टेक्नोची एआय कॅमेऱ्यांमध्ये आणखी एक भरारी, भारतात सादर करत आहेत त्यांचा पहिला अँड्रॉईड ९.० पायपॉवर्ड ‘कॅमॉन iSKY3’ स्मार्टफोन

Screenshot_20190403_122359

Screenshot_20190403_122359

·       ८५९९ रुकिंमतटेक्नो कॅमॉन iSKY3 हा ९ हजारांहून कमी किंमतीतील पहिला अँड्रॉईड ९ पाय८एमपी एआय सेल्फी१३+२ एमपी एआय ड्युएल रीअर कॅमेरा आणि ६.२ इंची नॉच डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये एकत्र असलेला स्मार्टफोन आहे

नवी दिल्ली, २० मार्च २०१९ : होळीचा सण आता अगदी जवळ येऊन ठेपला आहेअशात टेक्नो या ट्रान्सिऑन इंडियाच्या ऑफलाइन कॅमेरासेंट्रिक स्मार्टफोन ब्रँडने हा सण आणखी आनंदाचा करण्यासाठी अतिरिक्त पॉवर ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स‘ असलेला नवा स्मार्टफोन सादर केला आहेआधुनिक अँड्रॉईड ९ पायऑपरेटिंग सिस्टम असलेला त्यांचा पहिला स्मार्टफोन आज या कंपनीने सादर केलाया फोनमध्ये वापरकर्त्याला अधिक आकर्षक व सर्वसमावेशक अनुभव मिळणार आहे.

बेस्ट एनी लाइट‘ म्हणजे कोणत्याही प्रकाशात सर्वोत्कृष्ट अशा स्मार्टफोन फोटोग्राफी अनुभवासाठीटेक्नो बांधिल आहेग्राहकांना हा अनुभव देण्यासाठी ६ ते १५ हजार या गटात स्पर्धात्मक किंमतीत प्रत्येकाला आधुनिक मोबाइल कॅमेरा तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी ही कंपनी सातत्याने प्रयत्न करत आहेया गटातील नव्या स्मार्टफोनमुळे या ब्रँडने स्मार्टफोन वापरण्याचा एकूण अनुभव अधिक सहजस्मार्ट,एकात्मिक व ग्राहकांच्या गरजांना साजेसा असावा या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

ट्रान्सिऑनचे सीईओ श्रीअरिजीत तालपत्रा म्हणाले, “टेक्नोमध्ये ग्राहककेंद्री दृष्टिकोन हे आमचे मूळ तत्व आहे आणि ग्राहकांचा स्मार्टफोनचा अनुभव अधिक वृद्धिंगत करण्यासाठी अर्थपूर्ण उत्पादने/वैशिष्ट्ये आणण्यासाठी आम्ही ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचा सातत्याने अभ्यास करत असतोहे लक्ष्य गाठण्यासाठी आमचा नवा कॅमॉन iSKY3 अत्याधुनिक एकात्मिक सॉफ्टवेअर अँड्रॉईड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टमने सज्ज आहेयामुळेग्राहकांचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव आमूलाग्र बदलेलया फोनमध्ये मशिन लर्निंगडिजिटल वेलबीइंग आणि सहजतेवर भर देत अधिक वैयक्तिक अनुभव देण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची ताकद आहेकोणत्याही प्रकाशात फोटो काढणारा कॅमेराअधिक वेगवान आणि स्मार्ट फोन,अधिक चालणारी बॅटरी आणि आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा फोन योग्य किंमतीत हवा असणाऱ्या आजच्या तंत्रज्ञानप्रेमी तरुणांसाठी हा ८५९९ रुपये किंमतीचा फोन फ्युचररेडी म्हणजे भविष्यासाठी एआयच्या ताकदीने‘ सज्ज आहे.”

कॅमॉन iSKY3 ला हवासा स्मार्टफोन बनवणारी वैशिष्ट्ये:

     I.        बेस्ट एनी लाइट एआय कॅमेरा किटने अधिक सुंदर फोटोग्राफी

कॅमॉन iSKY3 मध्ये प्रीमिअम ट्विन कॅमेरा आहेतयात क्वॉड फ्लॅशसह सर्वोत्कृष्ट f/1.8 अपार्चर असलेला १३ एमपी प्रायमरी कॅमेरा आहेत्यामुळे ग्राहकांना कमी प्रकाशातही अधिक सुंदरस्पष्ट फोटो घेता येतातशिवाय यातील २ एमपी डेप्थसेन्सिंग लेन्स उत्कृष्ट पोट्रेटसाठी योग्य आहेतयातील ४ डिजिटल झूममुळे वापरकर्त्याला उच्च प्रतीचे क्लोझअप घेता येतात… अगदी लांब अंतरावरूनहीत्यामुळे फोटोग्राफी अधिक सुस्पष्ट होते.

सेल्फीप्रेमींसाठी यात f/2.0 अपार्चरने सज्ज ८ एमपी एआय सेल्फी कॅमेरा आहेयात ७८ अंश असा व्यापक कोन मिळतोशिवायतुम्ही कोणत्याही वातावरणात,प्रकाशात असाअधिक चांगल्या दर्जाचे सेल्फी आणि ग्रूफीजसाठी यातील फ्रंट फ्लॅशन अधिक प्रकाश कॅप्चर करतोइतकेच नाहीयातील ६लेव्हल एआय ब्युटी मोड ग्राहकाच्या आवडीप्रमाणे बदलतोअधिक नैसर्गिक सेल्फीजसाठी यात भारतीय त्वचेचा रंग अधिक चांगला दिसावा यासाठी २२८ फेशिअल पाईट्सपर्यंत स्कॅन होते.

     II.          अँड्रॉईड ९ पायवर आधारित HiOS 4.6:सहजतावेगस्थानिकीकरण आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

कॅमॉन iSKY3 मध्ये HiOS 4.6 आहेत्यामुळे वापरकर्त्यांना खालीलप्रमाणे वैयक्तिक अनुभव देण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केला जातो.

·       स्मार्ट पॅनल तुमची कामे व्यवस्थापित करतोत्यामुळे कोणत्याही स्क्रीनवर तुमची आवडती वैशिष्ट्ये थेट वापरणे अधिक वेगवान होतेउदा. फक्त दोन पायऱ्यांमध्ये सेल्फी घेणेदोन पायऱ्यांमध्ये स्कॅन करून पेटीएमवरून पे करणे इ. (ओटीएम अपडेटच्या माध्यमातून उपलब्ध)

·       तुमच्या सर्व गरजांसाठी स्क्रीनतुमच्या शहरातील एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला कॅब बुक करायची असेल तर झिरोस्क्रीनमध्ये ‘कॉल अ कॅब‘ वापरता येईल.

·       अंतर्ज्ञानी नेव्हिगेशन सखोल काम करते आणि ट्रॅव्हल,ब्राऊझिंगन्यूज किंवा पेमेंट अशा अॅप्लिकेशनमधील लोकांच्या आवडी आणि वापराच्या सवयी यानुसार नेव्हिगेशन जुळवतेतुम्ही करत असलेल्या कृतीच्या आधारे हे सॉफ्टवेअर तुमच्या पुढील क्रियेचा आपोआप अंदाज घेते आणि त्यासंदर्भातील विशिष्ट अॅपच्या विभागात थेट जाण्यासाठी तुम्हाला शॉर्टकटही सुचवते.

·       अधिक सातत्यूपर्ण आणि अनुकूल बॅटरीचा अनुभव.यात तुम्ही कोणते अॅप अधिक वापरता हे जाणून घेतले जाते आणि त्यासाठी बॅटरीचा प्राधान्यक्रम ठरवला जातो.

·       अँड्रॉईडसाठी असलेल्या डिजिटल वेलबिइंग या सुविधेत नवा डॅशबोर्ड आहेतुम्ही फोनवर तुमचा वेळ कसा घालवता हे यातून तुमच्या लक्षात येईलडू नॉट डिस्टर्ब या नव्या वैशिष्ट्यामुळे तुमच्या स्क्रीनवर येणाऱ्या सर्व पॉप अप अडथळ्यांना सायलेंसमध्ये टाकले जाते.

·       स्विच मोबाइल डेटामुळे तुम्हाला फक्त एका पायरीच्या कार्यचालनातून दोन सिममधून निवड करता येते(ओटीए अपडेटच्या माध्यमातून उपलब्ध)

·       बाइक चालवताना बाइक मोडमुळे तुम्हाला कॉल नाकारणे आणि आपोआप रीप्लाय मॅसेज पाठवणे शक्य होईल. (ओटीए अपडेटच्या माध्यमातून उपलब्ध)

 

  III.        तरुण पिढीच्या प्रेरणेतून प्रीमिअम डिझाइन

कॅमॉनमध्ये ६.२ एचडी नॉच डिस्प्ले आहेयातील १९:९ रेशिओमुळे स्क्रीन टू बॉडी रेशिओ ८८ टक्क्यांचा मिळतोत्यामुळे स्मार्टफोनवर सिनेमे पाहण्याचागेम्स खेळण्याचा दृश्यानुभव अधिक सुंदर होतोइतकंच नाही,यातील भूमितीय कोन आणि गोलाकार कडा तसेच अवघ्या १५० ग्रॅम वजनामुळे हा फोन हातात सुयोग्य वाटतो आणि अगदी एका हाताने वापरण्यासही सोपा ठरतोहा फोन चार रंगांमध्ये उपलब्ध आहेमिडनाइट ब्लॅकअॅक्वा ब्ल्यूशँपेन गोल्डनेब्युला ब्लॅक.

  IV.        ९ हजारांहून कमी किमतीत शक्तीशाली परफॉर्मन्स

कॅमॉन iSKY3 म्हणजे फक्त अप्रतिम कॅमेरा क्षमता आणि सुंदर रूप नव्हे, तर शक्तिलाशाली फोन आणि उत्तम परफॉर्मन्सया स्मार्टफोनमध्ये २.० Ghz ६४ बिट क्वॉडकोअर प्रोसेसर आहेत्याला २जीबी रॅम आणि ३२ जीबी रॉम स्टोरेजची जोड आहेहे स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवता येतेहा ड्युएल सिम स्मार्टफोन आहेयात डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहेत आणि दोन्ही सिम कार्डसाठी एकाच वेळी ४जीVoLTEवापरण्याची सोय यात आहे.

यातील ३५००च्या शक्तिशाली बॅटरीमुळे फोन संपूर्ण दिवस वापरता येतोयाचा ३५० तासांचा स्टँडबाय टाइम आहेयात १२ तासांचे कॉलिंग.५ तासांचे वेब ब्राऊझिंग९८ तासांचा म्युझिक प्लेबॅक आणि ७ तासांचे गेमिंग करता येईलइतकेच नाहीयातील बॅटरी ल्रॅब वैशिष्ट्यामध्ये  एआय पॉवर मॅनेजमेंट आहेत्यामुळे,वापरकर्त्यांचा स्मार्टफोनचा वापर ओळखून एपीपीसेंसर आणि सीपीयू अशा हार्डवेअरसाठी उत्कृष्टरित्या पॉवर सेव्हिंग मोड वापरला जातो.

   V.        मोबाइल सुरक्षितेत भर

या किंमतीमधील फोनमध्ये आघाडी घेत कॅमानiSKY3मध्ये एआय फेस अनलॉक सुविधा देण्यात आली आहेहे वैशिष्ट्य आजच्या इन्स्टा पिढीला नक्कीच आकर्षून घेईलहा फोन अनलॉक करण्यासाठी १२८ फेशिअल पॉईंट्स लक्षात घेतले जातातइतकेच नाही,यातील अनोखे अँटी ऑईल फिंगरप्रिंट सेन्सरमुळे सर्व प्रकारच्या भारतीय जीवनपद्धती आणि वातावरणात सोयीस्कर अॅक्सेस मिळतोत्यामुळे कॉल घेणेफोन अनलॉक करणेअॅप लॉक वापरणे आणि फोटो काढणे अगदी सहज होते.

  VI.        विक्री पश्चात सेवेचे ब्रँडचे वचन

सर्व टेक्नो उत्पादने ‘१११‘ ब्रँड वचनासह येतातटाइम स्क्रीन रीप्लेसमेंट१०० दिवसांची मोफत रीप्लेसमेंट आणि १ महिन्याची अतिरिक्त वॉरंटी

 

 

टेक्नो मोबाइल बाबत

२००६ साली स्थापन झालेला टेक्नो मोबाइल हा ट्रान्सियन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड आहे. ”एक्स्पेक्ट मोअर” या ब्रँडच्या मूलतत्वांना पुढे नेताना टेक्नो लोकांना परवडणाऱ्या दरात अद्ययावत तंत्रज्ञानापर्यंत पोहोचण्याची संधी देतो आणि ग्राहकांना आपल्या सध्याच्या मर्यादा ओलांडून शक्यतांचे जग नव्याने उलगडू देतोटेक्नो विविध बाजारपेठांमधील ग्राहकांच्या गरजा समजून घेते आणि त्यांना विविध उत्पादनांमध्ये स्थानिक नावीन्यपूर्णता देतेत्यात स्मार्टफोन्सटॅब्लेट्स आणि फीचर फोन्स आहेतया ब्रँडचे ४०पेक्षा अधिक उगवत्या बाजारपेठांमध्ये अस्तित्व असून तो एक मोठा जागतिक ब्रँड आहे२०१७मध्ये,टेक्नोने ४३ दशलक्षपेक्षा अधिक युनिट्सची विक्री केली.टेक्नो मोबाइल हा मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबचा अधिकृत टॅब्लेट आणि हँडसेट पार्टनरही आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.tecno-mobile.com येथे भेट द्या.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.