादने सादर करणार असून, त्यामुळे ग्राहकांसाठी विविध पर्याय निर्माण होतील, तसेच भारतातील मूल्यवर्धित डेअरी बाजार विस्तारण्यासाठी मदत होईल.

“फाँन्टेराकडे उत्पादन विकासाचे विशेष कौशल्य आहे. भारतीय ग्राहकांची आवड, प्राधान्य व सवयी याविषयीचे आमचे आकलन वापरण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर काम करत आहोत. या उत्पादनांमधून ग्राहकांच्या आकांक्षा दिसून येतील आणि ब्रँड त्यांचा विश्वासही संपादित करेल, अशी अपेक्षा आहे.”

डेअरीमध्ये नवे बदल घडवण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून, ड्रीमरी येत्या सहा ते बारा महिन्यांमध्ये सुरुवातीच्या रेंजमध्ये आणखी नावीन्यपूर्ण उत्पादने समाविष्ट करणार आहोत.  

फाँन्टेरा फ्युचर डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इश्मीत सिंग यांनी स्पष्ट केले, ड्रीमरीला या श्रेणीमध्ये क्रांतीकारी बदल आणायचे आहेत.

“आमची पहिली उत्पादने स्टॅपल उत्पादनांवर भर देणार आहेत आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण व समकालीन बदल करण्यासाठी जागतिक दर्जाचे नावीन्य आणणार आहोत.

“परंतु, पुढील वाटचाल करत असताना, सर्व ड्रीमरी उत्पादनांमध्ये उत्कृष्ट गुणवत्ता, चव व पोषण देणारी उत्पादने निर्माण करून आमचा पोर्टफोलिओ वाढवणार आहोत.”

पहिली उत्पादने मुंबई, पुणे, बेंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद व सूरत या महत्त्वाच्या शहरांमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत.

सुरुवातीला दाखल केल्यानंतर, ही संयुक्त भागीदारी भारतभर विस्तार करून मोठा ग्राहकवर्ग निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानंतर, भारतीय ग्राहकांना आनंद देण्याच्या हेतूने, मूल्यवर्धित कन्झ्युमर व फूडसर्व्हिस डेअरी उत्पादने समाविष्ट करण्यासाठी उत्पादनांमध्ये विस्तार करणार आहे.

फाँन्टेरा फ्युचर डेअरी

फाँन्टेरा या जागतिक डेअरी न्यूट्रिशन कंपनीची मालकी  10,000 शेतकरी व त्यांच्या कुटुंबांकडे आहे. डेअरी उद्योगात न्यूझीलंडला जागतिक स्तरावर आघाडी देणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या परंपरेच्या आधारे आम्ही आमचे कौशल्य विकसित केले आहे. सर्व शक्य आहे, हा विश्वास आणि सहयोगात्मक प्रेरणा यामुळे आम्ही जगभर आघाडीचे डेअरी निर्यातक ठरलो आहोत. आमचे  22,000 जण नावीन्यपूर्ण कन्झ्युमर, फूडसर्व्हिस व इंग्रेडिअंट उत्पादनांद्वारे डेअरी पोषण सर्वांपर्यंत पोहोचवतात.

फ्युचर कन्झ्युमर लिमिटेड (एफसीएल)

फ्युचर कन्झ्युमर लिमिटेडने (एफसीएल) बाजारात विविध प्रकारचे एफएमसीजी ब्रँड दाखल केले असून ते भारतातील फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर पिढीच्या गरजा, आवडी व आकांक्षा विचारात घेतात. फूड क्षेत्रातील कंपनीच्या ब्रँडमध्ये टेस्टी ट्रीट, गोल्डन हार्वेस्ट, कार्मिक, कोश, देसी आटा कंपनी व सांगीज किचन यांचा समावेश आहे. तर, होम व पर्सनल केअर ब्रँडमध्ये कारा, क्लीनमेट व प्रिम यांचा समावेश आहे. वितरणाला पाठबळ देणारे आधुनिक रिटेल व डिजिटल कॉमर्स सुविधा यामुळे रिअल टाइम डाटा व माहिती यामुळे, फ्युचर कन्झ्युमर ही एफएमसीजी 2.0 कंपनी असल्याचा कंपनीला अभिमान आहे. कंपनी अमेरिकेतील ‘गुड फॉर यू फूड्स कंपनी’ हेन केलेस्टिअल, स्विसमधील पर्सनल केअर कंपनी मिबेल एजी व न्यूझीलंडमधील डेअरी सहकारी फाँन्टेरा यांच्याबरोबर संयुक्त भागीदारी कंपन्या चालवते.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.