मर्ककडून भारतात वंध्यत्व निवारणासंबंधी अद्ययावत तंत्रज्ञान सादर

Gavi and AccesoriesGavi and Accesories
Geri

Geri

•सुधारित असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमुळे(ART) अधिक अचूकतेने उपचार होणार

•औषधे आणि तंत्रज्ञानाचा एकत्रित पोर्टफोलिओ मर्ककडून सादर

मुंबई२७ फेब्रुवारी २०१९ (GPN)  मर्क या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आज वंध्यत्वनिवारणासंबंधीचे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात सादर केले. कंपनीने जेरी® (Geri®) आणि गावी® (Gavi®) या दोन उपकरणांसह, जेम्स®(Gems®), हा संपूर्ण कल्चर मीडियम सूटही बाजारात आणला आहे. गेनेआ बायोमेडेक्स (Genea Biomedx)च्या माध्यमातून ही आयव्हीएफ क्लिनिक आणि रुग्णालयांना उपलब्ध होणार आहेत.

वंध्यत्व निवारणाचे उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या भ्रूणावर होणाऱ्या बाह्य दबावाचे प्रमाण कमी करण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान पोषक वातावरण पुरवते. जेरी (Geri®)मध्ये स्वतंत्र नियंत्रित कप्प्यांमुळे प्रत्येक रुग्णाच्या भ्रूणाची स्वतंत्रपणे वाढ होते आणि प्रत्येक कप्प्याला रियल-टाइम कॅमेरा बसवलेला असल्यामुळे आतील परिस्थिती पाहण्यासाठी कप्पा उघड-बंद करण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे केवळ कप्प्यातून बाहेर न काढता भ्रूणवाढीच्या प्रक्रियेवरच लक्ष ठेवता येते असे नाही तर,कप्प्यातून भ्रूण बाहेर न काढल्यामुळे, गॅसच्या तीव्रतेतील बदल आणि तापमान यासारख्या घटकांचा भ्रूणाच्या वाढीवर होणारा परिणाम रोखला जातो.

”मर्ककडे बाजारपेठेतील आघाडीचा औषधांचा पोर्टफोलिओ आहे आणि कंपनी अनेक क्लिनिक ऑप्टिमायझेशन सेवा पुरवते. फर्टिलिटी लॅब प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे आणि विविध पद्धती आहेत, ज्यामुळे आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या एकूणात यशावर परिणाम होऊ शकतो. भारतातील रुग्णांना आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या यशामध्ये सुधारणा करण्यासाठी आमच्या पोर्टफोलिओतील वंध्यत्व निवारणासंबंधीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. जेणेकरून मानवी कामाचे प्रमाण कमी होईल, उपचारांत अधिक अचूकता येईल व भारतातील आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी अधिक यशस्वी परिणाम मिळतील.एका अभ्यासानुसार २७.५ दशलक्षभारतीयजोडप्यांमधील वंध्यत्व निवारणासाठी उपचारांची गरज आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यांना जागतिक स्तरावरील उपचार उपलब्ध करून देऊ शकणार आहोत,” असे मत मर्क बायोफार्माच्या इंडिया क्लस्टरचे महाव्यवस्थापक आनंदराम नरसिंहन यांनी व्यक्त केले.

संशोधनाधारित औषधे आणि तंत्रज्ञान उत्पादनांमध्ये आपला विस्तार करून वंध्यत्व निवारण क्षेत्रातील सध्या उपचार उपलब्ध नसलेल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न मर्क करत आहे. वंध्यत्व निवारणातील उपचारांचे सकारात्मक परिमाम यावेत आणि रुग्णांची पालकत्वाची इच्छा पूर्ण करावी तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना मदत व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात उत्पादने उपलब्ध करून देण्याचे मर्कचे ध्येय आहे.

सध्या बाजारात आघाडीवर असलेल्या आयव्हीएफ औषधे आणि सेवांमध्ये वाढ करून मर्कने एक सर्वसमावेशक पोर्टफोलिओ सादर केला आहे,जेणेकरून भारतातील चिकित्सक आणि विशेषज्ञांनी केलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून आयव्हीएफ उपचारांचे सकारात्मक परिणाम व्हावेत.

गावी®जेरी® आणि जेम्स®या (Gavi®, Geri® आणिGems®) विषयी

गावी® (Gavi®) हे जगातील पहिले ऑटोमॅटिक व्हिट्रिफिकेशन उपकरण आहे, सातत्याने व्हिट्रिफिकेशन करता यावे या हेतूने हे उपकरण विकसित करण्यात आले आहे.

जेरी® (Geri®) हा बेंचटॉप इन्क्युबेटर आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या रुग्णाचे भ्रूण वेगवेगळ्या कप्प्यांत ठेवता येतात व प्रत्येक कप्प्याचे इन्क्युबेशन स्वतंत्रपणे गरजेनुसार नियंत्रित ठेवता येते. जेणेकरून भ्रूण वाढीच्या पहिल्या टप्प्यांत वाढीला हानी पोहचवणाऱ्या घटना टाळता येतात. यामध्ये एक टाइम-लॅप्स कॅमेराही बसवलेला असतो जो भ्रूणात विकास झाल्याझाल्या त्याचे फोटो काढतो.
जेनेआ बायोमेडेक्स कल्चर मीडिया सूटचे सर्वांत नव्या पिढीतील रूप म्हणजे जेम्स® (Gems®) हे आहे,ज्याद्वारे भ्रूणाचे उच्च दर्जाचे पोषण होते.

प्रत्यक्ष वापरता येणारे, सहज उपलब्ध असणारे आणि अचूक वंध्यत्व निवारण तंत्रज्ञान तयार करणाऱ्या जेनेआ बायोमेडेक्स या कंपनीने गावी®, जेरी® आणि जेम्स®(Gavi®, Geri® आणि Gems®) हे तयार केले आहे.जेणेकरून वंध्यत्व निवारण उपचार प्रमाणित व ऑटोमेटेड व्हावेत.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.