जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया १ एप्रिल २०१९ पासून उत्‍पादनांच्‍या किंमतींमध्‍ये जवळपास ४ टक्‍क्‍यांची वाढ करणार

Screenshot_20190403_121707मुंबई, १९ मार्च २०१९: जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया १ एप्रिल २०१९ पासून निवडक उत्‍पादनांच्‍या किंमतींमध्‍ये जवळपास ४ टक्‍क्‍यांची वाढ करणार आहे.

जग्‍वार रोव्‍हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल) अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रोहित सुरी म्‍हणाले,

भारतातील जग्‍वार लँड रोव्‍हर जागतिक दर्जाच्‍या उत्‍पादनांची रेंज देते. ही रेंज सर्वांना प्रेरित व उत्‍साहित करते. वाढत्‍या महागाईमुळेच किंमतीमध्‍ये ही वाढ होत आहे. आम्‍हाला खात्री आहे की, जग्‍वार व लँड रोव्‍हर हे दोन जागतिक आयकॉनिक ब्रॅण्‍ड्स विद्यमान व नवीन ग्राहकांना आकर्षून घेतील.

भारतातील जग्‍वार पोर्टफोलिओमध्‍ये स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेली उत्‍पादने एक्‍सई, एक्‍सएफ, एक्‍सजे व एफ-पेससह एफ-टाइपचा समावेश आहे. लँड रोव्‍हर पोर्टफोलिओमध्‍ये स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेले डिस्‍कव्‍हरी स्‍पोर्ट आणि रेंज रोव्‍हर इव्‍होकसह रेंज रोव्‍हर वेलार, रेंज रोव्‍हर, रेंज रोव्‍हर स्‍पोर्ट आणि डिस्‍कव्‍हरी यांचा समावेश आहे.

Jaguar Land Rover products are retailed from 27 outlets in 25 cities in India. Customers also have a choice of booking their favourite Jaguar or Land Rover by visiting the online booking platform www.findmeacar.in or www.findmeasuv.in.

भारतातील २५ शहरांमधील २७ आऊटलेट्समधून जग्‍वार लँड रोव्‍हर उत्‍पादनांची विक्री केली जाते. ग्राहक ऑनलाइन बुकिंग व्‍यासपीठ www.findmeacar.in किंवा www.findmeasuv.inला भेट देऊन त्‍यांच्‍या आवडीची जग्‍वार किंवा लँड रोव्‍हर व्‍हेइकल बुक करू शकतात.

– समाप्‍त –

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.