विवोतर्फे प्रचंड क्षमतेची बॅटरी आणि मोठा हॅलो फुलव्‍ह्यू™ डिस्‍प्‍ले असलेला खिशाला परवडणारा स्‍मार्टफोन ‘वाय९०’ सादर

Screenshot_20190727_101455
  • ,९९० रूपये किंमत असलेल्‍या या वाय-सिरीजमधील परवडणा-या स्‍मार्टफोनमध्‍ये फेस अॅक्‍सेस वैशिष्‍ट्य
  • डिवाईस उद्यापासून सर्व ऑफलाइन पार्टनर स्‍टोअर्समध्‍ये आणि प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सवर उपलब्‍ध असणार

नवी दिल्‍ली, २६ जुलै २०१९: विवो या जागतिक नाविन्‍यपूर्ण स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज विद्यमान वाय-सिरीज पोर्टफोलिओमधील परवडणारा आणि प्रगत वैशिष्‍ट्ये असलेला स्‍मार्टफोन वाय९०च्‍या (Y90) सादरीकरणाची घोषणा केली. वाय९० प्रचंड ४०३०एमएएच क्षमतेच्‍या बॅटरीवर चालतो. तसेच विवोची खास स्‍मार्ट पॉवर व्‍यवस्‍थापन यंत्रणा दीर्घकाळापर्यंत फोन सुरू राहण्‍याची सुविधा देते. या डिवाईसमध्‍ये १५.८ सेमी (६.२२ इंची) हॅलो फुलव्‍ह्यू™डिस्‍प्‍ले असून ८८.६ टक्‍के स्क्रिन-टू-बॉडी रेशिओ आहे. हा डिस्‍प्‍ले ग्राहकांना व्‍यापक दृश्‍याचा अनुभव देतो. वाय९० मध्‍ये विवोचे प्रचलित फेस अॅक्‍सेस तंत्रज्ञान देखील आहे, जे अधिक सोईस्‍करपणे व सुरक्षितपणे स्‍मार्टफोन अनलॉक करण्‍याची आणि अॅक्‍सेसिंग करण्‍याची सुविधा देते.

या डिवाईसची किंमत ६,९९० रूपये आहे. हे डिवाईस २४ जुलै २०१९ पासून ब्‍लॅक व गोल्‍ड रंगांमध्‍ये सर्व ऑफलाइन पार्टनर स्‍टोअर्समध्‍ये आणि प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सवर उपलब्‍ध असणार आहे.

या सादरीकरणाबाबत बोलताना विवो इंडियाच्‍या ब्रॅण्‍ड धोरणाचे संचालक निपुण मार्या म्‍हणाले, भारतातील आमच्‍या धोरणाशी संलग्‍न राहत आम्‍ही ग्राहकांना विविध किंमतींमध्‍ये त्‍यांच्‍या विशिष्‍ट गरजांची पूर्तता करणारी व नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांनी युक्‍त उत्‍पादनांची व्‍यापक रेंज सादर करण्‍यासाठी अथक मेहनत करत आहोत. आमच्‍या वाय-सिरीज पोर्टफोलिओमधील नवीन भर या दिशेने एक लक्षणीय पाऊल आहे. वाय९० परवडणा-या दरामध्‍ये चांगली बॅटरी क्षमता आणि मोठ्या डिस्‍प्‍लेचा सतत शोध घेत असलेल्‍या आमच्‍या ग्राहकांच्‍या वाढत्‍या अपेक्षांची पूर्तता करतो.

वाय९० मध्‍ये एमटी६७६१ हेलिओ ए२२ क्‍वॉड-कोअर प्रोसेसर आहे. तसेच १२ एनएम डिझाइन असलेला हा स्‍मार्टफोन २.० गिगाहर्टझ गती प्राप्‍त करतो. ज्‍यामुळे जलद प्रोसेसिंग गतीसह वीजेचा वापर कमी होतो आणि सुलभ व प्रतिसादात्‍मक अनुभव मिळतो. या डिवाईसच्‍या डिस्‍प्‍लेच्‍या वरील भागामध्‍ये ५ मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरा आहे आणि मागील बाजूस ८ मेगापिक्‍सलचा सेन्‍सर कॅमेरा आहे. या कॅमे-यांमधील एआय फोटो अल्‍गोरिदम्स आपोआपपणे फेशियल एन्‍हान्‍समेंट्सची सुविधा देतात,ज्‍यामुळे ब्‍युटिफिकेशन समायोजित करण्‍याचा वेळ वाचतो आणि प्रत्‍येक क्षणाला उत्‍तम फोटो देखील कॅप्‍चर होतात. वाय९० मध्‍ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्‍टोरेज आहे. ही स्‍टोरेज क्षमता २५६ जीबीपर्यंत वाढवता येते, ज्‍यामुळे ग्राहकांना अधिक प्रमाणात फोटो व फाइल्‍स स्‍टोअर करण्‍याची सुविधा मिळते.

सर्व विवो डिवाईसेसप्रमाणे वाय९० देखील विवोची कटिबद्धता मेक इन इंडियाचे पालन करतो आणि हे डिवाईस विवोच्‍या ग्रेटर नोएडा केंद्रामध्‍ये उत्‍पादित करण्‍यात आले आहे.

उत्‍पादन शॉट्स लिंक –  https://we.tl/t-2bWrgLi98C

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.