आंध्र प्रदेश सरकारने अदानीसमूहासोबत केला सामंजस्य ठराव

Screenshot_20190112_131731

 टिपणे

·       विशाखापट्टणममध्ये स्थापन होणारजगातील पहिले १०० टक्के नूतनीकरणीयविजेवर चालणारे डेटा सेंटर पार्क

·       आंध्र प्रदेश होणार भारत आणि आग्नेयआशियाचे पूर्व किनाऱ्यावरील डेटा सेंटरहब

·       अदानी समूह करणार ७०,००० कोटीरुपयांची गुंतवणूक२० वर्षांत १००,०००हूनअधिक रोजगारांची निर्मिती शक्य

विजयवाडा११ जानेवारी २०१९ (GPN) :  देशातील तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक डेटा सेंटर्सची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने (जीओएपी)बुधवारी अदानी समूहासोबत एका सामंजस्य ठरारावर स्वाक्षरी केली. या ठरावानुसार विखाशापट्टणमध्ये तसेच भोवलातच्या परिसरात येत्या २० वर्षांच्या काळात ५ जीडब्ल्यू क्षमतेची डेटा सेंटर पार्क्स बांधली जाणार आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जगातील पहिला १०० टक्के नूतनीकरणीय ऊर्जेवर चालणारा प्रकल्प असेल.

आंध्र प्रदेश सरकार एकात्मिक पायाभूत सुविधा एकत्रितपणे देणाऱ्या अदानी समूहाच्या साथीने राज्यात महाकाय डेटा सेंटर मार्केट उभे करणार आहे. यामुळे आंध्र प्रदेशाला भारत व आग्नेय आशियाचे पूर्व किनारपट्टीवरील डेटा सेंटर हब हे स्थान प्राप्त होणार आहे. या हबचे केबल लॅण्डिंग स्टेशनसोबत एकात्मीकरण केले जाईल. यामुळे राज्यातील लांब किनारपट्टीच्या फायदा घेऊन देशाला आपल्या डेटामधील असाधारण वाढीचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली जागतिक कनेक्टिव्हिटी व अतिरिक्त कनेक्टिव्हिटी पुरवता येईल.

राज्य सरकारचा दृष्‍टीकोन, आयटी धोरण आणि डेटा सेंटर्स, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, संबंधित तंत्रज्ञान उद्योग व नूतनीकरणीय ऊर्जेवर दिला जाणारा भर यांच्याशी सुसंगती राखत अदानी समूह राज्यातील डिजिटल व ऊर्जाविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला सहाय्य करणार आहे. यासाठी समूह ७०,००० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक येत्या २० वर्षांच्या काळात करणार आहे. यातून १००,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार राज्यात निर्माण होणे अपेक्षित आहे.

ही पार्क्स तीन वेगवेगळ्या परिसरांमध्ये विकसित केली जाणार आहेत. प्रत्येक परिसर पूरक मूल्ये निर्माण करणारा आणि डेटा सेंटर ऑपरेटर्सना आवश्यक व अतिरिक्त साधने एकत्रितपणे पुरवणारा असेल. डेटा सेंटर पार्क्समध्ये १०० नूतनीकरणीय वीज वापरली जाईल आणि ही वीज आंध्र प्रदेशातच निर्माण केली जाईल. यासाठी राज्यापुढील नूतनीकरणीय वीजनिर्मितीची उद्दिष्टे वाढवली जातील.

श्रीनारा चंद्राबाबू नायडू यावेळी म्हणाले“आंध्र प्रदेश जगातील आघाडीच्या डिजिटल स्थळांपैकी एक होण्यासाठी अविश्रांत मेहनत करत असून यामध्ये राज्य अनेक मापदंड प्रस्थापित करत आहे तसेच निकष उंचावत आहे. शेतीपासून ते वित्तीय बाजार, स्मार्ट सिटीज, आरोग्यसेवांपर्यंत प्रत्येक क्षेत्राचे भवितव्य डिजिटायझेशनमध्ये आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा हा लवकरच महत्त्वाचा घटक होणार आहे. ही भविष्यकाळासाठी सज्ज अशी डिजिटल परिसंस्था प्रत्यक्षात आणण्याची गुरूकिल्ली म्हणजे कार्यक्षम व पर्यावरणपूरक डेटा सेंटर्स. भारतातील सर्वांत प्रगतीशील राज्य असलेल्या आंध्र प्रदेश सरकारच्या या दृष्टिकोनावर अदानी समूहाचाही विश्वास आहे हे बघून आम्हाला फार आनंद वाटतो. म्हणूनच या रोमांचक प्रवासात आंध्र प्रदेश सरकारचा भागीदार होण्याचा निर्णय अदानी समूहाने केला आहे.”

आंध्र प्रदेश सरकारमधील माहिती  तंत्रज्ञानखात्याचे माननीय मंत्री श्रीनारा लोकेश म्हणाले,“येणाऱ्या पिढीची तंत्रज्ञाने म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, अॅनालिटिक्स, बिग डेटा, इमेज प्रोसेसिंग आदी आजुबाजूचे जग बदलून टाकत आहेत आणि आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये नवकल्पनेला चालना देत आहेत. आपण सध्या ज्यातून जात आहोत, त्या मोबाइल क्रांतीला पूरक म्हणून डेटा स्टोरेज, डेटा प्रोसेसिंग आणि डेटा नेटवर्किंग यांवर भारताने भर देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक उद्योगाला फायद्याचे ठरेल अशा डिजिटल क्रांतीचा पाया घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकार व अदानी समूहाने केलेली भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे.”

अदानी समूहाचे अध्यक्ष श्रीगौतम अदानी म्हणाले,“जगातील पहिले पर्यावरणपूरक डेटा सेंटर पार्क विकसित करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारसोबत सहयोग करण्याचा क्षण हा आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.भारताला आपल्या वाढीचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान पायाभूत सुविधा उभ्या करण्याच्या प्रत्येक अंगाचा डेटा सेंटर्स हा पाया आहे. याशिवाय, अदानी समूहाची १०० टक्के नूतनीकरणीय ऊर्जा पुरवण्याची क्षमता आणि ऊर्जा व्यवस्थापनातील त्यांचा अनुभव हा उद्योगांकडून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यातील महत्त्वाचा घटक आहे.कारण, हा उद्योग आता जगातील सर्वाधिक व सर्वांत वेगाने ऊर्जावापर करणारा उद्योग झाला आहे.”

या करारामुळे आता राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण झालेल्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अदानी समूह प्रवेश करत आहे. सर्वांगीण (फुल स्टॅक) ऊर्जा व्यवस्थापनातील(नूतनीकरणीय, बेसलोड, पारेषण व वितरण) तसेच भक्कम प्रकल्प कार्यान्वयनातील आपल्या विस्तृत अनुभवाचा फायदा अदानी समूहाला यात मिळेल. यामुळे हा समूह जागतिक दर्जाच्या पीयूईसह डेटा सेंटर पायाभूत सुविधांना १०० टक्के नूतनीकरणीय ऊर्जा पुरवू शकेल.

हे पार्क्सच्या नेटवर्कचे डिझाइन डेटा सेंटर उद्योगातील उदयोन्मुख तंत्रज्ञानात्मक प्रवाह स्वीकारण्याच्या दृष्टीने लवचिक ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यात बदल करता येतील. हे नेटवर्क आपल्या ग्राहकांना अनोखा वीजपुरवठा मूल्यसिद्धांत देऊ करेल. त्याचबरोबर ही डेटा सेंटर पार्क्स रूपांतरणाच्या माध्यमातून हार्डवेअर पुरवठादार,सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स पुरवठादार, स्टार्ट-अप कंपन्या तसेच दूरसंचार परिसंस्था अशी संपूर्ण परिसंस्था सक्षम करण्यासाठी काम करतील. त्यामुळे संप्रेरक नवोन्मेष उदयाला येईल आणि यातील  गुणक (मल्टिप्लायर)परिणामामुळे हजारो नवीन नोकऱ्या निर्माण होतील व पर्यायाने कर संकलनातही वाढ होईल.

अदानी विषयी

भारतातील अहमदाबाद येथे मुख्यालय असलेला अदानी समूह हा भारतातील सर्वांत मोठा एकात्मिक पायाभूत सुविधा समूह आहे. संसाधने (कोळसा खाणी आणि ट्रेडिंग), लॉजिस्टिक्स (बंदरे, लॉजिस्टिक्स, जलवाहतूक व रेल्वे), ऊर्जा (नूतनीकरणीय आणि औष्णिक विद्युत निर्मिती, पारेषण आणि वितरण) व शेती (शेतीउत्पादन,खाद्यतेल, अन्नउत्पादने, शीतगृहे आणि धान्यकोठारे),रिअल इस्टेट, सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा,ग्राहक वित्तसहाय्य आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये अदानी समूह सक्रिय आहे. अदानी समूह आपल्या यशाचे व आघाडीच्या स्थानाचे श्रेय आपल्या ‘राष्ट्रबांधणी’च्या तत्त्वज्ञानाला देतो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तसेच आपल्या शाश्वतता, वैविध्य व सामाईक मूल्यांवर आधारित सीएसआर कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज सुधारणेसाठी अदानी समूह वचनबद्ध आहे.

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.